सैराट आणि धडकफेम ‘आर्ची-पार्थवी’च्या या भेटी मागचं कारण काय

सैराट आणि धडकफेम ‘आर्ची-पार्थवी’च्या या भेटी मागचं  कारण काय

नागराज मंजुळेच्या सैराटने अनेकांना अक्षरशः वेड लावलं. या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला. ज्यामुळे रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर म्हणजेच सैराटमधले आर्ची-परश्या एका रात्रीत स्टार झाले. आजही या सिनेमाची आणि कलाकारांची क्रेझ तशीच कायम आहे. या सिनेमाच्या अभूतपूर्व यशाची भुरळ बॉलीवूड स्टार करण जोहरलादेखील पडली. ज्यामुळे त्याने या चित्रपटाचा हिंदीत रिमेक करण्याचा घाट घाटला. करणने सैराटचा रिमेक म्हणजेच धडक हिंदीत तयार केला.  जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांनी या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. नुकतंच सैराटची आर्ची आणि धडकची पार्थवी एकत्र आल्या होत्या. रिंकू राजगुरू आणि जान्हवी कपूरच्या अशा एकत्र येण्यामुळे या भेटीमागचं कारण जाणून घेण्यासाठी चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

View this post on Instagram

🙂 #sairatmetdhadak.

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

View this post on Instagram

🙂 #sairatmetdhadak.

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

आर्ची - पार्थवीच्या भेटीमागचं कारण काय

सैराटप्रमाणे बॉक्स ऑफिसवर धडकला फार यश मिळू शकलं नाही.  त्यामागची कारणं अनेक असू शकतील. मात्र चाहत्यांमध्ये या दोन्ही चित्रपटांची चर्चा मात्र आजही तितकीच रंगते. सैराटमुळे आर्चीला आणि धडकमुळे  जान्हवी कपूरला एक विशेष ओळख मिळाली. ज्यानंतर त्यांना एकामागोमाग एक असे अनेक चित्रपट ऑफर झाले. नुकतंच जान्हवी आणि रिंकू एकत्र आल्या होत्या. कारण या दोघींच्या भेटीचे फोटो  त्यांनी आपआपल्या इन्स्टा अकाउंटवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये रिंकूने लिहीलं आहे की "जेव्हा सैराट धडकला भेटतं" तर जान्हवीने मात्र तिच्या फोटोसोबत दोन हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. या फोटोमध्ये रिंकूने काळ्या रंगाचा प्लेन कुर्ता घातला आहे आणि त्यावर बांधणीची ओढणी घेतली आहे तर जान्हवीने निळ्या रंगाच्या डेनिम जीन्सवर मल्टी कलर टी-शर्ट घातलं आहे. दोघींनी मेकअपदेखील केलेला नाही. यावरून या दोघी सहज भेटल्या असाव्या असा अंदाज बांधला जात आहे. मात्र कदाचित या दोघी एखाद्या नव्या प्रोजेक्टसाठीदेखील एकत्र येण्याची शक्यता आहे. कारण काही असलं तरी या मुळे दोन वादळं एकत्र आल्यासारखं चित्र निर्माण झालं आहे. 

रिंकूचा आगामी चित्रपट

रिंकूने सैराटनंतर कागर या चित्रपटात काम केलं होतं. लवकरच ती मेकअप या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन गणेश पंडीत करणार आहे. ज्या चित्रपटाचा टीझरमध्ये ती नशेच्या आहारी जाऊन बडबड करताना दिसली होती. या चित्रपटाच्या टीझर वरून हा चित्रपट तिच्या इतर चित्रपटांपेक्षा वेगळा असेल असं वाटत आहे.  सैराट आणि कागरनंतर पुन्हा एकदा आर्चीचं एक वेगळं रूप पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक आहेत. 

View this post on Instagram

Sorry for the spam guyz

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

जान्हवीचे आगामी चित्रपट

जान्हवी कपूर धडकनंतर रूह अफ्जा या चित्रपटात झळकणार आहे. जान्हवी सध्या रूह अफ्जाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यानंतर ती करण जोहरच्या तक्त या अॅक्शनड्रामामध्ये देखील झळकणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, करिना कपूर, आलिया भट, विकी कौशल, भूमी पेडणेकर, अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. तसंच जान्हवी गुंजन सक्सेनाच्या बायोपिकमध्येदेखील असणार आहे. थोडक्यात जान्हवी तिच्या आगामी चित्रपटांसाठी प्रचंड मेहनत घेत असल्याचं दिसून येत आहे. सुदैवाने स्टार किड असल्यामुळे तिला पदार्पणातच अनेक चित्रपट मिळाले आहेत.

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा -

मराठीतील ही नवीन गाणी तुम्ही ऐकलीत का? नाही.. मग आताच ऐका

माधुरी दीक्षित करतेय आणखी एका मराठी चित्रपटाची निर्मिती

काजोल झाली लेखिका, श्रीदेवीच्या बायोग्राफीसाठी लिहिली प्रस्तावना