सैराटची गायिका चिन्मयी श्रीपदाने न्यूड फोटोची मागणी करण्याऱ्याला दिलं असं उत्तर

सैराटची गायिका चिन्मयी श्रीपदाने न्यूड फोटोची मागणी करण्याऱ्याला दिलं असं उत्तर

सोशल मीडियाचा वापर आजकाल सगळ्यांसाठीच गरजेचा झाला आहे आणि सेलेब्रिटीजना तर त्यांच्या फॅन्सशी कनेक्ट होण्यासाठी हे महत्त्वाचं साधन झालं आहे. त्यामुळे प्रत्येक सेलिब्रिटीचं सोशल मीडियावार अकाउंट असतंच असतं. पण सेलेब्सना नेहमीच आणि आपल्यालाही कधी तरी सोशल मीडियामुळे काही वाईट अनुभव येतात. असाच एक अनुभव नुकताच दाक्षिणात्य प्रसिद्ध गायिका चिन्मयी श्रीपदा (Chinmayi Shripaada) हिला आला. पण तिने कोणतीही भीड न बाळगता त्याला अगदी चोख उत्तर दिलं. तिने दिलेल्या या उत्तरामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.


चिन्मयीने दिलं असं उत्तर की समोरच्याची बोलती झाली बंद


सोशल मीडियावर सेलिब्रिटीजच्या फोटोज आणि पोस्टवर अनेक ट्रोलर वाईट कमेंट करत असतात. अनेकदा त्यांना सेलिब्रिटी इग्नोर करतात पण काही सेलिब्रिटीज अशा लोकांना चोख उत्तर देणं योग्य मानतात. असाच काहीसा अनुभव जेव्हा प्रसिद्ध गायिका चिन्मयी श्रीपदा आला तेव्हा तिला सहन झालं नाही. तिने त्याला इग्नोर न करता दिलं असं उत्तर.चिन्मयीने ट्वीटरवर या व्यक्तीच्या पर्सनल चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला. या चॅटमध्ये पहले ट्रोलरने चिन्मयीला न्यूड फोटोजची मागणी केली आणि सेंड न्यूड्स असा मेसेज केला. या मागणीवर चिन्मयीने तिच्या आवडत्या लिपस्टिकच्या न्यूड शेड्स शेअर केल्या आणि लिहीलं की, या आहेत माझ्या काही आवडत्या न्यूड्स. हे उत्तर पाहून नक्कीच त्या ट्रोलरची बोलतीच बंद झाली असेल. तुम्हाला लिपस्टीकच्या न्यूड शेड्स माहीत असतीलच ज्या स्कीन टोनला मॅचिंग आणि खूप फिकट रंगाच्या असतात.  


चिन्मयीचे फॅन्स झाले खूश


chinamyi-tweet-1


चिन्मयीने दिलेल्या या उत्तरामुळे तिचे फॅन्स फारच इंप्रेस झाले. चिन्मयीने त्या व्यक्तीला ट्विटर मस्तपैकी ट्रोल केलं. फॅन्सने चिन्मयीचं कौतुक करत तिने दिलेलं उत्तर बेस्ट असल्याचं सांगितलं. परिणामी त्या ट्रोलरने चिन्मयीच्या या पोस्टला घाबरून त्याचं अकाउंटच डिलीट केलं.


अभिनेता पुष्कर श्रोत्री 'त्या' कॅप्शनमुळे होत आहे ट्रोल


चिन्मयीने दिला होता सैराट झालं जी गाण्याला आवाज
 

 

 


View this post on Instagram


 

 

With Sri Ajay and Atul! :)


A post shared by Chinmayi Sripada (@chinmayisripaada) on
साऊथसोबत चिन्मयीने अनेक हिंदी, बंगाली आणि मराठी एवढंच नाहीतर जर्मन भाषेतही गाणं गायलं आहे. सैराट चित्रपटातलं प्रसिद्ध गाण ‘सैराट झालं जी’ गायलं होतं.
 

 

 


View this post on Instagram


 

 

 

A post shared by Chinmayi Sripada (@chinmayisripaada) on
तसंच दीपिका आणि शाहरूख खानच्या चै’न्नई एक्सप्रेस’मधलं तितली गाण गायलं होतं आणि परिणिती चोप्राच्या ‘हंसी तो फंसी’ मधलं सुमधुर जहनसीब गाणंही गायलं होतं.   


सैफच्या मिशांसोबत खेळताना करिना झाली ट्रोल


तुम्हीही घाबरू नका आणि द्या चोख उत्तर


chinamyi-tweet-2


चिन्मयीप्रमाणेच तुम्हालाही सोशल मीडियावर असाच त्रास देत असल्यास घाबरून जाता. त्याला चोख उत्तर द्या किंवा काय करावं कळत नसल्यास इतरांची मदत घ्या. कारण वेळीच अशा गोष्टींबाबत पाऊल उचलंल नाहीतर पुढे जाऊन जास्त त्रास होऊ शकतो. त्यामुळे वेळीच चिन्मयीप्रमाणे तुम्हीही उत्तर द्याच. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नम्रता शिरोडकरलाही एकाने फोटोमध्ये मेकअप न केल्याबद्दल इन्स्टावर कमेंट केली होती. त्यावेळी नम्रतानेही त्या ट्रोलरची बोलती बंद केली होती.