न ओळखता येण्यासारखा सैराटफेम अभिनेत्याचा वेबसिरीजसाठी नवा लुक

नव्या भूमिकेसाठी या अभिनेत्याचे ट्रान्सफॉर्मेशन, ओळखलं का कोण आहे

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट येत आहेत आणि प्रेक्षकांचाही त्याला तुफान प्रतिसाद मिळत आहे. लवकरच म्हणजे 26 फेब्रुवारीला 1962 द वॉर इन द हिल्स सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि यामध्ये महत्वाची भूमिका साकारत आहे तो म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीचा सैराटफेम परशा (Sairat) अर्थात आकाश ठोसर (Akash Thosar). नुकताच आकाशचा लुक दाखवण्यात आला असून आकाशला ओळखणेही कठीण झाले आहे. आकाश मुळात दिसायला सुंदर आहे. या सिरीजमध्ये जवानाची भूमिका साकारली असल्याने आकाशच्या शरीरयष्टीत खूपच बदल झाला आहे. त्यामुळे आकाश आता एका जवानासारखाच दिसू लागला आहे. आकाशचे हे ट्रान्सफॉर्मेशन त्याच्या चाहत्यांना भलतेच आवडले असून त्याचा हा लुक व्हायरल होतोय. इतकंच नाही तर आकाशला त्याच्या या लुकसाठी अनेक चांगल्या कमेंट्सही सोशल मीडियावर मिळत आहेत. ही सिरीज प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केली असून यामध्ये अभय देओल आणि सुमीत व्यास यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. भारत - चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही सिरीज बनविण्यात आली असून 3000 चीनी सैनिक आणि 125 भारतीय सैनिकांच्या लढ्याशी संबंधित ही कथा आहे.

Good News: कपिल शर्मा पुन्हा झाला बाबा, मुलाच्या जन्माची दिली बातमी

किशन नावाच्या जवानाची भूमिका

आकाश ठोसर या सिरीजमध्ये  एका किशन नावाच्या जवानाची भूमिका साकारत आहे, जो मेजर सूरज सिंहच्या बटालियनमध्ये कार्यरत आहे.  मेजर सूरजची भूमिका अभय देओलने साकारली आहे.  आपल्या भूमिकेविषयी आकाशने  सांगितले की, ‘1962 द वॉर इन द हिल्स माझे एक स्वप्नवत प्रोजेक्ट आहे. लहानपणीपासून मला भारतीय सेनेमध्ये दाखल व्हायचे होते. माझे स्वप्न होते ते.  चित्रपटात येण्यापूर्वी मी दोन वेळा परीक्षाही दिल्या आहेत. पोलीस सेवेत भरती होण्याचा प्रयत्नही केला आहे. जर मी अभिनेता झालो नसतो तर नक्कीच सुरक्षा सेवेत दाखल होऊन देशाची सेवा केली असती.’ इतकंच नाही तर आकाश म्हणाला की, ‘जेव्हा मला एका आर्मी ऑफिसरची भूमिका करण्याची संधी मिळाली तेव्हा मला अत्यंत आनंद झाला आणि  स्वतःवर अभिमान वाटला.  खऱ्या आयुष्यात नाही किमान पडद्यावर तरी मला ही खाकी वर्दी घालण्याची संधी मिळाली. जेव्हा मी भूमिकेसाठी ही वर्दी अंगावर चढवायचो मला एक वेगळाच आनंद मिळायचा.  असं वाटायचं की मी खरंच आर्मीमध्ये आहे आणि मी स्वतःला एक जवानच समजत होतो.’

पंचतारांकित हॉटेलमध्ये शूटदरम्यान अभिनेत्रीवर अत्याचार

आकाशचा ‘झुंड’ही लवकरच होईल प्रदर्शित

आकाश ठोसरने 2016 मध्ये ‘सैराट’ चित्रपटातून पदार्पण केले आणि प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप सोडली. केवळ मराठीच नाही तर सर्व भाषिक प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिला होता. देशभरातून या चित्रपटाला आणि आकाशलाही प्रेम मिळाले. त्यानंतर आकाशने वेबसिरीजमध्येही काम केले. आकाशला वेगवेगळ्या भूमिका आता मिळू लागल्या आहेत. लवकरच नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला ‘झुंड’ हा अमिताभ बच्चन यांच्यासह चित्रपट प्रदर्शित होईल. या चित्रपटातही आकाशने महत्वाची भूमिका साकारली आहे.  आकाशचा आता हळूहळू जम बसू लागला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दरम्यान आकाशचा हा नवा लुक व्हायरल झाला असून त्याच्या या वेबसिरीजला प्रेक्षक कसा प्रतिसाद देत आहेत हे लवकरच कळेल. आकाशला या वेबसिरीजकडून खूपच अपेक्षा आहेत. 

जखमी अवस्थेतही 'या' अभिनेत्रीने केलं अजय देवगणसोबत शूटिंग

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक