लवकरच मराठी पडद्यावर येतोय 'सत्यशोधक' चित्रपट

लवकरच मराठी पडद्यावर येतोय 'सत्यशोधक' चित्रपट

महाराष्ट्राला पुरोगामित्वाच्या दिशेने नेणारं थोर व्यक्तीमत्त्व म्हणजे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले. समाजातील गरजू आणि वंचितांना न्याय मिळवून देण्याचं समाज उद्धाराचं कार्य ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलं. यातूनच निर्मिती झाली ती सत्यशोधक समाजाची. एक प्रखर विचारी, समाजसेवी, लेखक आणि दिशादर्शक असे क्रांतीकारी कार्यकर्ते म्हणजे ज्योतीराव गोविंदराव फुले. त्यांच्या या कार्यात सावलीप्रमाणे त्यांच्यासोबत असणाऱ्या सावित्रीबाई फुले. त्यांच्या या संपूर्ण आयुष्याचा आलेख उलगडणारा सिनेमा लवकरच मराठीत येत आहे.  


sandeep-radha-1


कसदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता संदीप कुलकर्णी आणि सेक्रेड गेम्स या वेबसीरिजमुळे ओळख मिळालेली अभिनेत्री राजश्री देशपांडे ही नवीन लवकरच महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. फुले दांपत्याच्या क्रांतीकारी समाजकार्यावर आधारित 'सत्यशोधक' हा चित्रपट 2019 च्या वर्षअखेरीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


संदीपच्या ज्योतिबांच्या भूमिकेबद्दल उत्सुकता


संदीप कुलकर्णी नुकताच नागेश कुक्कूनूरच्या सिटी ऑफ ड्रीम्स या वेबसीरिजमध्ये वेगळ्याच आणि चॅलेजिंग भूमिकेत दिसला होता. त्यानंतर आता सत्यशोधक चित्रपटातून त्याच्या अभिनयाचा अजून एक पैलू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'सत्यशोधक' चित्रपटाविषयी सांगताना संदीप कुलकर्णी यांनी सांगितलं की, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दांपत्याचे विचार काळापुढचे होते. तसंच त्यांचं नातंही काळाच्या पुढचं होतं. त्यांच्यातल्या नात्याचा वेध घेण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात येणार आहे. त्यामुळे या दांपत्याचे पुरोगामी विचार, त्यांचं कार्य, त्यांचं नातं यावर हा चित्रपट आधारित हा चित्रपट आहे.


सत्यशोधकमध्ये दिसणार राजश्रीच्या अभिनयाचं कसब

राजश्री देशपांडे हीने सेक्रेड गेम्स या वेबसीरिजमध्ये खूपच बोल्ड भूमिका केली होती. त्यानंतर आता सावित्रीबाई यांच्या भूमिकेत तिच्या अभिनयाचं खरं कसब पाहायला मिळणार आहे. ही भूमिका तिची बोल्ड इमेज मोडीत काढून तिचा अभिनय लोकांपर्यंत पोचवेल अशी आशा आहे.

राजश्री देशपांडेने खऱ्या आयुष्यातही सामाजिक कार्यात मोलाचा वाटा उचलला आहे. औरंगाबादजवळच्या पांढरी या खेड्याचे रूप पालटण्यासाठी ती योगदान देत आहे.  


कान्समध्ये फडकणार मराठीची पताका


ही हटके जोडी पहिल्यांदाच मराठीच्या मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. वेबसीरिजमध्ये या दोघांच्याही अभिनयाचं कौतुक झाल्यानंतर आता पहिल्यांदाच हे दोन्ही कसलेले कलाकार या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत.


‘मुळशी पॅटर्न’चा रिमेक करणार सलमान खान


'सत्यशोधक' या चित्रपटाची निर्मिती समता प्रॉडक्शन आणि कथाकार एंटरटेन्मेंटनं केली आहे. नीलेश जळमकर चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक आहेत. या चित्रपटाचं ५० टक्के चित्रीकरण पूर्ण झालं आहे. या वर्षाअखेरीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.