'संजीवनी'चे डाॅक्टर्स करणार आता ‘इश्कबाजी’

'संजीवनी'चे डाॅक्टर्स करणार आता ‘इश्कबाजी’

आपल्या सगळ्यांना काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेली ‘संजीवनी - द मेडिकल बून’ ही मालिका तर नक्कीच आठवत असेल. ही मालिका त्यावेळी खूपच गाजली होती. ही मालिका पुन्हा एकदा रिमेक होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ही मालिका प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करण्यास सज्ज झाली आहे. या मालिकेने 2002 पासून 2005 पर्यंत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं. अभिनेता मोहनीश बहल बरोबरच यामध्ये डॉक्टर जूही सिंह, डॉक्टर राहुल मेहरा, डॉक्टर सिमरन चोप्रा आणि डॉक्टर ओमी जोशी या चौकडीने प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळवलं होतं. पण आता येणाऱ्या या मालिकेमध्ये फरक इतकाच असेल की, डॉक्टर्सची नावं आणि कलाकारांचे चेहरे बदलणार आहेत. पण अर्थात हे कलाकारदेखील प्रेक्षकांच्या आवडीचेच आहेत अशी माहिती मिळाली आहे.


Sanjeevni Remake


'इश्कबाज़' मालिकेतील मुख्य जोडी येणार प्रेक्षकांच्या भेटीला


Sanjeevni Remake 2


नुकतीच ‘कसौटी जिंदगी के’ ही मालिका रिमेक करण्यात आली आहे आणि प्रेक्षकांचा या मालिकेलाही उदंड प्रतिसाद मिळतो आहे. त्याचप्रकारे आता "संजीवनी- द मेडिकल बून" या मालिकेचंदेखील रिमेक करण्यात येणार आहे. तरूणांमध्ये या मालिकेतील भूमिका आणि कथेबद्दल असणारी लोकप्रियता लक्षात घेता पुन्हा एकदा ही मालिका नव्याने घेऊन येण्यासाठी निर्माते उत्सुक असल्याचं कळत आहे. मालिकेतील डॉक्टर जुही आणि डॉक्टर राहुल या दोन्ही प्रसिद्ध भूमिका त्यावेळी अभिनेत्री गुरदीप कोहली आणि अभिनेता गौरव चानना यांनी निभावली होती. पण यावेळी या भूमिका सर्वांची आवडती अभिनेत्री ‘इश्कबाज’फेम सुरभी चंदना आणि नकुल साकारणार असल्याची माहिती मिळत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही कलाकारांचा एक चाहता वर्ग आहे. बाकी भूमिकांसाठी सध्या शोध चालू असल्याचंही सांगण्यात आलं आहे. रिमेकसंदर्भात निर्मात सिद्धार्थ पी. मल्होत्राचं म्हणणं आहे की, ‘होय, आम्ही रिमेक करत असून चॅनेलबरोबर सध्या चर्चा सुरु आहे. ‘संजीवनी’ने मला लहान पडद्यावर एक वेगळी ओळख मिळवून दिली होती. त्यामुळे ही मालिका माझ्या खूपच जवळची आहे’ यापूर्वी आलेल्या संजीवनी आणि दिल मिल गये या दोन्ही मालिका प्रेक्षकांनी अक्षरशः उचलून धरल्या होत्या. त्यामुळे आता ही नवी बिग बजेट मालिकाही प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल का हे बघावं लागेल.


मालिका होणार बिग बजेट


DIl Mil gaye
मालिकेच्या निर्मात्यांनी पुढेही सांगितलं की, मागील दोन सीझनप्रमाणे यावेळीदेखील मालिकेची ट्यून ही नक्कीच प्रसिद्ध होईल. याशिवाय नेहमीपेक्षा ही मालिका यावेळी बीग बजेट असेल. याचा अर्थ यावेळी या मालिकेच्या निर्मात्यांनी यावेळी मालिका मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांसमोर घेऊन यायची तयारी केली आहे. यापूर्वीदेखील संजीवनीचा सिक्वल असणारी ‘दिल मिल गये’ ही मालिका खूप गाजली. तीन वर्षांपर्यंत या मालिकेला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं. यामधून करण सिंह ग्रोव्हर, करण वाही, जेनिफर विंगेट, द्रष्टी धामी या कलाकारांना पुढे आणण्याचं काम निर्मात्यांनी केलं होतं. आजही या दोन्ही मालिका प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. शिवाय यामध्ये काम केलेल्या कलाकारांनी आपलं एक विशिष्ट स्थानही मनोरंजन जगात पक्कं केलं आहे. त्यामुळे आता ही नवी मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करणार का? हे येणारा काळच ठरवेल.


फोटो सौजन्य - Instagram


हेदेखील वाचा - 


कान्समध्ये दिसला कोमोलिकाचा जलवा


Good news: कॉमेडी क्वीन भारती सिंहच्या घरी येणार नवा पाहुणा


खरंच का अनुष्का शर्माने घेतला फिल्मी करियरमधून संन्यास


(तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी! POPxo शॉप तुमच्यासाठी घेऊन आले आहे, आकर्षक लॅपटॉप कव्हर, कॉफी मग, बॅग्ज आणि होम डेकोर प्रॉडक्ट्स... तेदेखील तुमच्या बजेटमध्ये! मग वाट कसली पाहताय, सुरू करा आमच्याबरोबर शॉपिंग!)आता येईल एक खास फील, कारण Popxo आता वाचता येणार 6 भाषांमध्ये ... कसली वाट पाहताय! निवडा तुमची भाषा - इंग्रजी, हिंदी, तमिल, तेलुगू, बांगला आणि मराठी.. कारण आपल्या भाषेमध्ये असेत निराळीच मजा!