‘इन्शाअल्लाह’ सलमान आणि आलिया पहिल्यांदाच येणार एकत्र

‘इन्शाअल्लाह’ सलमान आणि आलिया पहिल्यांदाच येणार एकत्र

सलमान आणि आलिया पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येत आहेत. त्यातही महत्त्वाचं म्हणजे 20 वर्षांनंतर सलमान आणि संजय लीला भन्साली एकत्र काम करत असून आलियादेखील पहिल्यांदाच या दोघांबरोबर काम करणार आहे. हा आनंद आलिया आणि सलमान या दोघांनीही सोशल मीडियावर ट्विट करून प्रेक्षकांबरोबर शेअर केला आहे. गेल्या पाच सहा वर्षामध्ये आलियाने अप्रतिम व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. दरम्यान एप्रिलमध्ये तिचा ‘कलंक’देखील प्रदर्शित होत आहे. यावर्षी आलियाचे बरेच चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यामुळे संजय लीला भन्सालींचा चित्रपट हा नक्कीच तिच्यासाठी खास ठरणार.


आलियाने व्यक्त केली भावना
संजय लीला भन्साली एक असा दिग्दर्शक आहे ज्याच्याबरोबर काम करण्याचं प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. आलियादेखील त्यापैकीच आहे हे तिच्या ट्विटवरून कळत आहे. आलियाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आलियाने लिहिलं आहे की, ‘मी 9 वर्षांची होते तेव्हा पहिल्यांदा संजय लीला भन्साली यांच्या ऑफिसमध्ये गेले होते. तेव्हादेखील मी खूप नर्व्हस होते आणि तेव्हापासून प्रार्थना करत होते की, मला कधीतरी त्यांच्याबरोबर काम करायला मिळेल. खरंच खूप वाट पाहावी लागली या क्षणाची.’ पुढे तिने असंही म्हटलं आहे की, ‘असं म्हणतात की, डोळे उघडे ठेऊन स्वप्न पाहा आणि मी तेच केलं. संजय सर आणि सलमान खान ही जोडी एकत्र येणं म्हणजे एक प्रकारची मोठ्या पडद्यावर जादूच. हा प्रवास सुरु होण्याची आता मी वाट नाही पाहू शकत. मी खूपच उत्सुक आहे. इन्शाअल्लाह.’


सलमाननेही आपला आनंद सोशल मीडियावर व्यक्त केलादरम्यान सलमाननेही आपला उत्साह सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. ‘20 वर्ष उलटून गेली आहेत पण आता पुढच्या चित्रपटात पुन्हा संजय आणि मी एकत्र काम करत आहोत याचा मला आनंद आहे, इन्शाअल्लाह. आलियाबरोबर काम करण्यासाठी मी उत्सुक आहे आणि या प्रवासात नक्कीच आम्ही कमाल करू, इन्शाअल्लाह’ असं सलमानने म्हटलं आहे. सलमान आणि संजय लीला भन्साली यांनी दोन चित्रपट एकत्र काम केलं आणि हे दोन्ही चित्रपट मोठ्या पडद्यावर हिट ठरले होते. पुन्हा एकदा ही जोडी नक्कीच कमाल करेल अशी आशा सर्वांनाच आहे. 


दोघांच्याही ट्वीटमध्ये समान शब्द ‘इन्शाअल्लाह’

या दोघांनाही केलेल्या ट्विटमध्ये ‘इन्शाअल्लाह’ हा शब्द समान आहे. त्यामुळे या चित्रपटाचं नाव ‘इन्शाअल्लाह’ असण्याची शक्यता आहे. संजय लीला भन्साली यांचे चित्रपट नेहमीच भव्यदिव्य असतात. शिवाय त्यांच्या चित्रपटांच्या कथा यादेखील अप्रतिम आणि वेगळ्या धाटणीच्या असतात. त्यामुळे हा चित्रपट नक्की कोणत्या विषयावर असणार याची आता चर्चा सुरु झाली आहे. आलिया आणि सलमानची जोडी मोठ्या पडद्यावर कशी दिसेल याचीही आता प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी आलियाचे फोटो संजय लीला भन्साली यांच्या ऑफिसमधून बाहेर पडत असताना व्हायरल झाले होते. तेव्हाच आलिया संजय लीला भन्सालीच्या नव्या चित्रपटात दिसणार या चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान सलमान आणि कतरिनाचा ‘भारत’ ईदला प्रदर्शित होत आहे आणि एप्रिलमध्ये आलियाचा बहुचर्चित ‘कलंक’ प्रदर्शित होत आहे.


salman and katrina FI


फोटो सौजन्य - Instagram 


हेदेखील वाचा - 


आजी शर्मिलाने केलं साराचं कौतुक तर तैमूरबाबत व्यक्त केली चिंता


शाहरूख, सलमान आणि कतरिना करणार उर्दू भाषा प्रमोट


आलिया भटने तिच्या ड्रायव्हर्सचे घराचे स्वप्न केले पूर्ण