सलमानच्या आयुष्यातील Unknown फॅक्टसचा सलमान करणार उलगडा

सलमानच्या आयुष्यातील Unknown फॅक्टसचा सलमान करणार उलगडा

गेल्या साधारण महिन्याभरापासून आपण सगळे घरी आहोत. मुंबईत सगळं काही एकदम ठप्प झालं आहे. मनोरंजन विश्वसुद्धा एकदम थांबून गेलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटी घरी राहून काहीना काही करत आहेत. आपला Me टाईम घालवत आहेत. अनेकांनी कुकींग आणि त्यांचे वर्कआऊट व्हिडिओही पोस्ट केले आहेत. सलमान खानने एका वेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर येण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तो आपल्यासमोर आधी येतच आहे. पण आता तो युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासंदर्भातील घोषणा तो लवकरच करणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना त्याच्या या युट्यूब चॅनलची उत्सुकता आहे.

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नवऱ्याला कोरोनाची लागण, मात्र रुग्णालयात करून घेतले नाही दाखल

काय असणार युट्यूब चॅनलचे नाव

Instagram

अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आहेत. अनेकांचे युट्यूब चॅनल आहे. सलमानचे स्वत:चे युट्यूब चॅनल नाही. म्हणूनच त्याने या माध्यमातून येण्याचा निर्णय घेतला आहे. सलमान खानच्या या युट्यूब चॅनलचे नाव Being Salman Khan असल्याचे सांगितले जात आहे. एका इंटरटेन्मेंट वेबासाईटने दिलेल्या माहितीनुसार त्याने त्याच्या चॅनलचे नाव नक्की केले आहे. आता यावर कोणते व्हिडिओ सलमान खान टाकणार असा प्रस्न असेल तर सलमानच्या खासगी जीवनातील काही महत्वाच्या गोष्टी सांगणारे हे चॅनल असणार आहे. इतर कोणत्याही कलाकाराप्रमाणे त्यानेही स्ट्रगल पाहिला आणि त्याहीपेक्षा कॉन्ट्राव्हर्सीजलाही सामोरे गेला. या सगळ्या गोष्टी तो आपल्या या माध्यमातून शेअर करणार आहे.

अल्लादीन फेम अवनीत कौरने भावाला दिलं खास सरप्राईज

Unknown फॅक्टस सांगणार सलमान

सलमानच्या आयुष्यातील कॉन्ट्राव्हर्सीज सांगायच्या झाल्या. तर त्याच्या लव्ह लाईफबद्दल नेहमीच चर्चा रंगतात. अगदी आताही तो कोणाला डेट करतो यामध्ये अनेकांना रस असतो. सलमान अजूनही सिंगल असला तरी त्याच्या आयुष्यातही हार्ट ब्रेक करणारे अनेक क्षण आले आहेत. आता सलमानच्या या चॅनलवर तो या Unknown फॅक्ट्सचा उलगडा करेल अशी अपेक्षा सगळ्यांना आहे. त्यामुळे आता इतर कोणत्याही गॉसिप ऐकण्यापेक्षा सलमानच्या आयुष्यातील अनेक गोष्टी तो त्याच्या फॅन्ससाठी या माध्यमातून मांडणार आहे. 

ऐश्वर्याने 'या' कारणांमुळे केला होता सलमानशी ब्रेकअप

सलमान सध्या आहे त्याच्या फार्महाऊसवर

View this post on Instagram

Breakfast with my love...

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

लॉकडाऊनमुळे अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी अडकली आहेत. सलमानही त्याच्या फार्महाऊसवर अडकला आहे. सगळ्यांनी घरीच राहण्याचा सल्ला दिल्यामुळे तो मुंबईकडे यायला निघालाही नाही. उलट तो त्याच्या फार्महाऊसवर अगदी आरामात राहत आहे. त्याने त्याचे कितीतरी फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. त्याच्या फार्महाऊसमधून शेअर केलेल्या व्हिडिओची सगळीकडे सध्या चर्चा आहे. 

लवकरच करेल घोषणा

Instagram

सलमानच्या या युट्यूब चॅनलची माहिती बाहेर पडली असली तरी अजून सलमान यावर काहीच बोलला नाही. मिळालेल्या माहितीनुसार सलमान लवकरच याची घोषणा करणार आहे आणि लवकरच पहिला व्हिडिओ पोस्ट करणार आहे. 


आता सलमानच्या चाहत्यांनो त्याचे युट्यूब चॅनल आले की, ते लगेच सबस्क्रईब करा आणि त्याच्या आयुष्यातील माहीत नसलेल्या गोष्टीही जाणून घ्या.