सलमान खानची धमकी, लवकरच सोडणार ‘बिग बॉस’

सलमान खानची धमकी, लवकरच सोडणार ‘बिग बॉस’

बिग बॉस आणि सलमान खान हे गेले कित्येक सीझनचं समीकरण झालं आहे. बिग बॉसच्या विकेंड वार मध्ये येऊन सलमान नेहमी घरच्या स्पर्धकांची शाळा घेतो. सलमान खानची जबरदस्त लोकप्रियता आहे. बिग बॉस सलमान खानशिवाय अपूर्ण म्हटलं जातं. सलमानची स्पर्धकांशी असलेली जवळीक असो अथवा त्यांची घेतलेली शाळा असो या सगळ्या गोष्टी नेहमीच प्रसिद्ध होत असतात. पण आता खुद्द सलमानने आता बिग बॉस सोडणार असल्याची धमकी दिली आहे. या आठवड्यात झालेल्या विकेंडच्या वारमध्ये सलमानने आपण शो सोडणार असल्याची धमकी दिली आहे. या आठवड्यात ‘पागलपंती’ चित्रपटाची पूर्ण टीम आली होती. अनिल कपूर, पुलकित सम्राट, उर्वशी रौतेला आणि क्रिती खरबंदा हे सगळेजण आले होते. स्टेजवर यावेळी मजामस्ती चालली होती. त्यावेळी सलमान खानदेखील टास्क करत होता. अनिल कपूरने त्यावेळी सलमानने विचारलं की, हा तुझा कितवा सीझन चालू आहे. त्यावेळी आपण हा दहावा सीझन होस्ट करत असल्याचं सलमानने सांगितलं. 

Bigg Boss 13: सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाझ गिल गजाआड

दस झाले बस - सलमान

मजामस्ती करतानाच सलमानने ही धमकी दिली आहे. सलमान म्हणाला की, आतापर्यंत दहा सीझन केले आहेत. दस झाले बस असंही सलमान म्हणाला. इतकंच नाही तर कलर्सवाले जोपर्यंत पैसे वाढवत नाहीत तोपर्यंत मी पुढचा सीझन करणार नाही असंही सलमान म्हणाला. सलमान खूपच मस्ती करत होता. यावेळी आता हे खूप झालं असंही त्याने मजेत म्हटलं. सलमानने अशा प्रकारची मजामस्ती नेहमीच केली आहे. पण सर्वांनाच माहीत आहे की, बिग बॉस हा रियालिटी शो सलमानशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे दरवर्षी सलमान जितकी फी या रियालिटी शो साठी सांगतो तितकी त्याला ती मिळते. कारण हा शो म्हणजे सलमान असंच समीकरण झालं आहे. दरवर्षी सलमान एका भागासाठी किती करोड घेतो याची एक तरी बातमी असतेच. सलमान वर्षभरात जितकं कमावत नसेल तितकं तीन महिन्याचा विकेंड वार करून कमावत असेल असंही म्हटलं जातं. 

Bigg Boss 13: स्ट्राँग स्पर्धक सिद्धार्थ शुक्लाची एक चूक महागात, झाला बेघर

या विकेंडला अरहान खान घराबाहेर

सध्या बिग बॉसचा तेरावा सीझन खूपच गाजतोय. रोज काही ना काही प्रकरणं. त्यात सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाईची भांडणं. अरहान खानचा प्रवेश. त्यामुळे रश्मी आणि अरहान लग्न अफवा खरी होणार का असेदेखील प्रश्न प्रेक्षकांना पडले होते. पण आता या सगळ्या अफवांना ब्रेक लागला आहे. कारण या विकेंडला रश्मी  देसाईचा तथाकथित बॉयफ्रेंड अरहान खान घराबाहेर पडला आहे. या विकेंडला कमी मतं मिळाल्यामुळे अरहान खान घराबाहेर पडला आहे. पण हिमांशी खुराणा आणि खेसारीलाल यादव या दोघांवरही या आठवड्यात काहीही न केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. तसंच या दोघांनी घराबाहेर जावं असं प्रेक्षकांनाही वाटत आहे. पण सलमान खानने या सगळ्यांचीच विकेंडला शाळा घेतली आहे. अरहान खान केवळ दोन आठवडे घरात टिकून राहिला. शिवाय या दोन आठवड्यात त्याचं जास्त लोकांशी त्याचं पटलंही नाही. कदाचित चुकीच्या लोकांच्या साथीमुळे अरहान घराबाहेर आल्याचंही अनेक प्रेक्षकांचं म्हणणं आहे. तर अरहानने बाहेर आल्यानंतर काही  दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे की, त्याचं घराबाहेर येणं त्याला पटलेलं नाही. 

#BiggBoss13 : रश्मी देसाई सर्वाधिक लोकप्रिय बिग बॉस कंटेस्टंट

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.