'भारत'मधील सलमान खानचा हटके लुक

'भारत'मधील सलमान खानचा हटके लुक

बॉलीवूडचा भाईजान सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट ‘भारत’ चित्रपट पाच जूनला प्रदर्शित होत आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित भारत चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटातील सलमानचा नवा लुक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सलमान खानने त्याच्या इंन्स्टा अंकाऊंटवर त्याचा हा नवा लुक शेअर केला आहे. डोळ्यावर चष्मा, पांढरे केस, पांढरी दाढी आणि मिशी आणि चेहऱ्यावर गंभीर भाव असलेला हा लुक फारच हटके वाटत आहे. सलमानचा हा लुक त्याच्या चाहत्यांनी आतापर्यंत कधीही न पाहिलेला आहे. भारत चित्रपटात सलमान खानच्या पाच वेगवेगळ्या वयोगटातील भूमिका असणार आहेत. त्यामुळे हा लुक त्याच्या वयोवृद्ध भूमिकेचा असणार आहे. त्यामुळे सलमानखान तरूण ते वयोवृद्ध अशा सर्व भूमिकांमधून त्याच्या चाहत्यांच्या समोर येणार आहे. आता प्रदर्शित केलेल्या या पोस्टर मध्ये जॅकी श्रॉफ आणि सोनाली कुलकर्णीदेखील दिसत आहेत. शिवाय त्यांच्यासोबत लहान मुलेदेखील आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये  भारतचे कथानक नेमके कसे असेल अशी चर्चा सुरू आहे.


Bharat new look 1


सलमान खानने व्यक्त केल्या भावना...


सलमानने या पोस्ट सोबत “ या पांढऱ्या केसांपेक्षा माझं आयुष्य अधिक रंगीत आहे.” असे शेअर केले आहे. शिवाय या पोस्टरवर ‘देश आणि व्यक्तीचा एकत्रित प्रवास’ अशी टॅगलाईनदेखील लिहिलेली आहे. या पोस्टवरील हे वाक्य आणि सलमानच्या भावना यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये भारत चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

पाच जुनला 'भारत' होणार प्रदर्शित


भारत चित्रपट 2014 साली प्रदर्शित झालेल्या “Ode to my father” या  दक्षिण कोरियन चित्रपटावर आधारित असणार आहे. शिवाय या चित्रपटात भारताच्या साठ वर्षांच्या इतिहासाचा प्रवास दाखविण्यात येणार आहे. भारत चित्रपटात भरपूर एक्शन ड्रामा आणि सर्कस आणि त्यातील साहसी दृश्येही चाहत्यांना पाहता येणार आहेत. या चित्रपटाचे ट्रेलर 24 एप्रिलला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. भारतमध्ये सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्यासोबतच दिशा पटनी, जॅकी श्रॉफ, तब्बू ,सोनाली कुलकर्णी, सुनील ग्रोव्हर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.


 

भारत सलमान - कतरिनाचा सहावा चित्रपट


सलमान आणि कतरिनाची जोडी नेहमीच हीट जोडी ठरते. त्या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना फार आवडते. सलमान आणि कतरिनाने यापूर्वी पाच चित्रपटात एकत्र काम केले असून या दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.  मैंने प्यार क्यू किया, पार्टनर, टायगर, टायगर जिंदा है, युवराज या पाचही चित्रपटांमध्ये यापूर्वी या जोडीने एकत्र काम केलं होतं. आता भारत हा त्या दोघांचा एकत्र काम करत असलेला सहावा चित्रपट असणार आहे.


Bharat new look


नेहा कक्कर नशेमध्ये, जमिनीवर पडल्याचा व्हिडिओ व्हायरल


देशभक्तीचा चित्रपट करणारी आलिया नाही करणार मतदान


प्रेग्नन्सीबाबत दीपिका पदुकोणने केला ‘हा’ खुलासा


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम