सारा आणि कार्तिकमध्ये पुन्हा दुरावा, सोशल मीडियावर केलं एकमेकांना अनफॉलो

सारा आणि कार्तिकमध्ये पुन्हा दुरावा, सोशल मीडियावर केलं एकमेकांना अनफॉलो

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन काही दिवसांपासून एकमेकांच्या खूपच जवळ आले होते. साराने करण जोहरच्या कॉफी विथ करन या टॉक शोमध्ये कार्तिक तिचा क्रश असल्याचं कबूल केलं होतं.  तेव्हा तिने जाहीर केलं होतं की तिला कार्तिकसोबत डेटवर जाण्याची इच्छा आहे. त्यानंतर सारा आणि कार्तिक यांनी लव्ह आज कल 2 या चित्रपटात एकत्र काम केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही मात्र या जोडीला प्रेक्षकांनी पसंत केलं. या चित्रपटाआधी आणि शूटिंग दरम्यान सारा आणि कार्तिक यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं.  ते बऱ्याचदा एकत्र फिरताना दिसू लागले होते. मात्र आता अचानक असं काय झालं ज्यामुळे त्या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. खरंतर काही दिवसांपासूनच त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र आता तर त्यांनी या नात्यात एक असा निर्णय घेतला ज्यामुळे चाहत्यांना त्यांना चक्क 'का रे दुरावा' असं वाटत आहे. 

सारा आणि कार्तिकमध्ये का रे दुरावा

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केलं आहे. अचानक त्या दोघांनी घेतलेल्या या निर्णयामुळे दोघांचेही चाहते संभ्रमात पडले आहेत. कारण या दोघांची जोडी चाहत्यांना खूपच आवडत होती. ते दोघं एकमेकांसोबत खूप छान दिसत होते. त्यामुळे चाहत्यांना या दोघांच्या नात्यात नेमका का दुरावा आला आहे हे जाणून घेण्याची नक्कीच इच्छा आहे. त्या दोघांमध्ये नक्कीच असं काही घडलं आहे ज्यामुळे त्यांनी हा कठोर निर्णय घेतला आहे. दिलासा देणारी गोष्ट अशी की जरी त्यांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केलं असलं तरी इन्साग्रामवर त्यांचे एकत्र फोटो अजूनही तसेच आहेत. दोघांनीही ते अजून डिलीट केलेले नाहीत. 

View this post on Instagram

Rahenge Hum Nahi ❤️

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

सारा आणि कार्तिकची पहिली भेट

साराने 'केदारनाथ' या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तिचा रणवीर सिंहसोबत 'सिम्बा' हा चित्रपट बॉक्सऑफिसवर तुफान गाजला. त्यानंतर एका अवॉर्ड फंक्शनच्या दरम्यान रणवीर सिंगने सारा आणि कार्तिकची स्पेशल ओळख करून दिली . कारण त्याआधी साराने कॉफी विथ करण या शोमध्ये कार्तिकवर तिचं क्रश असल्याचं सांगितलं होतं. या भेटीनंतर लगेच दोघांना एकत्र सिनेमाही मिळाला. मात्र 'लव्ह आज कल 2' चं शूटिंग सुरू होण्याआधीच यांच्यात प्रेमाची खिचडी शिजू लागली होती. या जोडीचे एकत्र फिरतानाचे फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत होते. दोघंही एकमेकांना  भेटण्यासाठी एकमेकांच्या शूटिंग सेटवर धडकत होते. साराने तिचा वाढदिवसही कार्तिकसोबत साजरा केला होता. मात्र आता असं अचानक काय घडू लागलं आहे की ते दोघं एकमेकांना जाणिवपूर्वक टाळत आहेत. 

दोघांनाही करायचं आहे करिअरवर फोकस -

कार्तिक आर्यन लवकरच दोस्ताना 2 आणि भुलभुलैया 2 मध्ये दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच भुलभुलैयाच्या सिक्वलचा फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आला होतो. कार्तिक सोबत यामध्ये कियारा अडवाणी स्क्रीन शेअर करत आहे. या चित्रपटाची कार्तिकचे चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. सारा अली खानही वरूण धवनसोबत लवकरच कुली नंबर वन या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खरंतर लॉकडाऊन आधीच या चित्रपटाचं शूटिंग पुर्ण झालं होतं मात्र हा चित्रपट प्रदर्शित करण्याचं कोरोनामुळे रद्द करण्यात आलं. आता अनलॉकनंतर हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. याचप्रमाणे सारा अतरंगी या  चित्रपटातही काम करत आहे. सारा आणि कार्तिकला वैयक्तिक नातं बाजूला ठेवून आपापल्या करिअरवर फोकस करण्याची गरज वाटत असावी.म्हणूनच त्या दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर असं अनफॉलो केलं आहे. 

View this post on Instagram

Challan Katega Aur mera bhi ....

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on