जनता कर्फ्यूमध्ये तिने गमावलं आपल्या वडिलांना

जनता कर्फ्यूमध्ये तिने गमावलं आपल्या वडिलांना

'कुछ कुछ होता है 'मधली ती बबली आणि गोंडस छोटी अंजली आठवतेय. जी आपल्या बाबांवरील प्रेमापोटी त्यांचं पुन्हा प्रेम जुळवते आणि लग्नंही लावून देते. करण जोहरचा सुपरहिट सिनेमा कुछ कुछ होतो है मधलं आकर्षण ठरलेली आणि शाहरूख खानची मुलगी झालेली अभिनेत्री म्हणजे सना सईद. तिच्यासोबत घडली एक दुर्देवी घटना जाणून घेण्यासाठी वाचा.

एकीकडे संपूर्ण देशात जनता कर्फ्यू होता तेव्हा सना सईदसोबत एक अशी घटना घडली. ज्यामुळे ती हादरून गेली. त्याच दिवशी तिच्या वडिलांचा म्हणजे उर्दू कवी अब्दुल अहद सईद यांचा मृत्यू झाला. जे बऱ्याच काळापासून आजारी होते. त्याच्या काहीच दिवसांपूर्वी सना लॉस एंजलिसला गेली होती. त्यामुळे ती तिकडेच अडकली. एवढंच नाहीतर दुःखद गोष्ट म्हणजे तिला तिच्या बाबांना शेवटचं पाहताही आलं नाही. नुकतीच सलमानच्या कुटुंबातील व्यक्तीच्या निधनाची बातमीही आली होती. 

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं की, माझ्या वडिलांना मधुमेह होता आणि याच कारणामुळे त्याचे अनेक अवयव कार्यरत नव्हते. लॉस एंजलिसमध्ये असताना सकाळी 7 वाजता मला त्यांच्या मृत्यूची बातमी मिळाली. त्या क्षणी मला माझ्या घरी जाऊन माझ्या आई आणि बहिणीली मिठी मारायची होती. ज्या परिस्थितीत मी माझ्या वडिलांना गमावलं ते खूपच दुःखद आहे. पण मी मनात हे जाणून आहे की, ते खूप वेदनेत होते आणि आता ज्या ठिकाणी असतील ती जागा नक्कीच चांगली असेल.

जनता कर्फ्यूमुळे सनाच्या कुटुंबातील खूपच कमी लोकांच्या मदतीने वडिलांचे अंत्यविधी करावे लागले. याबाबत ती म्हणाली की, माझ्या कुटुंबियांनी त्याच दिवशी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आणि आमच्याकडे फक्त तीन तास होते. रस्त्यात त्यांना पोलिसांनी तपासणीसाठी थांबवलं. पण मृत्यूपत्र पाहताच त्यांनी जाण्याची परवानगी दिली. मी तिथे नव्हते पण माझी बहिणी मला सर्व माहिती देत होती.

'कुछ कुछ होता है' च्या भूमिकेसाठी सनाने बालकलाकार म्हणून खूप नाव कमावलं. त्यानंतर 2000 साली रिलीज झालेल्या बादल आणि हर दिल जो प्यार करेगा या चित्रपटात ती झळकली होती. या दोन चित्रपटानंतर सनाने मोठ्या पडद्यावरून ब्रेक घेतला आणि 2012 साली आलेल्या करण जोहरच्याच स्टुडंट ऑफ द ईयर मध्ये ती दिसली. या चित्रपटातही ती तिच्या हॉट लुक्समुळे लोकांचं मन जिंकण्यात यशस्वी झाली.

सिनेमासोबतच सनाने अनेक टीव्ही शोजही केले आहेत. ज्यामध्ये बाबुल का आंगन छूटे ना, लो हो गई पूजा ईस की, कॉमेडी सर्कस आणि लाल इश्कसारखे अनेक शोज तिने केले आहेत. तसंच ती रिएलिटी शो झलक दिखला जा, नच बलिए यांमध्येही दिसली होती.

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा. आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.