संदीप कुलकर्णी साकारणार कृतांतमध्ये 'रहस्यमय' भूमिका

संदीप कुलकर्णी साकारणार कृतांतमध्ये 'रहस्यमय' भूमिका

रेन रोज फिल्मची निर्मिती असलेला ‘कृतांत’ या चित्रपटाचं ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालं. या चित्रपटाच्या ट्रेलरवरुन हा चित्रपट नेमका कोणत्या विषयावर आधारित आहे याचा अंदाजच लावता येत नाही आहे. ट्रेलरवरुन या चित्रपटाचा विषय ‘थरारक आणि गूढ’ असण्याची शक्यता व्यक्त होत  आहे. शिवाय या ट्रेलरमध्ये अभिनेता संदीप कुलकर्णी एका वेगळ्याच भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाचा विषय आणि चित्रपटाचं शिर्षक यांचा कोणताच ताळमेळ ट्रेलरवरुन लागत नाही. त्यामुळे सध्या या चित्रपटाचा गूढ ट्रेलर हा विषय प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आहे. दत्ता मोहन भंडारे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. शिवाय या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादलेखनदेखील दत्ता भंडारे यांचंच आहे. या चित्रपटामध्ये संदीप कुलकर्णीसोबत सुयोग गोऱ्हे, विद्या करंजीकर, सायली पाटील या कलाकारांच्यादेखील महत्वाच्या भूमिका असणार आहेत. सायली पाटील आणि सुयोग गोऱ्हे ही जोडी पहिल्यांच चित्रपटात एकत्र दिसणार आहे. मिहीर शाह या चित्रपटाचे निर्माते असून शरद शाह सहनिर्माते आहेत. संगीतकार विजय गवंडे यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे. मंदार चोळकर आणि गुरू ठाकूर यांनी या चित्रपटातील गाणी लिहीली आहेत. थरारक आणि रहस्यमय असूनही दैनंदिन जीवन आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनशैलीतून ब्रेक घ्यायला लावणारा हा विषय असण्याची शक्यता आहे. मराठी चित्रपटातून यापूर्वी कधीही न मांडलेला गूढ विषय यानिमित्ताने प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. त्यामुळे या चित्रपटातून प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी वेगळं गवसण्याची शक्यता आहे. 'कृतांत' 18 जानेवारीला प्रदर्शित होत आहे.

Subscribe to POPxoTV

 


संदीप कुलकर्णी थरारक रुपात...


‘कृतांत’  चित्रपटात अभिनेता संदीप कुलकर्णी एक महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. संदीपचा हटके  गेटअप आणि संवाद यावरुन ही भूमिका नक्कीच वेगळी आहे असं वाटत आहे. आतापर्यंत संदीपने अशा प्रकारची भूमिका पूर्वी केलेली नाही. संदीप साकारत असलेली भूमिका एक वाट दाखवणाऱ्या गाईडची अर्थात वाटाड्याची आहे असं वाटतयं. मात्र या भूमिकेला आणखी न दिसणारे असे अनेक कंगोरे असण्याची शक्यता आहे. संपूर्ण चित्रपटाचं कथानक या भूमिकेभोवती फिरतय असंच या ट्रेलरवरुन वाटत आहे. ही आव्हानात्मक भूमिका करण्यासाठी संदीप कुलकर्णीसारख्या सक्षम कलाकाराची गरज होती. श्वास, डोंबिवली फास्ट, ट्राफिक सिग्नल अशा अनेक चित्रपटातून संदीपने स्वतःची एक वेगळी ओळख सिनेसृष्टीत निर्माण केली आहे. डोंबिवली फास्टमधील ‘माधव  आपटे’ ही सर्वसामान्य कुंटूंबातील लोकांना आपलीशी वाटणारी त्याची भूमिका आजही अनेकांच्या स्मरणात आहे. मराठीसोबतच हिंदी सिनेमांवरदेखील संदीपने आपल्या अभिनयाची विशेष धाप टाकली आहे. डोंबिवली रिर्टन हा संदीप कुलकर्णीचा मराठीतील आणखी एक आगामी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. डोंबिवली रिर्टन हा चित्रपट संदीपचीच ‘करंबोला क्रिएशन’ ही निर्मिती संस्था निर्माण करत आहे. त्यामुळे संदीपला आता आपल्याला निर्मात्याच्या भूमिकेतूनदेखील पाहता येणार आहे. एका पाठोपाठ एक असे संदीपचे चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असल्यामुळे संदीप कुलकर्णीच्या ‘अभिनयाची जादू’ पुन्हा एका मराठी रसिकांच्या मनाला भूरळ घालणार हे नक्की. कृतांत मधील संदीपची ही हटके आणि रहस्यमय भूमिका नेमकी कशी आहे याची मात्र सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.


krutant photo


फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम