बिग बॉसच्या पुढील म्हणजेच 14 व्या सिझन आता लवकरच सुरू होणार आहे. गेली अकरा वर्ष या शोचं सूत्रसंचालन सलमान खान करत आहे. ज्यामुळे बिग बॉस आणि सलमान खान हे एक आगळंवेगळं समीकरणच निर्माण झालं आहे. सलमान खानशिवाय बिग बॉस पाहणं प्रेक्षकांना जवळजवळ अशक्यच आहे. दरवर्षी बिग बॉसचा नवा सिझन सुरू झाला की त्यासोबतच सलमान खानच्या तगड्या मानधनाची चर्चादेखील सुरू होते. त्यामुळे या सिझनमध्येही सलमान खान किती मानधन घेणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मात्र सलमानने या शोच्या मानधनाबाबत एक खूप मोठी गोष्ट जाहीर केली आहे. या सिझनसाठी सलमान खानने स्वतःहून त्याच्या मानधनात कपात करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामागे सलमान खानचा एक चांगला हेतू आहे.
सलमान खानने का केली स्वतःच्या मानधनात कपात
बिग बॉससाठी खूप मोठं युनिट रात्रंदिवस काम करत असतं. सध्या कोरोनामुळे सर्वांनाच आर्थिक अडचणीतून जावं लागत आहे. त्यामुळे सलमान खानच्या मते जर त्याने कमी मानधन घेतलं तर त्याच्या इतर युनिटला पूर्ण पैसे नक्कीच मिळू शकतात. यासाठीच सलमान खान त्याच्या मानधनात कपात झाल्यावरही खुश आहे. कारण त्याच्या मते सध्याच्या काळात प्रत्येकाला रोजगार मिळणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्या एका छोट्याशा तडजोडीमुळे जर सर्व युनिटचं घर चालणार असेल तर ही तडजोड तो आनंदाने करू शकतो. बिग बॉस शोची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. हा शो 3 ऑक्टोबरपासून रात्री नऊ वाजता प्रसारित होणार आहे. याबाबत एक वर्च्युअल प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली होती. ज्यामधून ही बातमी मीडियाला देण्यात आली. या शोबाबत आणखी अनेक गोष्टींचा खुलासा यावेळी करण्यात आला. कोरोनामुळे बिग बॉसच्या शोच्या पूर्ण फॉरमॅटमध्येच यावेळी बदल करण्यात आला आहे. शो सुरू असताना त्यात भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाच्या सुरक्षेची व्यवस्थित काळजी घेतली जाणार आहे. घरात प्रवेश करण्यापूर्वीच प्रत्येक स्पर्धकाची कोविड टेस्ट घेण्यात येणार आहे. शिवाय त्यांना त्यानंतर क्वारंटिनदेखील केलं जाणार आहे. मगच या शोला सुरूवात होणार असं सलमान खानने सांगितलं.
सलमान खानला शूटिंग करताना यासाठी वाटत आहे भीती
लॉकडाऊन जेव्हा सुरू झाला तेव्हा सलमान खान त्याच्या पनवेल वरील फॉर्म हाऊसवर राहत होता. त्यामुळे संपूर्ण लॉकडाऊनमध्ये तो त्याच्या कुटुंबातील काही लोक आणि मित्रमंडळींसोबत या फॉर्महाऊसवरच राहीला. मात्र आता बिग बॉसच्या शूटिंगसाठी तो पुन्हा मुंबईत परतला आहे. बिग बॉसच्या शूटिंगला जोरदार सुरूवात झाली असुन लवकरच हा शो प्रेक्षकांना पाहता येणार आहे. मात्र याबाबत चर्चा करताना नकळत सलमानला कोरोनाबाबत वाटत असलेली दाहक भीती समोर आलीय. सलमानच्या घरी त्याची तान्ही भाची आयत आणि वृद्ध आईवडील आहेत. त्यामुळे त्याला कोरोनाची जाल्त भिती वाटते. शूटिंग दरम्यान सर्वजण पीपीई कीटमध्ये असतात. तरी देखील प्रत्येकाने शिंक, खोकला आणि किस या गोष्टींपासून दूर राहावं असं वाटतं.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
देशद्रोही म्हणणाऱ्यांवर चिडली राखी सावंत म्हणाली…
Good News: अजून एका अभिनेत्रीने गरोदर असल्याचे केले जाहीर, फोटो व्हायरल
आमिर अलीपासून वेगळं झाल्यानंतर संजीदा झाली आहे जास्तच ‘बोल्ड’