भाईजान सलमानचा व्हिलनसोबत दोस्ताना, कोट्यवधींची कार केली गिफ्ट

भाईजान सलमानचा व्हिलनसोबत दोस्ताना, कोट्यवधींची कार केली गिफ्ट

दबंग सलमान खान (Salman Khan) बॉलिवूडमध्ये केवळ आपल्या अभिनयासाठीच नाही तर मित्रत्वाचं नातं जपण्यासाठीही प्रसिद्ध आहे. भाईजान सलमान आपल्या मित्रांवर भरभरून प्रेम करतो, हे सर्वश्रुत आहे. सलमान नेहमीच आपल्या सह-कलाकारांना आणि मित्रांना महागड्या भेटवस्तू देऊन त्यांचं आपलं आयुष्यात विशेष स्थान असल्याची जाणीव करून देत असतो. नुकतंच सलमाननं ‘दबंग 3’ सिनेमात खलनायकाची भूमिका साकारणारा साउथचा सुपरस्टार अभिनेता किच्चा सुदीप यालाही महागडी कार भेट म्हणून दिली. सलमाननं सुदीपच्या घरी जाऊन त्याला नवीकोरी महागडी बीएमडबल्यू एम 5' कार गिफ्ट करून आश्चर्यचकित केलं. 

(वाचा : 'अनन्या' आता झळकणार रुपेरी पडद्यावर, रवी जाधव करणार निर्मिती)

सल्लूमियाँकडून महागड्या भेटवस्तू मिळवण्यात सुदीप जास्त नशीबवान असल्याचं दिसत आहे. कारण सुदीपवर सलमानकडून महागड्या भेटवस्तूंचा पाऊसच सुरू असल्याचं दिसत आहे. 

(वाचा : बॉलिवूडची ‘शांती’ पत्रकारावर भडकली, प्रेग्नेंसीच्या प्रश्नावर दीपिकानं दिलं ‘हे’ उत्तर)

सलमान खानकडून मिळालं महागडे गिफ्ट

साक्षात सलमानकडून महागडं गिफ्ट मिळाल्यामुळे सुदीप अतिशय आनंदात आहे. त्यानं सोशल मीडियावर सलमान आणि नव्या कारसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. फोटो शेअर करताना त्यानं पोस्टमध्ये लिहिलंय की,‘जेव्हा तुम्ही एखादं चांगलं काम करत, तेव्हा तुमच्यासोबतही नेहमीच चांगल्या गोष्टी घडतात. सलमान खान सरांनी माझ्यासाठी जे काही केलंय त्यामुळे माझा या वाक्यावर पुन्हा एकदा दृढ विश्वास बसला आहे. मला आणि माझ्या कुटुंबीयांना प्रेम दिल्याबाबत धन्यवाद! तुमच्यासोबत काम करणं माझ्या सन्मानाची बाब आहे आणि तुम्ही माझ्या घराला भेट दिल्याबद्दल मी फार आनंदी आहे. यापूर्वी सलमाननं सुदीपला एक जॅकेटही गिफ्ट केलं होतं. या जॅकेटवर सलमानच्या आवडत्या श्वानाचा (Dog) फोटो आहे. सुदीपनं सलमानचा या जॅकेटसोबतचा फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याच्या चाहत्यांमध्ये हा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता.  

(वाचा : धुरळा ! छोट्या लता दीदीनं गायलं अरिजितचं सुपरहिट गाणं)

'दबंग- 3' सिनेमाला संमिश्र प्रतिसाद

सलमान खानचा ‘दबंग 3’ सिनेमा 20 डिसेंबर 2019 रोजी बॉक्सऑफिसवर झळकला होता. दबंग 3 सिनेमाला सिनेरसिकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. प्रभुदेवा यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची कन्या सई मांजरेकरनं या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पर्दापण केलं. सई मांजरेकर व्यतिरिक्त सिनेमामध्ये सोनाक्षी सिन्हा, किच्चा सुदीप आणि अरबाज खान यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. दबंग 3 नंतर  सलमान प्रभुदेवा यांच्यासोबत ‘राधे’ सिनेमातही काम करणार आहेत. राधे सिनेमा या वर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणारआहे. याच दिवशी खिलाडी अक्षय कुमारचा सिनेमा ‘लक्ष्मी बॉम्ब’ देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

(वाचा : गिरीश कुलकर्णी-सयाजी शिंदे मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच दिसणार एकत्र)

हे देखील वाचा :

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.