Pregnant समीरा रेड्डीचं अंडरवॉटर हॉट फोटोशूट, फोटो व्हायरल

Pregnant समीरा रेड्डीचं अंडरवॉटर हॉट फोटोशूट, फोटो व्हायरल

समीरा रेड्डी गेल्या काही महिन्यांपासून तिच्या गरोदरपणातील फोटोंमुळे चर्चेत आहे. समीराचं उद्योगपती अक्षय वर्देबरोबर लग्न झालं असून तिला एक मुलगा आहे. तिचं हे दुसरं गरोदरपण असून सध्या तिचा हा गरोदरपणाचा काळ ती खूपच एन्जॉय करताना दिसत आहे. काही दिवसापूर्वीचे तिचे डोहाळ जेवणाचे फोटोही व्हायरल झाले होते. ज्यामध्ये अगदी पारंपरिक पद्धतीने साडी नेसून तिने सर्व काही रितीरिवाज पूर्ण करून घेतले होते. पारंपरिकता आणि आधुनिकता याचा मेळ साधत समीरा आपला हा काळ खूपच आनंदात घालवत आहे. नुकतंच तिने पाण्याखाली अर्थात underwater फोटोशूट करून घेतलं असून यामध्ये तिचा हा हॉट अंदाज प्रेक्षकांना आणि तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत. 

समीराचं ‘हटके’ फोटोशूट

याआधी अनेक अभिनेत्रींनी आपल्या गरोदरपणामध्ये बेबी बंप फ्लाँट करून फोटोशूट करून घेतलं आहे. अगदी करिना कपूर खानपासून हा ट्रेंडला सुरुवात झाली. त्यानंतर नेहा धुपिया, सोहा अली खान यांचेही गरोदरपणातील फोटो व्हायरल झाले होते. पण समीराने अगदीच हटके फोटोशूट करून घेतलं आहे. समीराने गरोदरपणामध्ये पाण्याखाली जाऊन आपलं फोटोशूट करून घेतलं आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत असून तिने खूप आनंदाने बेबी बंप फ्लाँट केलं आहे. तिने बिकिनी घालून दिलेल्या पोझही खूपच सुंदर दिसत आहेत. गरोदरपणातील आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. समीराचा हा नववा महिना चालू आहे. याआधी कोणत्याही अभिनेत्रींनी अशा प्रकारे पाण्याखाली जाऊन नवव्या महिन्यात शूट केलेलं बघायला मिळालं नाही. समीरा या परिस्थितही अगदी छान असून व्यवस्थित हालचाल करत आहे. नवव्या महिन्यातही तिच्या शरीराची लवचिकता अतिशय चांगली असल्यामुळे तिचं आरोग्य अगदी व्यवस्थित असल्याचं दिसून येत आहे. 

फोटो शेअर करताना केल्या भावनाही व्यक्त

समीराने हे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करताना आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. समीराने कॅप्शन दिलं आहे की, ‘मी गरोदरपणाच्या नवव्या महिन्यात बेबी बंपच्या या सुंदरतेचा आनंद घेऊ इच्छित होते. बऱ्याचदा अशा वेळी अतिशय थकवा आलेला असतो, घाबरलेले असतो पण तितकाच उत्साह असतो आणि आनंदही असतो. अशा सगळ्या भावना मिक्स असतात. मला हा माझा आनंद तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करावासा वाटत आहे आणि मला माहीत आहे की, मला नक्कीच सकारात्मक वाटेल. कारण आपण सगळेच आपल्या आयुष्यात विविध फेजमध्ये वेगवेगळ्या शेपमध्ये असतो. प्रत्येक स्तरावर आपल्याला स्वत:वर प्रेम करण्याची गरज असते, #imperfectlyperfect @luminousdeep तुम्ही खूपच प्रतिभावान आहात. धन्यवाद’ यामध्ये तिने आपल्या फोटोग्राफरचेही आभार मानले आहेत. 

समीरा याआधी झाली होती ट्रोल

समीरा याआधी तिच्या गरोदरपणातील तिच्या जाडेपणामुळे ट्रोल झाली होती.  पण त्यावर तिने ट्रोलर्सना सणसणीत उत्तर देऊन त्यांचं तोंड बंद केलं होतं. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. त्यामुळे कोणालाही दुखावण्याचा कोणालाही अधिकार दिलेला नसतो. सध्या समीरा आपल्या गरोदरपणाचा आनंद घेत असून लवकरच तिच्याकडून गुड न्यूज येईल. त्याचीच तिचे चाहते वाट पाहत आहेत.