कॅन्सरवरील उपचार चालू असूनही संजय दत्त पूर्ण करणार 'शमशेरा'चे चित्रीकरण

कॅन्सरवरील उपचार चालू असूनही संजय दत्त पूर्ण करणार 'शमशेरा'चे चित्रीकरण

काही दिवसांपूर्वीच संजय दत्तला कॅन्सर असल्याचे निदान समोर आले आहे. संजय दत्तने स्वतः आपण आजारी असून लवकरच परत येऊ असं  सोशल मीडियावर सांगितलं होतं. आता संजय दत्तवर कोकिलाबेनमध्ये उपचार चालू आहेत. पण असं असतानाही या आठवड्यापासून रणबीर कपूरसह ‘शमशेरा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी संजय दत्त परतणार आहे. संजय दत्तच्या जवळच्या माणसाकडूनच हे वृत्त मिळाले आहे. संजय दत्तवर उपचार चालू आहेत आणि एक महिन्याच्या आतच संजय दत्तने काम करण्याचा निर्णय घेतला  आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने एक थेरपी सेशन घेतलं असून त्याच्या तब्बेतीमध्ये सुधारण होत असल्याचंही सांगण्यात आलं आहेत. त्यामुळे संजय दत्तचे चाहते नक्कीच आनंदी होतील. 

संजय दत्तला कॅन्सरचा तितका त्रास जाणवत नाही

View this post on Instagram

🙏🏻

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay) on

संजय दत्तला साधारण एक महिन्यापूर्वी कॅन्सर असल्याचे निदान झाले.. त्यानंतर मीडियाने बऱ्याच तऱ्हेने बातम्या बनवून रंगवल्या असं सांगण्यात आले. मात्र संजय दत्तने डॉ. जलील पारकरव्यतिरिक्त अमेरिकेतील डॉक्टरांचाही सल्ला घेतल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर संजय दत्त नियमितपणे कोकिलाबेन रूग्णालयातील डॉक्टरांच्या संपर्कात असून योग्य उपचार घेत आहे. सुत्रांच्या म्हणण्यानुसार संजय दत्तचा कॅन्सर हा योग्य उपचाराने बरा होण्यासारखा असून त्याला त्याचा जास्त त्रास होत नाही. त्यामुळे संजय दत्त काम करू शकतो. 

गौहर खान लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत, व्हिडिओमुळे चर्चेला सुरूवात

देशाच्या बाहेर जाणार नाही

संजय दत्तच्या कुटुंबातील काही सदस्यांनी याबाबत सांगितले आहे. कॅन्सर हा अगदी सुरूवातीच्या दिवसातच कळल्यामुळे त्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे संजय दत्त फिट आहे. संजय दत्त अतिशय व्यावसायिक नट असून त्याने आपल्या डॉक्टरांनाही आपल्या चित्रपटांचं चित्रीकरण उर्वरित असून ते पूर्ण करायचे आहे याची कल्पना दिली आहे. त्यामुळेच संजू बाबा अर्थात संजय दत्तला अमेरिकेचा काही वर्षांचा व्हिसा मिळाला असला तरीही सध्या देश सोडून कुठेही जाणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या तरी चित्रपटांचं चित्रीकरण पूर्ण करण्याचा निर्णय संजय दत्तने घेतला असून भारतातच उपचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

आदिपुरुष'चा खलनायक असणार सैफ अली खान, साकारणार लंकेश

संजय दत्तचं सध्याचं रूटिन

संजय दत्त सध्या आपल्या चित्रपटांचं चित्रीकरण पूर्ण करण्याच्या मागे लागला आहे. कोकिलाबेनमधून मिळालेल्या माहितीनुसार भारतामध्ये त्याचे उपचार होऊ शकतात. तसंच संजय दत्त स्वतः याबाबत अत्यंत सकारात्मक आहे. त्याचप्रमाणे त्याचे कुटुंब त्याच्या मागे भक्कमपणे उभे आहे. संजय दत्त स्वतः सगळ्यांशी अगदी मिळून मिसळून वागत असून आपले रूटिनही अपडेट करत आहे. त्यामुळे आता या आठवड्यात ‘शमशेरा’चं चित्रीकरण सुरू करण्यात येत असून लवकरच संजय दत्त ‘भुजः प्राईड ऑफ इंडिया’चं डबिंगही पूर्ण करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबत अजूनही कोणतेही अधिकृत स्टेटमेंट देण्यात आले नसले तरीही संजय दत्त लवकरच काम पूर्ण करणार असल्याचे मात्र सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. तसंच संजय दत्तच्या तब्बेतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी त्याचे असंख्य चाहते नक्कीच प्रार्थना करत आहेत. संजय दत्तने आतापर्यंत अनेक संकटांवर मात केली आहे त्यामुळे आता या संकटावरही संजय दत्त नक्कीच मात करेल असा सर्वांनाच विश्वास आहे आणि संजय दत्तचा स्वभावा पाहता तो प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो हेदेखील नेहमीच समोर आले आहे. 

रसोडे मे कौन था' मीम्स सरकारलाही भावले, असा केला वापर

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा