समीराने केलं ट्रोलर्सचं तोंड बंद, म्हणाली मी करिना नाही

समीराने केलं ट्रोलर्सचं तोंड बंद, म्हणाली मी करिना नाही

बॉलीवूड अभिनेत्री समीरा रेड्डी (Sameera Reddy) ने अक्षय वर्देबरोबर लग्न केलं असून आता ती दुसऱ्यांदा गरोदर आहे. गरोदरपणातला तिचा फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर बऱ्याच लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली होती. पण बॉडी शेमिंगबद्दल ऐकून न घेता समीराने ट्रोलर्सचं तोंड सडेतोड उत्तर देऊन बंद केलं आहे. समीराने दिलेलं उत्तर हे प्रत्येक गरोदर स्त्री साठी नक्कीच अभिमानास्पद आहे. गरोदरपणा ही एक देणगी आहे आणि प्रत्येक स्त्रीचं शरीर गरोदरपणामध्ये नक्कीच वेगळं होतं. त्यासाठी तिला बरंच काही भोगावंही लागतं. त्यामुळे गरोदरपणामध्ये कोणत्याही स्त्री ला अशा प्रकारे ट्रोल करणं कितपत योग्य आहे असा प्रश्नदेखील यानंतर उपस्थित होत आहे. समीराने दिलेल्या उत्तरामुळे नक्कीच ट्रोलर्सची तोंडं बंद झाली असणार. ट्रोल करण्याआधी लोकांनीही दहा वेळा या गोष्टीचा विचार करायला हवा. समीरा नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. मागील काही दिवसांपासून ती आपले गरोदरपणातील फोटो पोस्ट करत आहे. पण या फोटोंवर तिला ट्रोल करण्यात येत आहे. एका कार्यक्रमादरम्यान मात्र बॉडी शेमिंग करणाऱ्या या लोकांना समीराने खडेबोल सुनावले आहेत. इतकंच नाही तर त्यांची एक प्रकारे कानउघडणी केली आहे. समीराने म्हटलं, ‘मी या लोकांना एक प्रश्न विचारू इच्छिते की, तुम्ही कसे जन्माला आलात. तुम्हालादेखील एका आईनेच जन्म दिला आहे ना? तुम्हाला जन्म देताना तुमची आई हॉट होती का? लाज वाटायला हवी तुम्हाला. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जी अतिशय सुंदर आणि अप्रतिम असते.’


Sameera Reddy 7920757
इतकंच नाही तर समीरा रेड्डीने ट्रोलर्सला फटकारत असंही म्हटलं की, ‘करिना गरोदरपणानंतर लगेच शेपमध्ये आली. पण मी वेगळी आहे. मला पहिलं मूल झाल्यानंतरही शेपमध्ये यायला बराच वेळ लागला होता. मी करिना नाही. सर्वांचं शरीर वेगळं असतं. कदाचित मला दुसऱ्या गरोदरपणानंतरही शेपमध्ये यायला वेळ लागेल. ही गोष्ट स्वीकारणं अतिशय गरजेचं आहे. जसे तुम्ही आहात मीदेखील तशीच आहे. फक्त माझ्याजवळ सुपरपॉवर  आहे, ती म्हणजे मी मुलाला जन्म देऊ शकते.’


Bollywood actress Sameera Reddy 5380555
समीराने उद्योगपती अक्षय वर्देबरोबर 2014 मध्ये लग्न केलं. त्यानंतर 2015 मध्ये तिने मुलाला जन्म दिला. आता पुन्हा जुलैमध्ये ती दुसऱ्या बाळाला जन्म देण्यासाठी तयार आहे. पहिल्या बाळानंतर आपलं वजन आटोक्यात आणण्यासाठी समीरा आधी खूपच विचार करायची. पण आता तिला या गोष्टीने काहीच फरक पडत नाही. खरं तर दुसऱ्या गरोदरपणामध्ये ती अधिक आनंदी आणि उत्साही असल्याचं दिसून येत आाहे.


kareena
समीराने ट्रोलर्सना करिनाचं उदाहरण यासाठी दिलं कारण आपल्या गरोदरपणानंतर करिनाने वजन कमी केलं आणि त्यासाठी बरीच चर्चेमध्येही होती. तैमूर अली खानचा जन्म झाल्यानंतर 45 दिवसांतच करिना कपूर खानने आपलं फिटनेस रूटीन सुरु केलं होतं. डिलिव्हरीनंतर आपलं शरीर आकारात आणण्यासाठी तिने फिटनेस तज्ज्ञ नम्रता पुरोहितच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम सुरु केला तसंच आपली डाएटिशिअन ऋजुता दिवेकरच्या सल्ल्यानुसार, योग्य डाएटदेखील फॉलो केलं होतं. त्यामुळे 2 महीन्यात 15 किलो वजन करिनाने कमी केलं होतं.


फोटो सौजन्य - Instagram 


हेदेखील वाचा - 


‘कसौटी जिंदगी की’ फेम प्रेरणा आणि कोमोलिकाचं झालं सेटवर भांडण


तैमूरच्या 'नॅनी'चा किती आहे पगार, करीना कपूरने केला खुलासा


अडखळणाऱ्या इंग्रजीमध्ये मागितली मदत, सुषमा स्वराजच्या उत्तरांने जिकलं मन