Saaho मध्ये करणार का सलमान खान कॅमिओ

Saaho मध्ये करणार का सलमान खान कॅमिओ

बाहुबलीच्या उत्तुंग यशानंतर साऊथ सुपरस्टार प्रभास Saaho या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची जोरदार तयारी सुरु आहे. हा आणखी एक मेगा हिट असणार असे म्हटले जात आहे. या चित्रपटात प्रभाससोबत श्रद्धा कपूर दिसणार आहे. या चित्रपटासंदर्भातील व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर येत असतात. पण आता आणखी एका बॉलीवूडस्टारचे नाव या चित्रपटाशी जोडले गेले आहे. ते नाव आहे दबंग सलमान खानचे… मिळालेल्या माहितीनुसार सलमान खान या चित्रपटात कॅमिओ करणार असे कळत आहे. त्यामुळे सलमान आणि प्रभास फॅनसाठी बिग बोनांझा असणार आहे.


सैफच्या मिशांसोबत खेळताना करीना झाली ट्रोल


सलमानच्या कॅमिओवर चर्चा


salman bharat


Saaho हा चित्रपट आता रिलीजच्या अगदी जवळ आहे. चित्रपटाचे शुटींगही आटोपले आहे. आता लोकांना या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतिक्षा असताना सलमान खान या चित्रपटात कॅमिओ करणार असल्याचे कळत आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शकाने सलमानकडे या संदर्भात विचारणा केली असून जर सलमानने कॅमिओ करण्याला होकार दिला. तर खास त्याच्यासाठी एक वेगळा भाग शूट करण्यात येणार आहे आणि तो चित्रपटात टाकला जाणार आहे. सलमानचे नाव या चित्रपटात निगेटिव्ह भूमिका साकारणाऱ्या नील नितीन मुकेश यांनी केले आहे असे कळत आहे. त्याच्या सांगण्यावरुनच सलमानला ही विचारणा करण्यात आली आहे. आता सलमान करणार का कॅमिओ याचीच प्रतिक्षा आहे.


इमरान आणि अवंतिकाच्या नात्यात आला दुरावा


नुकताच प्रभासने शेअर केला होता व्हिडिओ
 

 

 


View this post on Instagram


 

 

Hello darlings... A surprise coming your way, tomorrow. Stay tuned... #SaahoSurprise


A post shared by Prabhas (@actorprabhas) on
प्रभासने काहीच दिवसांपूर्वी त्याचे इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु केले आहे.त्याने त्याच्या अकाऊंटवरुन फार काही फोटो शेअर केले नसले तरी त्याने शेअर केलेला नवा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवर सगळीकडे दिसत आहे. प्रभास या व्हिडिओमध्ये saaho संदर्भात घोषणा केली आणि दुसऱ्या दिवशी त्याने त्याच्या फॅन्ससाठी saahoचं पोस्टर शेअर केलं.हा चित्रपट येत्या 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. त्यामुळे यंदा स्वातंत्र्य दिनाला अक्षय कुमार नाही तर प्रभास भेटीला येणार आहे.


मेकअपमध्ये दिसणार रिंकू राजगुरु


सलमानने आधीही केले आहेत कॅमिओ


सलमानने या आधीही कित्येक चित्रपटात कॅमिओ केले आहेत. रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ या मराठी चित्रपटात रितेशला त्याने कॅमिओ करण्याची इच्छा व्यक्त करुन दाखवली. त्यावेळी चित्रपटाच्या चित्रीकरणानंतरही सलमानसाठी एक वेगळे शूट करण्यात आले आणि तो पॅच चित्रपटात टाकण्यात आला. मराठी चित्रपटात पहिल्यांदाच सलमान दिसल्यामुळे सलमानच्या फॅन्सना देखील आनंद झाल होता. रितेशचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच चालला होता. या शिवाय सलमानने  ‘झिरो’, ‘बागवान’, ‘हॅलो’, ‘जुडवा2’, ‘ओम शांती ओम’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’, तिस मार खान, सन ऑफ सरदार’ अशा अनेक चित्रपटात त्याने कॅमिओ केले आहेत. हे सगळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले चांगले देखील आहेत.


सलमान सध्या 'भारत'मध्ये व्यग्र


salman bharat 2


सलमान सध्या तरी त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. अगदी काहीच दिवसांवर त्याचा हा चित्रपट येणार आहे. म्हणजे ५ जूनच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होणार आहे. त्यामुळे सध्या तरी सलमान या सगळ्यात व्यग्र आहे. सलमानसोबत या चित्रपटात कतरिना कैफ प्रमुख भूमिकेत आहे. 


(फोटो सौजन्य- Instagram)