ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
दुबईत नाही ‘या’ ठिकाणी होणार सलमानच्या टायगर 3 चं शूटिंग

दुबईत नाही ‘या’ ठिकाणी होणार सलमानच्या टायगर 3 चं शूटिंग

सलमान खानच्या टायगर चित्रपटाचा सिक्वल लवकरच तयार होत आहे. या चित्रपटात सुपरहिट जोडी सलमान खान आणि कैतरिना कैफ पुन्हा एका प्रेक्षकांना एकत्र दिसणार आहे. एक था टायगर आणि टायगर जिंदा है नंतर टायगर 3मध्ये या जोडीला एकत्र पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक आहेत. यशराज प्रॉडक्शनचा हा स्पाय ड्रामा मनीष शर्मा दिग्दर्शित करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मार्चमध्ये दुबईत या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होणार होती. मात्र काही कारणास्तव आता दुबईत हे शूटिंग होणार नाही. दुबईऐवजी आता या चित्रपटासाठी एका वेगळ्या लोकेशनची निवड करण्यात आली आहे. 

का होणार नाही टायगरचं शूटिंग दुबईत

दुबईत टायगर 3 चं शूटिंग सुरू करण्याची पूर्ण तयारी झाली होती. एवढंच नाही तर मार्च पासून शूटिंगला सुरूवातही करण्यात येणार होती. मात्र सध्या युएईमध्ये कोरोना केसेस वाढत आहेत. त्यामुळे निर्मात्यांना सुपरस्टार्सच्या सुरक्षेसाठी आता दुबईत शूट करण्याचा निर्णय बदलावा लागणार आहे. मात्र सलमानने मशीष शर्मा आणि आदित्यला आधीच त्याच्या  डेट्स दिलेल्या आहेत. सध्या तो त्यांच्या कमिटमेंट लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यामुळे या डेट्स वाया जाऊ नयेत यासाठी चित्रपटाचं लोकेशन बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता या चित्रपटाचं शूटिंग इस्तांबुलमध्ये होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात सलमान अविनाश राठौड या एका वेगळ्या अवतारात दिसणार आहे. यासाठी त्याला विशेष फिटनेस ट्रेनिंग देण्यात येणार आहे. कैतरिना जोयाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटातील स्टंटदेखील इंटरनॅशनल स्टंट टीमद्वारे तयार केले जाणार आहेत. अॅक्शन, ड्रामा आणि इमोशन्सने भरलेला हा चित्रपट तयार करण्यासाठी जवळजवळ साडे तीनशे कोटी रूपयांचं बजेट असणार आहे. ज्यामुळे हा चित्रपट यंदाचा सर्वात महागडा चित्रपट असेल. 

सलमान आणि कैतरिनाची जोडी पुन्हा एकत्र

सध्या सलमान आणि कैतरिना लवकरात लवकर त्यांची राहिलेली कामे पूर्ण करत आहेत. कैतरिना सध्या सिंद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टरसोबत तिच्या ‘फोनभूत’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर सलमान त्याचा ‘अंतिम- दी-फायनल ट्रूथ’चं शूटिंग पूर्ण करत आहे. सोबतच तो बिग बॉस शोच्या शेवटच्या टप्प्याचं शूटिंगदेखील करत आहे. या महिन्यात त्याची सर्व कामे पूर्ण होतील आणि पुढच्या महिन्यात सलमान आणि कैतरिना त्यांच्या टायगर 3 च्या शूटिंगसाठी इस्तांबुलला रवाना होतील. इस्तांबुलची राजधानी टर्कीमध्ये हे शूटिंग केलं जाणार असून सध्या चित्रपटाच्या बेस्ट लोकेशनच्या शोधात चित्रपटाची टीम टर्कीला रवाना झालेली आहे. या वर्षी सलमान खानचा ‘राधे’ देखील ईदला प्रदर्शित होणार आहे. राधेमध्ये सलमानसोबत दिशा पटनी झळकणार आहे. यापूर्वी भारतमध्ये दिशाने सलमानसोबत काम केलं होतं. भारतमध्ये सलमान आणि कैतरिनानेही एकत्र काम केलं होतं. आता सलमान दोन वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये या दोन्ही अभिनेत्रींसोबत काम करत आहे. ज्यामुळे चाहत्यांना यंदा सलमानचे एका पाठोपाठ हिट चित्रपट पाहता येणार आहेत.

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

Bigg Boss 14: राहुल वैद्य आणि दिशा करणार या महिन्यान लग्न, आईने केला खुलासा

लांबलेल्या मालिकांचा प्रेक्षकांनाही आलाय कंटाळा

तब्बूमुळे रखडलं आहे कार्तिक आर्यनच्या ‘भूल भूलैया 2’ चं शूटिंग

ADVERTISEMENT
08 Feb 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT