किती सांगायचंय मला...साराने लिहीले कार्तिकला क्यूट मेसेजेस

किती सांगायचंय मला...साराने लिहीले कार्तिकला क्यूट मेसेजेस

आजकाल एकमेकांना पत्र पाठवण्याचा काळ नसला तरी काय झालं एकमेकांना क्यूट नोट्स लिहायला काय हरकत आहे. असंच काहीसं केलंय सध्या चर्चेत असलेल्या कार्तिक आर्यन आणि सारा अली खानने. आधी एकत्र चहा पिणं असो बाईकवर फिरणं असो वा दर्ग्याला एकत्र भेट देणं असो आणि आता क्यूट नोट्स. आता माहीत नाही, हे दोघं एकमेकांना खरंच डेट करत आहेत की नाही. पण सगळ्या #sartik फॅन्समध्ये मात्र त्यांच्या आगामी #loveaajkal च्या सिक्वलसाठी उत्सुक आहेत.  

हिमाचलमधल्या गोड आठवणी

दोन महिन्यांच्या सलग शूटींगनंतर सारा आणि कार्तिकच्या आगामी चित्रपटाचं नुकतंच रॅपअप झालं. या चित्रपटाचं दिग्दर्शन इम्तियाज अली करत आहे. या चित्रपटाचं शेवटचं शेड्युल हिमाचलप्रदेशमध्ये शूट करण्यात आलं. या सुंदर लोकेशनच्या काही आठवणी साराने शेअर केल्या.  

सारा अली खान यात कार्तिकला लिहीलं आहे की, मी तुला मिस करेन. रॅपअप झालं, 66 दिवस आणि अगणित आठवणी मिळाल्या. माझ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी धन्यवाद. तुझ्या सेटवर काम करणं माझ्यासाठी खूप सौभाग्याचं होतं. मी हे सर्व नेहमी मिस करेन.

तिने कार्तिकसाठी लिहीलं की, माझ्यासोबत इतक्या सहजतेने काम करण्यासाठी धन्यवाद. तुझ्यासोबत कॉफी घेण्यापासून ते चहा पिण्यापर्यंत, मला पुन्हा एकदा ते सर्व घडावं असं वाटतं. मी तुला मिस करेन. या दोघांचा एक क्यूट फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

किती क्यूट...साराच्या या नोटनंतर कार्तिकनेही साराला आणि पूर्ण टीमला थँक्स म्हणणारी नोट लिहीली. साराला कार्तिकने साथी आणि प्रिन्सेस असं दोन्ही या नोटमध्ये संबोधलं आहे. तसंच तिच्यासोबत आणि इम्तियाजसोबत पुन्हा पुन्हा काम करण्याची इच्छासुद्धा म्हणून दाखवली आहे. 

रणवीर सिंगने घेतलं क्रेडीट

रणवीर आणि साराची सिंबामधली जोडी प्रेक्षकांना फारच आवडली होती. त्यानेही या दोघांच्या क्यूट नोट्सवर कमेंट केली आहे. या कमेंटमध्ये त्याने विशेषतः म्हटलं आहे की, विसरू नका सर्वात आधी भेट कोणी घालून दिली होती. हो...रणवीरमुळेच या दोघांची एकमेकांशी भेट झाली होती. साराने करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये तिचा क्रश कार्तिक आर्यन असल्याचं सांगितल्यावर रणवीरने एका अवॉर्ड शोमध्ये दोघांची भेट करून दिली होती. त्यानंतरच या दोघांच्या सो कॉल्ड आऊटींग आणि एकत्र शूटला सुरूवात झाली. 

रणवीरनंतर रणदीपची कमेंट

या चित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डाचाही मुख्य रोल आहे. त्यानेही ट्विटरवर याबाबतची पोस्ट केली आणि सगळ्यांचे आभार मानले. हा चित्रपट 2009 साली आलेल्या हिट चित्रपट Love Aaj Kal चा सिक्वल असून तो Valentines Day 2020 ला रिलीज करण्यात येणार आहे. 

आता पाहूया #Sartik ची रिअल लाईफ केमिस्ट्री रिलमध्ये कशी दिसते.

हेही वाचा -

सारा अली खान ‘या’ व्यक्तीपासून दूर राहूच शकत नाही, सांगितले लग्नाचे प्लॅन्स

सारा अली खानने केला ब्रायडल लुक शेअर, लग्नासाठी आले प्रपोजल्स

कार्तिक आर्यनने मिळवली अजून एक तगडी भूमिका