गेल्या वर्षीपासून थिएटरमध्ये जाऊन एखादा चित्रपट पाहण्याचा जणू सगळ्यांनाच विसर पडला आहे. कोरोना आल्यापासून आणि लॉकडाऊन सुरु झाल्यापासून लॉकडाऊन सुरु झाला तो इतका वाढला की, चित्रपटांचे थिएटरमध्ये रिलीज होणे त्यानंतर कधीही झाले नाही. अनेक बिग बजेट चित्रपट हे रिलीज होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. अनेकांनी ओटीटीवर चित्रपट रिलीज करुन टाकले. पण वर्षातून एकदाच म्हणजेच ईदला सगळ्या थिएटरमध्ये चित्रपट रिलीज करणाऱ्या सलमानने त्याच्या आगामी चित्रपटाचे थिएटर बुकिंग करायला सुरुवात केली आहे. चित्रपटांसंदर्भात आणि थिएटर संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती नसताना आता थिएटरमध्ये सलमान कसा काय चित्रपट प्रदर्शित करेल असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. जाणून घेऊया सलमानच्या डोक्यात आहे तरी काय?
मराठमोळा राहुल वैद्य ‘खतरों के खिलाडी’ होणार, 11 व्या हंगामासाठी होकार
भारतात नाही तर या ठिकाणी होणार चित्रपट रिलीज
सध्या देशाची परिस्थिती गंभीर असताना पुढील काही काळात चित्रपट रिलीज करणे शक्य नसल्याचे दिसत आहे. असे असताना सलमानचा चित्रपट थिएटरमध्ये कसा रिलीज होईल असा प्रश्न पडणे स्वाभाविका आहे. खरंतर सलमानने आणि या चित्रपटाच्या टीमने केलेल्या पोस्टमुळे सगळ्या गोंधळ उडाला. सलमानने मिलते है थिएटर मै… अशी ओळ लिहिली असली तरी देखील त्यापुढे UAE असा उल्लेख करण्यत आला आहे. आता तुम्हाला कळलंच असेल की, देशात नाही तर परदेशात हा चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे. सलमानचे चाहते हे संपूर्ण जगात आहेत. पण सध्या ज्या देशांमध्ये चित्रपट रिलीज करणे शक्य आहे असे देश म्हणजे मध्य पूर्वेकडील सगळे देश यामध्ये दुबई, कतार, कुवेत, सौदी अरेबिया आणि बेहरीन या देशांचा समावेश आहे. या देशांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार असून त्याचे बुकिंगही सुरु झाले आहे.
रूचिता जाधव अडकतेय विवाहबंधनात, लग्नविधीला सुरूवात
असे करता येईल बुकिंग
एसके फिल्मसने दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरु झालेले आहे. हे बुकिंग ऑनलाईन पद्धतीने केले जाणार आहे. परदेशातील काही सिनेमागृहांची नावे देखील देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर याचे तिकिट मिळणार आहे. येत्या 13 मे रोजी ईदचे मुहूर्त साधत हा चित्रपट रिलीज केला जाणार आहे. त्यामुळे सलमानच्या चाहत्यांनी आधीच या संकेतस्थळावर बुकिंग करण्यास सुरुवात केलेली आहे.
पुन्हा भेटीला येणार ‘जिवलगा’ मालिका
भारतीयांसाठी ओटीटी
भारतात अजूनही थिएटर उघण्याची शक्यता कमी असल्यामुळे भारतीयांना या चित्रपटाचा आनंद हा ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन घेता येणार आहे. पण या रिलीजला विरोध करण्यात आला आहे. सलमानने हा निर्माता म्हणून चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.कारण त्याच्या दृष्टिकोनातून त्याने त्याच्या फॅन्सना ही गोष्ट आधीच सांगितलेली आहे. पण असे असले तरी देखील त्याने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक चित्रपट याचे अनुकरण करतील. त्यामुळे थिएटरमध्ये मिळणारा निधी हा थिएटर चालकांना मिळणार नाही. प्रेक्षक ओटीटीवर रिलीज होण्याची वाट पाहतील ज्यामुळे नक्कीच इतर चित्रपटांचे नुकसान होईल. सलमान खानच्या चित्रपटांबद्दल कोणतीही शंका नाही. कारण सलमानचा चित्रपट कमाई करणार यात शंका नाही. पण इतर चित्रपटांच्या बाबतीत तितका प्रतिसाद मिळेल का अशी शंका आहे. त्यामुळे हा निर्णय सध्या लांबणीवर टाकला आहे.
आता राधे ओटीटीवर कधी प्रदर्शित होईल माहीत नाही. पण परदेशातील त्याच्या फॅन्सना याचा आनंद नक्कीच घेता येणार आहे.