अनुराग कश्यपच्या मोस्ट अवेटेड ‘सांड की आँख’ चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. वृद्द महिलेच्या रुपात दिसणाऱ्या भूमी आणि तापसी यांच्या भूमिका या साध्या सुध्या महिलेच्या नाही तर शूटर आजींच्या आहेत. सत्य घटनेवर आधारीत असलेल्या या सिनेमाची घोषणा अनुराग कश्यप याने फेब्रुवारी महिन्यात केली होती. त्यानंतर आता तब्बल दोन महिन्यांनी या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटाचे पोस्टर पाहून चित्रपटाची उत्सुकताही वाढली आहे.
कुली नंबर 1च्या रिमेकमध्ये वरुण आणि सारा
तापसी आणि भूमी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. या चित्रपटासाठी त्यांना निवडण्यात आले ही माहिती होती. पण त्यांनी त्यांच्या या चित्रपटातील लुक कधीच समोर येऊ दिला नाही. भूमीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत शूटर आजीबद्दल माहिती दिली होती. पण आता त्याचा या शूटर आजी अवतारातील पहिला लूक समोर आला आहे. या पोस्टरमध्ये तापसी आणि भूमी यांनी उत्तरप्रदेशातील एक टिपिकल पेहराव केला आहे. घागरा आणि शर्ट त्यावर ओढणी असा त्यांचा टिपिकल पेहराव असून त्यांनी हातात बंदूक घेतली आहे. ही बंदूक नुसती शो बाजी नाहीतर त्यांच्या चेहऱ्यावर शार्प शूटर असल्याचा आत्मविश्वासही झळकत आहे. ‘तन बुढा होता है, मन बुढा नही होता’ अशी टॅग लाईन घेऊन हे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.
View this post on Instagram
जेनिफर विंगेटचा हा हॉट अंदाज तुम्ही पाहिलात का?
चंद्रो आणि प्रकाशी तोमर या शूटर आजींच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट आहे. उत्तरप्रदेशातील या आजी साधारण 90 वर्षांच्या आहेत. पण आजही त्या बंदुकीचा निशाणा चोख लावू शकतात. या शूटर आजींना आतापर्यंत अनेक मेडल्स मिळालेली आहेत.8 मुलं आणि 15 नातवंडांचा सांभाळ करत त्यांनी बंदुक चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी बंदुक चालण्याचे प्रशिक्षण कधी आणि का सुरु केले ? या मागेही एक रंजक कथा आहे. ती आता सांगून चित्रपटाचा विचका करण्याची अजिबात इच्छा नाही त्यामुळे आता दिवाळीपर्यंत या चित्रपटाची वाट पहावी लागणार आहे.
View this post on Instagram
किन्नर बहुचा रुबिनाचा सेटवर अपघात
आता बायोपिक करायचा म्हणजे सोपी गोष्ट आहे का? त्यातही अशा आजींचे काम ज्यांनी वयाच्या 60 व्या वर्षी बंदुक हातात धरली आणि ती सराईतपणे चालवली. त्यामुळे या चित्रपटासाठी लागणारे सगळे धडे तापसी आणि भूमी यांनी तोमर आजींकडून घेतले आहे. तोमर यांच्या कुटुंबात या दोघीच शार्पशूटर नाहीत तर त्यांच्या घरातील इतर महिलाही शार्पशूटर आहेत आणि त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उंचावत आहे.
भूमीचा सोनचि़डिया नावाचा एक चित्रपट नुकताच येऊन गेला. यात ती सुशांतसिंह राजपूतसोबत दिसली होती. तर तापसी पन्नूने मनमर्जिया नावाचा एक चित्रपट केला त्यात ती अभिषेक बच्चन आणि विकी कौशलसोबत दिसली. आणि आता दोघी एका वेगळ्या अवतारात दिसणार आहे. तेही अनुराग कश्यपच्या चित्रपटात. आता या पोस्टरनंतर प्रतीक्षा आहे या चित्रपटाच्या टीझर अथवा ट्रेलरची
(फोटो सौजन्य- Instagram)