सलमान खानने दिली प्रेमाची कबुली 'या' अभिनेत्रीचे पाहतो फोटो झूम करून

सलमान खानने दिली प्रेमाची कबुली 'या' अभिनेत्रीचे पाहतो फोटो झूम करून

बॉलीवूडचा भाईजान सलमान खान लग्न कधी करणार हा त्याच्या चाहत्यांना पडलेला नेहमीचाच प्रश्न… कारण सलमान खानच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जाणून घेण्यास त्याचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. सलमान खान आता त्याच्या करिअरच्या उंच शिखरावर पोहचला आहे. मात्र त्याने अजूनही लग्न केलं नाही ही गोष्ट चाहत्यांना मुळीच रूचत नाही. इतर सेलिब्रेटीजप्रमाणे त्याचा सुखाचा संसार पाहणं हे त्याच्या चाहत्यांचं स्वप्न आहे. ज्यामुळे सर्वजण सलमानला सतत तो लग्न कधी करणार हा प्रश्न विचारत असतात. नुकतंच सलमानने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक सिक्रेट शेअर केलं आहे. ज्यामुळे तो या अभिनेत्रीच्या आजही प्रेमात असल्याचं दिसत आहे. 

सलमान आणि कतरिनाची केमिस्ट्री

अभिनेता सलमान खानसोबत चित्रपटात आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी काम केलं आहे. ज्यामधल्या अनेकांसोबत त्याची लव्ह केमिस्ट्री परफेक्ट जुळून आली होती. ज्यामुळे काही अभिनेत्रींसोबत त्याचं अफेअर असल्याच्या चर्चाही काही काळ रंगल्या.या सर्व बॉलीवूड अभिनेत्रींमध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेलं नाव होतं कतरिना कैफ. सलमानच्या चाहत्यांना ही जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र यावी असं नेहमीच वाटत असतं. सलमान आणि कतरिना एकत्र असताना खूप छान दिसतात. ज्यामुळे भविष्यात ते पुन्हा एकत्र येतील आणि लग्न करतील अशी आशा नेहमीच त्याच्या चाहत्यांना वाटत असते. नुकतंच सलमान खाननेही एका कार्यक्रमात या बातमीला खतपाणी घालणारी गोष्ट शेअर केली. ज्यामुळे लवकरच सलमान आणि कतरिना एकत्र येतील असं वाटू लागलं आहे. सलमानने या कार्यक्रमात सर्वांसमोर त्याच्या प्रेमाची जणू कबुलीच दिली आहे. 

सलमानचं हे लव्ह सिक्रेट तुम्हाला माहीत आहे का

मुंबई पोलिसांसाठी नुकतंच उमंग 2020 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ‘उमंग 2020’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमात बॉलीवूडचे अनेक सेलिब्रेटी सहभागी झाले होते. या कार्यक्रमात सलमान खान आणि कतरिना कैफला कॉमेडी किंग कपिल शर्माने काही प्रश्न विचारले. ज्यावेळी सलमान खान असं काही तरी बोलला ज्यातून त्याचं आजही कतरिना कैफवर प्रेम असल्याचं दिसून आलं. कपिलने सलमानला विचारलं की, मला नेहमीच तुमचे फॅन्स मेसेज करून तुझ्याबद्दल विचारत असतात. सलमानने आतापर्यंत कधी सोशल मीडियावरील एखाद्या मुलीचा फोटो झूम करून पाहिला आहे का ? असा प्रश्न मला विचारला जातो. यावर सलमानने त्याच्या कतरिनावरील प्रेमाची कबुली देणारं उत्तर दिलं आहे. सलमान खान म्हणाला की, मी कधीच इतर मुलींचे असे फोटो पाहिलेले नाहीत पण मी कतरिनाचे सगळे फोटो नेहमीच झूम करून पाहतो. सलमानच्या या उत्तरामुळे प्रेक्षकांचं कार्यक्रमात चांगलंच मनोरंजन झालं होतं. मात्र त्यासोबतच या उत्तरावरून सलमान आणि कतरिनाच्या चाहत्यांना त्यांच्या प्रेमाची कबुलीही मिळाली. आता हे दोघं लग्न कधीही करू देत मात्र सलमानचं कतरिनावर प्रेम आहे हे मात्र पक्कं झालं आहे.

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा -

परी म्हणू की सुंदरा ! 'मलंग गर्ल' दिशा पटानीचं लेटेस्ट फोटोशूट व्हायरल

सैफने केला खुलासा, साराने 'जवानी जानेमन'मधील भूमिकेसाठी का दिला नकार

‘या’ अभिनेत्रीने समुद्रकिनारी बिकनीत शेअर केल्या हॉट योगा पोझ