SHOCKING : Insha-Allah चित्रपटाबाबत भाईजानचं धक्कादायक ट्वीट

SHOCKING : Insha-Allah चित्रपटाबाबत भाईजानचं धक्कादायक ट्वीट

जर तुम्ही सलमानचे डाय हार्ड फॅन असाल तर तुम्हाला एक गोष्ट नक्कीच माहीत असेल आणि जी तुम्ही मिससुद्धा करत नसाल. ती म्हणजे प्रत्येक ईदला रिलीज होणारा भाईजान सलमान खानचा सिनेमा. कारण या Eid 2020 ला Salman Khan आणि Alia Bhatt चा Insha-Allah हा सिनेमा रिलीज होणार नाहीयं. ही गोष्ट भाईजानने ट्वीट करून सांगितली.

View this post on Instagram

#dabangg3 shoot #rajasthan with Sultan

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

25 ऑगस्टलाच सलमान खान (Salman Khan) ने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर याबाबतची माहिती दिली आहे. या चित्रपटाची घोषणा जोरदार करण्यात आली होती आणि तेव्हाच सलमानने हा सिनेमा ईदला रिलीज होईल असं सांगितलं होतं. भारतीय सिनेमाप्रेमी आणि सलमान फॅन्ससाठी ईद म्हणजे भाईचा सिनेमा आणि त्यातही संजय लीला भन्साली याचं दिग्दर्शन करणार म्हणजे तर हा सिनेमा अजून खास ठरतो. पण हा मुहूर्त यंदा चुकलाय. पाहा सलमानने केलेलं हे ट्वीट -

पण याच ट्विटमधली दुसरी ओळ पाहून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद उमटेल. कारण हा सिनेमा रिलीज होणार नसला तरी भाईची भेट ईदला होणार आहे. म्हणजे भाईचा दुसरा सिनेमा या दिवशी रिलीज होण्याची शक्यता आहे. आता तो सिनेमा कोणता असेल यासाठी मात्र भाईच्या दुसऱ्या ट्विटची वाट पाहावी लागेल. 

शूटींग सुरू होण्याआधीच झाला करोडोंचा फायदा

ईदचं रिलीज चुकलं तरी ईन्शाअल्लाहला थिएटर राईट्स आणि सॅटेलाईट राईट्स विकल्यामुळे तब्बल 190 करोडचा फायदा दिग्दर्शक संजय लीला भन्साळीला झाला आहे. या चित्रपटाचं शूटींग मुंबई, वाराणसी, हरिद्वार, ऑरलंड आणि अमेरिकेतील फ्लोरिडा येथे होणार आहे.

ईन्शाअल्लाहसाठी आलिया वाढवणार वजन

या चित्रपटात सलमान त्याच्यापेक्षा खूप वर्ष छोट्या असणाऱ्या आलियासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. सूत्रानुसार, या चित्रपटासाठी आलिया सध्या वजन वाढवत आहे. ज्यामुळे ती स्क्रीनवर सलमानसोबत चांगली दिसेल. पण अजूनही या चित्रपटाची कथा आणि यातील सलमान-आलियाची भूमिका कशी असेल याबाबत सर्व बाबी गुलदस्त्यातच आहेत. 

हेही वाचा -

Saaho मध्ये करणार का सलमान खान कॅमिओ

केजोने केला सलमान खानच्या लग्नाचा गौप्यस्फोट

‘इन्शाअल्लाह’ सलमान आणि आलिया पहिल्यांदाच येणार एकत्र