‘या’ चित्रपटामध्ये दुनियादारी फेम संजय जाधव साकारणार नकारात्मक भूमिका

‘या’ चित्रपटामध्ये दुनियादारी फेम संजय जाधव साकारणार नकारात्मक भूमिका

खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी चित्रपटसृष्टीमध्ये खेळ आणि खेळाडूंच्या आयुष्यावर आधारित विविध चित्रपट निर्माण होत असतात. बॉलीवू़डप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टी यामध्ये मागे नाही. लवकरच कबड्डी या खेळावर आधारित ‘सूर सपाटा’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात दुनियादारी फेम संजय जाधव नकारात्मक भूमिकेतून दिसणार आहे. दिग्दर्शक संजय जाधव पहिल्यांदाच खलनायकाची भूमिका साकारणार आहे. आतापर्यंत संजयने दिग्दर्शन, लेखन आणि सिनेमॅटोग्राफीमध्ये यश मिळवलं आहे. सूर सपाटाच्या निमित्ताने प्रथमच तो अभिनयक्षेत्रात आपलं नशीब आजमावणार आहे. शिवाय या चित्रपटात अभिनेता उपेंद्र लिमयेही प्रमुख भूमिकेत असणार आहे. या कलाकारांव्यतिरिक्त आणखी अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात असण्याची शक्यता आहे. किशोर खिल्लारे, सुभाष गुप्ता, सतीश गुप्ता आणि जगदीश लाडे यांनी या चित्रपटांची निर्मिती केली आहे. तर या चित्रपटाची कथा मंगेश कंठाळे यांची आहे. गावागावांमध्ये उनाडक्या करणारी मुलं ते यशाचं शिखर गाठणारे कबड्डीपटू असा प्रवास या चित्रपटात प्रेक्षकांना पाहता येणार आहे. सूर सपाटा चित्रपट 22 मार्चला प्रदर्शित होत आहे. नकारात्मक भूमिका असलेल्या पात्राच्या व्यक्तिमत्वांना भावनांचे विविध कंगोरे असतात. आता सूर सपाटा चित्रपटातील संजय जाधवची भूमिका नेमकी कशी असणार हे पाहणं खूपच उत्सुकतेचं असणार आहे.

Subscribe to POPxoTV 

 

 


View this post on Instagram


 

 

#Repost @marathisanmaan ・・・ वेगवान 'सूर सपाटा'ची खास झलक 'सूर सपाटा'चा वेगवान टिझर रिलीज आत्तापर्यंत विविध खेळांवर आधारित अनेक चित्रपट आपण पाहिलेत पण अस्सल मातीतला खेळ 'कबड्डी' तसा दुर्लक्षितच राहिला म्हणायचा. नेमकी हीच बाब हेरत जयंत लाडे निर्माता हयांचा लाडे ब्रोज् फिल्म्सप्रा. लि या निर्मितीसंस्थेचा 'सूर सपाटा' हा गावठी कबड्डीवरआधारित मराठी चित्रपट २२ मार्चला संपूर्ण महाराष्ट्रालाकबड्डी... कबड्डी... म्हणायला भाग पाडेल यात काही शंकानाही. तत्पूर्वी मंगेश कंठाळे दिग्दर्शित 'सूर सपाटा'ची एकखास झलक आपण पाहू शकणार आहोत. ७० एम एमवरखेळल्या जाणाऱ्या या चित्रपटाची सध्या चर्चा सर्वत्र रंगलीअसून त्याचा वेगवान, उत्कंठा ताणणारा टिझर प्रेक्षकांची मने जिंकत आहे. Follow us: @marathisanmaan उनाड पण कुशल विद्यार्थ्यांभोवती गुंफलेली 'सूर सपाटा'ची कथा प्रेक्षकांची उत्कंठा टप्प्या-टप्प्याने वाढवत राहते. जिल्हापरिषदेच्या शाळेतील काही सामान्य विद्यार्थ्यांतील असामान्य कौशल्य जाणून त्यांना स्पर्धेमध्ये उतरवू पाहणारे शिक्षक एकीकडे तर आपणही एखादं मैदान मारू शकतो याची जाणीव झालेले विद्यार्थी दुसरीकडे. या दोघांमधला सुवर्णमध्य साधणारा 'सूर सपाटा' प्रत्येकाला आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची एक संधी मिळाली तर तो त्याचं कसं सोनं करू शकतो हे दाखवतो. लाडे ब्रोज् फिल्म्सचा 'सूर सपाटा' हा दुसरा चित्रपट असून या आधी त्यांनी 'पेईंग घोस्ट' या विनोदी चित्रपटाची यशस्वी निर्मिती केली होती. अनेक दर्जेदार चित्रपटांतून आपली छाप सोडणारा राष्ट्रीयपुरस्कार विजेता बाल कलाकार हंसराज जगताप, यशकुलकर्णी, चिन्मय संत, चिन्मय पटवर्धन, रुपेश बने, जीवन कळारकर,सुयश शिर्के यांसोबतच शरयू सोनावणे आणिनिनाद तांबावडे आदींच्या प्रमुख भूमिका 'सूर सपाटा'मध्येआपल्याला पहायला मिळतील. किशोर खिल्लारे, सुभाषगुप्ता, सतीश गुप्ता आणि जगदीश लाडे सहनिर्मित 'सूरसपाटा'च्या निमित्ताने तब्ब्ल २५ दिग्ग्ज कलावंतांचा ताफाआमने-सामने येणार असून तूर्तास त्यांची नावे गुलदस्त्यातआहेत. विशेष म्हणजे 'सूर सपाटा'ला माजी कबड्डीपटू अर्जुनपुरस्कार विजेते मा. श्री. शांताराम जाधव यांचे मोलाचेसहकार्य लाभले असून ३०० राष्ट्रीय कबड्डीपटूंचाही या चित्रपटात सक्रिय सहभाग यात रसिकांना पाहता येणार आहे. #mangeshkanthale #chinmaypatwardhan #jeevankaralkar #suyashshirke #ninadtambade #sharayusonawane #sursapata #hansrajjagtap #rupeshbane #yashkulkarni #marathiboys #marathiactors #marathifilm #kabaddi #kabaddikabaddi #marathiteaser #marathilove #instamar


