सलमान खान या अभिनेत्याचा आहे 'लव्ह गुरू'

सलमान खान या अभिनेत्याचा आहे 'लव्ह गुरू'

बॉलीवूडचा भाईजान सलमान खानला पाहिल्यावर आजही अनेक तरूणींचे ह्रदय धडधडू लागतं. आतापर्यंत सलमान खान सोबत अनेक बॉलीवूड अभिनेत्रींचे नाव जोडलं गेलं आहे. मात्र असं असलं तरी त्याचं कोणतंच प्रेमप्रकरण फार दिवस चालू शकलं नाही. मात्र या प्रेम प्रकरणांमुळे सलमान खानकडे प्रेमाचा अनुभव मात्र नक्कीच जास्त  आहे. ज्यामुळे सलमान अनेकांसाठी लव्ह गुरू ठरू शकतो. सलमान खानने अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapoor) ला काही वर्षांपूर्वी प्रेमाबाबत एक खास सल्ला दिला होता. जो आदित्य रॉय कपूरच्या चांगल्याच फायद्याचा ठरला.

आदित्यला सलमानने काय दिला सल्ला

अभिनेता आदित्य रॉय कपूर सध्या ‘मलंग’ (Malangg) चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये  बिझी आहे. बिग बॉसच्या सेटवर प्रमोशनसाठी आलं असताना आदित्यने सलमानबाबत हा किस्सा शेअर केला. 2009 साली आदित्यने विपुल शाहच्या 'लंडन ड्रीम्स' मधून चित्रपटात डेब्यू केला होता. ज्या चित्रपटात आदित्य  आणि सलमान एकत्र काम करत होते. आदित्यने सांगितलं की, "लंडन ड्रीम्सच्या सेटवर मला एक मुलगी आवडली होती. सहाजिकच मला त्या मुलीला ही गोष्ट सांगायची होती. पण तिला हे मी कसं सांगू हेच मला कळत नव्हतं. तेव्हा सलमानने मला सांगितलं की न घाबरता थेट जाऊन तू तिला किससाठीच विचार तुला ती नक्कीच हो म्हणेल. आदित्यने सलमानचं म्हणणं ऐकलं आणि तिला प्लीज मला किस करशील का असं विचारलं. आश्चर्य म्हणजे सलमानचा सल्ला आदित्यच्या चांगलाच कामी आला आणि आदित्यला त्या मुलीकडून किस मिळाला.

मलंग चित्रपटातील कलाकार

मलंग चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सूरी करत आहे. हा एक रोमँटीक हॉरर चित्रपट असेल. 'मलंग' 7 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapoor),  दिशा पटानी (Disha Patani), अनिल कपूर (Anil Kapoor) आणि कुणाल खेमू (Kunal Khemu) यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमान खानच्या बिग बॉसमध्ये या चित्रपटाची टीम आली होती. यादरम्यान सलमानने मलंगचे काही विशेष संवाद पुन्हा रिक्रिएट केले होते. ज्यासाठी त्यांने त्याच्या खास ‘सिग्नेचर दबंग स्टाईल’ला फॉलो केलं होतं. ही स्टाईल कॅरी करण्यासाठी अनिल कपूरने त्याला विनंती केली होती. 

मलंगसाठी आदित्यने वाढवलं ‘10’ किलो वजन

आदित्यने आत्तापर्यंत चित्रपटांमधून चॉकलेट बॉय किंवा गंभीर अशा भूमिका केल्या आहेत. पण मलंगमध्ये तो दिसणार आहे अॅक्शन अवतारात. एवढंच नाहीतर या भूमिकेसाठी त्याने तब्बल ‘10’  किलो वजन वाढवलं आहे. कारण या चित्रपटातील अॅक्शन सीन्ससाठी तो या खास मस्क्युलर बॉडीत दिसणार आहे. तसंच या चित्रपटात तो फक्त अॅक्शनच नाहीतर अजून एका लुकमध्ये दिसणार आहे. 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा -

सुभाष घईंचा मराठी सिनेमा 'विजेता' या दिवशी झळकणार बॉक्सऑफिसवर

रितेशने दिल्या ‘बायको’ जेनेलियाला मजेशीर शुभेच्छा

मराठीतील 'अप्सरा' सोनालीने निवडला आपला जोडीदार, अभिनंदनाचा वर्षाव