सलमान खानने घेतलाय घर सोडण्याचा निर्णय

सलमान खानने घेतलाय घर सोडण्याचा निर्णय

सलमान खानचं आपल्या कुटुंबावर निस्सीम प्रेम आहे आणि हे जगजाहीर आहे. सलमान जरी घरी नसला तरीही त्याचं घराबद्दलचं प्रेम सर्व जगाला माहीत आहे. पण आता असं काय घडलं आहे की, सलमान घर सोडत आहे. अर्थात तुम्ही लगेच विचार करायला सुरुवात केला असेल. पण तुम्ही जसा विचार करताय तसं काहीच नाहीये. सलमान सध्या ‘भारत’ चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे आणि हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी केवळ चार महिने बाकी आहेत. सलमान खान हा अली अब्बास जाफरच्या या चित्रटामध्ये पाच वेगवेगळ्या अवतारात प्रेक्षकांसमोर येणार आहे. तर रेस 3 नंतर सलमानला एका मोठ्या हिटची गरज आहे त्यामुळे या चित्रपटामध्ये कोणतीही कमतरता सलमानला ठेवायची नाही. आपला संपूर्ण वेळ सलमानला या चित्रपटासाठी द्यायचा आहे. त्यामुळे या चित्रपटाचं चित्रीकरण वेळेवर पूर्ण होण्यासाठी सलमानने आपलं घर सोडून थोड्या महिन्यांसाठी फिल्मसिटीमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून जाण्यायेण्याचा वेळ वाचले आणि चित्रीकरण वेळेवर पूर्ण होऊ शकेल.

Subscribe to POPxoTV

गोरेगावमधील फिल्मसिटीमध्ये ‘भारत’ चा मोठा सेट


मुंबईतील गोरेगावमधील फिल्मसिटीमध्ये सध्या ‘भारत’ चा मोठा सेट उभारण्यात आला आहे. तसंच या ठिकाणी सलमान खानसाठीदेखील 10,000 स्क्वेअर फूटचं एक घर बांधण्यात आलं आहे. या घरामध्ये सलमानसाठी जिम बनवण्यात आलं असून सलमान सध्या या घरात राहात आहे. त्यामुळे त्याला चित्रीकरणासाठी पूर्ण वेळ देता येतोय. सलमान खानंच घर बांद्रामध्ये आहे तर गोरेगाव मध्ये स्टुडिओ आहे. त्यामुळे येता जाता सलमानला प्रचंड ट्रॅफिकचा सामना करावा लागत आहे. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठीच सलमानने फिल्मसिटीमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. भारतच्या चित्रीकरणामध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सलमानने हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे. अली अब्बास जाफर दिग्दर्शित या चित्रपटामध्ये सलमान वेगवेगळ्या अवतारात दिसणार असून याचं पहिलं टीझर प्रदर्शित झालं आहे. या टीझरला प्रेक्षकांची खूपच चांगला प्रतिसाद दिला.  


salman as bharat


प्रेक्षकांना या चित्रपटाची प्रतीक्षा


‘भारत’चा टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांना आता या चित्रपटाची प्रतीक्षा आहे. पहिल्याच टीझरमधील संवादाने आणि सलमानच्या एंट्रीने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. या चित्रपटामध्ये सलमान 18 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंतची भूमिका साकारताना प्रेक्षकांना दिसणार आहे. भारत जूनमध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. सलमान खानच्या यामध्ये वीस वर्षापासून साठ वर्षांपर्यंतच्या पाच विविध भूमिका असणार आहेत. भारतमध्ये अभिनेता जॅकी श्रॉफ, तब्बू, कतरीना कैफ आणि दिशा पटनी अशी स्टारकास्ट असणार आहे.दे शप्रेमावर आधारित या चित्रपटाचं कथानक सत्तरच्या दशकातील असण्याची शक्यता आहे. शिवाय या चित्रपटात भारताच्या स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची कहाणी दाखवली जाणार आहे. सलमानच्या जबरदस्त संवादाने आणि एंट्रीने या टीझरमधून चित्रपटाची कल्पना येत आहे. पुन्हा एकदा अली अब्बास जाफर, कतरिता आणि सलमान खान हे त्रिकूट या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येत असून आतापर्यंत या त्रिकूटाने केलेल सर्व चित्रपट हिट ठरले आहेत. त्यामुळे या चित्रपटकडूनही प्रेक्षकांना खूपच अपेक्षा आहेत.


फोटो सौजन्य - Instagram 


हेदेखील वाचा - 


‘भारत’चं टीझर प्रदर्शित, यावर्षी देशभक्तीपर चित्रपटांची प्रेक्षकांना मेजवानी


आगामी 'भारत' चित्रपटासाठी दिशा करतेय खतरनाक स्टंट्स


‘मुळशी पॅटर्न’चा रिमेक करणार सलमान खान