सलमानच्या फॅनसाठी खुशखबर!!! त्याच्या ‘भारत’ या चित्रपटाचा ट्रेलर फायनली रिलीज झाला आहे. स्वातंत्र्यापूर्वीचा भारत आणि त्यानंतरचा बदललेला भारत यावर प्रकाश टाकणारा असा या चित्रपटाचा ट्रेलर आहे. साधारण 1947 ते 2010 हा कालखंड अधोरेखित करणारा असा या चित्रपटाचा ट्रेलर आहे. या कालखंडामध्ये देशात झालेल्या बदलाचे जे साक्षीदार आहेत त्यांना हा ट्रेलर फारच जवळचा वाटेल.
ट्रेलरची सुरुवात सलमान खानच्या आवाजाने होते. यावेळी तो पाठमोरा एका गर्दीच्या ठिकाणी चालताना दिसत आहे. त्याच्या तोंडी असलेला डायलॉगच तुम्हाला सगळ्या चित्रपटाची कहाणी सांगून जातो. 72 वर्षाच्या माणसाचे आयुष्य हे किती बोअर असेल असे आपल्याला वाटते. पण या 72 वर्षातच या भारतने (सलमानने) काय काय अनुभव घेतले हे सांगणारी ही कथा आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळ, देशाला मिळालेले स्वातंत्र्य, त्यानंतर झालेली फाळणी, फाळणीमुळे दुभंगलेले कुटुंब असा सगळा सलमानचा म्हणजेच भारतचा प्रवास दाखवण्यात आला आहे.
आता हा पिरिओडिक चित्रपट असला तरी तुम्हाला यात ग्लॅमरचा पुरेपूर तडका पाहायला मिळतो. यात एक आयटम साँग आहे जे दिशा पटनीवर चित्रित करण्यात आले आहे. याशिवाय ट्रेलरमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत. ज्यामध्ये फाळणीसोबतच ग्लॅमरचा आधार घेतल्याचे पाहायला मिळत आहे. आता सलमानच्या वेगवेगळ्या लुकबाबत म्हणाल तर ते चित्रपटात हळूहळू रिलीज होतील.
भारतमधील सलमानच्या लुकवर होतेय चर्चा
फाळणीचा तो काळ फारच त्रासदायक होता. पाकिस्तानातील काही भागात विखुरले गेलेले देशात परतले तेव्हा त्यांना त्यांच्या बऱ्याच गोष्टी मागे ठेऊन याव्या लागल्या. काहींची तर त्या काळात ताटातूट झाली. अशीच भारत( सलमान) ची देखील ताटातूट होते. त्यानंतरचा त्याचा खडतर प्रवास यात दाखवण्यात आला आहे. त्यामुळे फाळणीत भरडल्या गेलेल्यांच्या अनेक आठवणी यातून नक्की ताज्या होतील.
आलिया आणि सलमान करणार एकत्र काम
सलमानची इमेज ही बॉलीवूडमध्ये प्रेम अशी आहे. पण या इमेजमधून बाहेर पडण्यासाठी त्याने अनेक वेगळ्या धाटणीचे चित्रपट गेल्या काही वर्षात केले. पण अशा पद्धतीचा चित्रपट त्याने कधीच केला नाही. त्यामुळे सलमानची इमेज चेंज करणारा असा हा चित्रपट असणार आहे. येत्या 5 जून रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.
‘भारत’ या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सलमान-कतरिना ही जोडी एकत्र दिसणार आहे. या आधीही सलमानसोबत कतरिनाने चित्रपटात काम केले आहे. पण तिच्या अभिनयावरुन तिला नेहमीच बोलले जाते. तिचा अभिनय हा त्या रोलला न्याय देणारा नसतो असे म्हटले जाते. पण आता कतरिना तिच्या अभिनयावरुन बोलणाऱ्यांना गप्प करणार आहे. कारण ट्रेलरमध्ये कतरिनाने ज्या पद्धतीने डायलॉग डिलीव्हरी केली आहे ते पाहता तिने या रोलसाठी बरीच मेहनत केली आहे, असे दिसत आहे.त्यामुळे ती या ट्रेलरमध्ये भाव खाऊन जाते.
शाहरुख, सलमान आणि कतरिना करणार उर्दू भाषेचा प्रचार
जॅकी श्रॉफ या चित्रपटात सलमानच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमध्ये त्याचा रोलही महत्वपूर्ण असल्याचे दिसत आहे. याशिवाय चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सुनील ग्रोवर दिसत आहे. सुनील ग्रोवर सलमानचा मित्र असून यात त्याचा रोल मोठा असल्याचे वाटत आहे