A post shared by Sur Sapata (@sursapatamovie) on
चित्रपटसृष्टीत वाहत आहेत खेळाचे वारे


सध्या बॉलीवूड आणि मराठी चित्रपट सृष्टीत खेळांवर आधारित विविध चित्रपटांची निर्मिती होत आहे. बॉलीवूड  अभिनेत्री कंगना रणौतचा ‘पंगा’ हा चित्रपट देखील प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. हा चित्रपटदेखील कबड्डीवर आधारित  आहे. दिग्दर्शक अश्विनी अय्यर तिवारी या चित्रपटासाठी कंगनावर विशेष मेहनत घेत आहेत. मणिकर्णिकाच्या यशानंतर कंगना या चित्रपटासाठी कबड्डीचे धडे गिरविण्यासाठी सज्ज झाली आहे. बिग बी अभिताभ बच्चन नागराज मंजुळे दिग्गर्शित ‘झुंड’ या चित्रपटात काम करत आहेत. झुंड चित्रपट फुटबॉल या खेळावर आधारित आहे. अमिताभ बच्चन या चि्त्रपटात फुटबॉल कोचची भूमिका साकारणार आहे. सध्या कबड्डी या खेळाला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. अनेक वर्ष प्रसिद्धीपासून दूर असलेला अस्सल मातीतील हा खेळ प्रो- कबड्डीमध्ये ले पंगा म्हणत लोकप्रियतेचं शिखर गाठत आहे. आता हिंदीमधील पंगा आणि मराठीतील सूर सपाटा या दोन चित्रपटांमधून घराघरात हा खेळ पोहचेल हे निश्चित.
 

 

 


View this post on Instagram


 

 

‘सूर सपाटा, मार रपाटा, ह्याच गड्याचा काढीन काटा..!’ खेळ कबड्डीचा .. मातीतला, मातीत मिसळलेल्या घामाचा... स्वप्नांना टच करण्यासाठी, चालू असलेल्या धडपडीचा... Coming up with 1st #Marathi Sports Inspirational film on #kabbadi...‘#सूरसपाटा" #SurSapata चे पहिले पोस्टर Film Releasing on 22nd March 2019. Stay Tuned For More Exclusive Updates .. #Poster #OfficialPoster #Marathi #Shoutout #Maharashtra #maharashtra_ig #FirstLook #picmarathi #instamarathi #marathiactor #marathistatus


A post shared by Sur Sapata (@sursapatamovie) on
 


प्रेक्षकांना बेफिकर व्हायला लावतोय 'आम्ही बेफिकर'


गायिका नेहा कक्करने सांगितलं ब्रेकअपमागचं खरं कारण


‘डीबाडी डीपांग’ नंतर संदीप-सलील-अवधूतचं ‘हे’ नवं गाणं सोशल मीडियावर घालतंय धुमशान


फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम