रोहित शेट्टी कँम्पमध्ये पहिल्यांदाच सलमानची एंट्री

रोहित शेट्टी कँम्पमध्ये पहिल्यांदाच सलमानची एंट्री


 

 

 


View this post on Instagram


 

 

Here’s Bajirao, Simmba and Sooryavanshi along with our creator, @itsrohitshetty signing off from the #Umang show tonight 🙌🏻


A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on

रोहित शेट्टी आपल्या अॅक्शनपॅक्ड चित्रपटांसाठी ओळखला जातो. रोहित शेट्टीचा चित्रपट म्हणजे फुल एंटरटेनमेंटचा डोस आणि मालमसाला. अजय देवगणपासून रणवीर सिंगपर्यंत रोहित शेट्टीने बॉलीवूडमध्ये प्रेक्षकांना ‘सिंघम’ आणि ‘सिम्बा’च्या पॉवर तर दाखवली आहे. आता अक्षयकुमारला घेऊनही रोहित पहिल्यांदाच ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट करत आहे आणि आता त्याच्या आणि सलमानच्या चाहत्यांसाठीही एक आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे पहिल्यांदाच रोहित शेट्टी कँपमध्ये सलमानची दमदार एंट्री होणार आहे. सलमानने आतापर्यंत अनेक अॅक्शनपॅक्ड चित्रपट केले आहेत. मात्र रोहितबरोबर त्याने एकदाही काम केले नाही. पण एका वेबने दिलेल्या माहितीनुसार, लवकरच सलमानदेखील रोहित शेट्टीच्या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाचं नाव निश्चित झालं नसलं तरीही या चित्रपटाचा पहिला स्लॉट हा या वर्षाच्या शेवटी फ्लोअरवर जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.


dabangg salman
हा चित्रपटदेखील असणार पोलीस ड्रामा


या चित्रपटातदेखील संपूर्ण पोलीस ड्रामा असणार आहे. सलमानने याआधी दबंग सिरीजमधून पोलीस ऑफिसरची भूमिका केली असून प्रेक्षकांमध्ये चुलबुल पांडे खूपच प्रसिद्ध आहे. पण रोहित शेट्टीच्या चित्रपटातील पोलीस ऑफिसर हे वेगळेच आणि अधिक डॅशिंग असतात. त्यामुळे आता या चित्रपटामध्ये सलमान खानच्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव काय असणार आणि तोदेखील मराठी असणार का याची आता नक्कीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.साजिद आणि रोहितची पसंती सलमानला


या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला करणार असून साजिद आणि रोहितची मीटिंग झाली असता यासाठी सलमानच दोघांचीही पहिली पसंती असल्याचं म्हटलं जात आहे. शिवाय सलमान अशा कॅरेक्टरमध्ये परफेक्ट फिट होत असल्यामुळेच सलमानबरोबर रोहितला काम करावं वाटलं असेल असंही म्हटलं जात आहे. रोहितने आतापर्यंत गोलमाल सिरीज, सिंघम सिरीज आणि सिम्बासारखे मसालेदार चित्रपट बॉलीवूडला दिले आहेत. सिंघम आणि सिम्बाचा प्लॉट जर सारखा वाटत असला तरीही प्रत्येक चित्रपटाची एक वेगळी कथा रोहितची असते आणि तो त्या कथेला योग्य न्याय देतो त्यामुळेच त्याचे चित्रपट हिट होतात. शिवाय बॉलीवूडमधील प्रत्येक हिरो रोहित शेट्टीबरोबर काम करण्यास सध्या उत्सुक आहे. सिम्बाच्या यशाने रोहितने हे सिद्ध केलं आहे.‘सूर्यवंशी’देखील पोलीस ड्रामा


रोहित शेट्टीच्या सिम्बामधून त्याने सूर्यवंशीची झलक दिली होती. ‘सूर्यवंशी’मधून पहिल्यांदाच अक्षयकुमार रोहित शेट्टी कँपमध्ये काम करत आहे. तर हा चित्रपटदेखील पोलीस ड्रामाच आहे. पण असं असलं तरीही या चित्रपटांची स्टोरीलाईन नक्की काय असणार आहे याची कोणालाही कल्पना नाही. ही गोष्ट अजूनही गुलदस्त्यातच आहे. शिवाय पुन्हा एकदा सिंघम आणि सिम्बा सूर्यवंशीमध्ये दिसणार का असे प्रश्नदेखील प्रेक्षकांच्या मनात यायला लागले आहेत. पण अर्थातच याची उत्तरं रोहित शेट्टी आपल्या चित्रपटातूनच देणार आणि हे कळण्यासाठी प्रेक्षकांना रोहित शेट्टीचा चित्रपट बघायला जावंच लागणार हे नक्की. पण सलमान खानच्या चित्रपटाबद्दल अजूनही कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण याच्या चर्चेला नक्कीच सुरुवात झाली आहे. शिवाय रोहित शेट्टीच्या चित्रपटामध्ये संवादही अप्रतिम असतात. त्यामुळे या चित्रपटामध्येही संवादाने सलमान आणि रोहित पुन्हा प्रेक्षकांचं मन जिंकून घेणार का हे आता लवकरच कळेल. 


फोटो सौजन्य - Instagram 


हेदेखील वाचा - 


‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’ राखी सावंतने या गोष्टीसाठी लावलाय ‘कानाला खडा’


प्रेमवीरांची दांडी गुल करायला आले 'दांडी गुल' गाणे


'लकी' सिनेमाचं टायटल ट्रॅक झालं रिलीज