#Viralvideo : समीरा रेड्डीने सांगितला प्रेग्नन्सीचा ‘खरा’ पैलू

#Viralvideo : समीरा रेड्डीने सांगितला प्रेग्नन्सीचा ‘खरा’ पैलू

अभिनंदन...अभिनंदन...अभिनेत्री समीरा रेड्डीला गोड मुलगी झाल्याची बातमी तिने इन्स्टावर शेअर केली. समीरा ही 34 वर्षांची असून तिने तामिळ, तेलुगू आणि हिंदी अशा तिन्ही भाषांमध्ये काम केलं आहे. तिने मार्च महिन्यात ती पुन्हा एकदा प्रेग्नंट असल्याचं जाहीर केलं होतं. तेव्हापासून तिने अनेकदा इन्स्टावर तिचे बेबी बंप फ्लाँट करणारे फोटोज आणि मातृत्वाबद्दलचे अनुभव शेअर केले. 

समीराचा व्हायरल व्हिडिओ

या प्रेग्नन्सीदरम्यान तिने खास अंडरवॉटर मॅटर्निटी शूटही केलं. ज्यामध्ये ती फारच सुंदर दिसत होती. प्रेग्नन्सीमध्ये बिकीनी घालून तेही अंडरवॉटर शूट करण्याचं तिचं धाडस खरोखरच उल्लेखनीय आहे. चेहऱ्यावर कोणताही थकवा नाही ताण नाही, ती या फोटोशूटचा प्रत्येक क्षण जणू काही जगली आहे. 

प्रेग्नन्सीचा खरा पैलू

याच फोटोशूटचा खास व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर नुकताच पोस्ट केला. ज्यामध्ये समीराने सांगितलं की, या प्रेग्नन्सीदरम्याने तिने कोणताही मेकअप आणि ड्रामा टाळून रिअल लुकमध्ये हे सर्व शूट केलं. तसंच तिनेही हेही सांगितलं की, इंडस्ट्रीत वावरल्यानंतरही स्वतःवर प्रेम करण्याचा आणि जे जसं आहे तसं स्वीकारण्याचा कठीण मार्ग निवडला. या मॅटर्निटी शूटसाठी तिने खास #ImperfectlyPerfect म्हणजेच अपूर्णतेत पूर्णता हा हॅशटॅग वापरला आहे. 

Instagram

प्रेग्नन्सीच्या काळात अनेकींना आपलं वाढलेलं वजन आणि आकारामुळे न्यूनगंड वाटू लागतो. नेमकं याच मुद्द्यावर समीराने बोट ठेवलं आहे. या व्हिडीओमध्ये तिने स्वतःकडे सकारात्मकरित्या पाहणे आणि स्वतःवर प्रेम करणे या गोष्टींवर भर दिला. यासाठी दिलेल्या खास कॅप्शनमध्ये तिने लिहीलं आहे की, मला नवव्या महिन्यातील बेबी बंपचं सौंदर्य कैद करायचं होतं. या काळात आपण कधी खूप उत्साही असतो, कधी थकलेल तर कधी घाबरलेले असतो. सतत आपल्या बाळाची काळजीही करत असतो. पण सकारात्मक राहा. आपण स्वतःला कोणत्याही परिस्थितीत स्वीकारायलाच हवं. 

तसंच तिने हेही लिहीलं आहे की, हे माझं खरं रूप आहे. आता मी माझ्या मुलाला जन्म देण्यासाठी तयार आहे. मला एवढचं सांगायचं आहे की, मी कोणत्याही मेकअपशिवाय आणि सकाळी उठल्यावर दिसणारा पाहिला. तसंच मी मेकअपशिवाय कॅमेराही फेस केला आहे. माझ्यासाठी हे सर्व करणं खूप महत्त्वाचं होतं.

समीराचं उत्तर

खरंतर हा व्हिडिओ आणि अंडरवॉटर शूट हे तिच्यावर बॉडी शेमिंग करण्याऱ्यांसाठी सडतोड उत्तर आहे. कारण पडद्यावर दिसणारं अभिनेत्रीचं रूप आणि खऱ्या आयुष्यातील खासकरून प्रेग्नन्सीच्या काळातील रूप हे स्वीकारलं गेलं पाहिजे. समीराचं हे धाडसी पाऊल इतरही सेलिब्रिटीज फॉलो करतील अशी आशा करूया.

समीराने 2010 साली आलेल्या प्रियदर्शन निर्मित आक्रोशनंतर इंड्स्ट्रीतून ब्रेक घेतला आणि तिने मोटारसायकल प्रेमी अक्षय वर्दे याच्याशी लग्न केलं. या दोघांना 4 वर्षांचा गोड मुलगा असून या कुटुंबात आता गोड मुलगी म्हणजेच चौथा सदस्य दाखल झाला आहे.


 

सर्वच गरोदर स्त्रियांनी समीराच्या या धाडसी निर्णयातून बरंच काही शिकण्यासारखं आहे. फक्त चांगल दिसणं हे महत्त्वाचं नसून मातृत्वाचे क्षण जगणं, ते एन्जॉय करणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

हेही वाचा -

Pregnant समीरा रेड्डीचं अंडरवॉटर हॉट फोटोशूट, फोटो व्हायरल

पाहा अभिनेत्री समीरा रेड्डीच्या बेबी शॉवरचे सुंदर फोटोज

समीराने केलं ट्रोलर्सचं तोंड बंद, म्हणाली मी करिना नाही