समीरा रेड्डीने मुलीसोबतचा फोटो शेअर करत दिला हा पावरफुल मेसेज

समीरा रेड्डीने मुलीसोबतचा फोटो शेअर करत दिला हा पावरफुल मेसेज

बॉलीवूड अभिनेत्री समीरा रेड्डी (Sameera Reddy) सोशल मीडियावर आपल्या आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टी शेअर करत असते. मग तो तिचा प्रेग्न्ंसीबद्दलचा अनुभव असो वा मुलीचे क्युट फोटोज असोत. नुकतंच समीराने तिच्या मुलीचा फोटो तर शेअर केलाच पण त्यासोबतच दिला एक चांगला मेसेजही.

समीराला काही महिन्यापूर्वीच मुलगी झाली. पहिला मुलगा झाल्यानंतर समीराने कुटुंबात मुलगी हवीच यासाठी दुसऱ्यांदा चान्स घेतला. तिच्या मुलीचं नाव आहे नायरा. जी दिसायला फारच क्युट आहे. पाहा नायराचा हा क्युट व्हिडिओ.

समीरा (Sameera) ने हा फोटो शेअर केला आणि त्यासोबतच्या कॅप्शनमध्ये लिहीलं की, 'मुलगी होणं ही खरंच किती आनंदाची गोष्ट आहे. मला हे कळत नाही की, आपल्या देशात लोकं मुलींना ओझं का समजायचे. मी ‘समजायचे’ यासाठी म्हणत आहे, कारण मी आशा करते की, आता लोकांची ही समजूत बदलली असेल.

तिने पुढे असंही लिहीलं आहे की, 'मी आजही हे ऐकते की, मोठ्या कुटुंबामध्ये पहिला मुलगा होणं पसंत केलं जातं. पण मी हे सांगू शकते की, माझ्या कुटुंबात आम्ही तिघी मुली आहोत आणि आम्ही कोणत्याही मुलापेक्षा जास्त यश मिळवलं आहे.'

कारण आजही आपल्याकडे मुलगी झाली म्हटल्यावर बऱ्याच ठिकाणी नाकं मुरडली जातात किंवा पहिली मुलगी असल्यास जास्त आनंद साजरा केला जात नाही. हे चित्र शहरात जरी दिसत नसली तरी खेडेगावात आणि भारतातल्या काही भागात आजही परिस्थिती भीषण आहे. त्यामुळे समीरासारखेच अनेक सेलेब्स याबाबत पुढे येऊन जनजागृती करत असतात.

समीरा रेड्डीचा हा मुलीसोबतचा फोटो खूप पसंत केला जात आहे. त्यासोबतच तिने दिलेला मेसेजही तिच्या फॅन्सना खूप आवडत आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल असून त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

नुकताच समीराने सोशल मीडियावर एक व्हिडिओही शेअर केला होता. ज्यामध्ये ती दोन महिन्याच्या नायरासोबत कर्नाटकातील एका डोंगराच्या सर्वात उंच टोकावर चढण्याचा प्रयत्न केला होता. 

 

समीरा नेहमीच वुमन एंपावरमेंटबाबत मेसेज देत असते. तिने तिचा एका जुना फोटोही शेअर केला होता. हा फोटो शेअर करत समीराने म्हटलं की, एकेकाळी माझ्या या लुकवरून मला खूप जज करण्यात आलं होतं. चांगलं दिसण्याचं जणू प्रेशरचं तारूण्याच्या काळात होतं. एक प्रेमळ नवरा आणि दोन मुलं असूनही आजही कधी कधी असा त्या क्षणांची आठवण येते. जेव्हा मला चिंता आणि माझ्याच शरीराबाबत साशंकता वाटायची. समीराच्या या पोस्टमधून हाच संदेश आपल्याला सगळ्याजणींना मिळतो की, स्वतःच्या शरीरावरून स्वतःला कधीही जज करू नका. बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्य आणि आरोग्य हे जास्त महत्त्वाचं आहे. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.