सारा अली खान आणि कार्तिक आर्यनमध्ये नक्कीच काहीतरी शिजतयं अशी चर्चा होत असताना आता काही अशा गोष्टी समोर आल्या आहेत त्यामुळे या दोघांमध्ये काहीतरी सुरु असावे असे वाटत आहे. त्या दोघांचा एक असा फोटो समोर आला आहे. ज्यामुळे त्यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी सुरु आहे असा अंदाज नेटीझन्सनी बांधायला सुरुवात केली आहे.
View this post on Instagram
पापारीझी नेहमीच स्टार्सच्या मागावर असतात. नव्या चटपट्या बातम्या काढण्यासाठी आणि त्यांचे सुंदर फोटो क्लिक करण्यासाठी. आता पापाराझींच्या कॅमेरामध्ये एक असा फोटो टिपला गेला आहे. ज्यामुळेच या चर्चा होत आहे. सारा आणि कार्तिक सध्या लव्ह आजकल 2 च्या शुटींगमध्ये व्यग्र आहे. सेटवर ही दोघं एकत्र असतात. पण शूट व्यतिरिक्तही ही दोघं अनेकदा एकत्र असतात. या आधी देखील त्यांना अनेकदा एकत्र टिपण्यात आले आहे. पण हा फोटो थोडा खास आहे. कारण आता कार्तिक आणि साराला एका गाडीत पकडण्यात आले आहे. कार्तिक या फोटोमध्ये पाय बर करुन बसला आहे. तर साराही अगदी आरामात बसली आहे. त्यांना जेव्हा कळले की, आपले फोटो काढले जात आहेत. त्यावेळी कार्तिकने लगेचच साराला खाली वाकण्यास सांगितले. त्यामुळेच त्यांच्या या चर्चेला उधाण आले आहे.
OMG! Finally we can see Kartik and Sara together in one frame and that's also a HOT kissing scene& @TheAaryanKartik #KartikAaryan #SaraAliKhan pic.twitter.com/eWuzDTFp5T
— Kartik Aaryan fanpage (@KartikAaryanFC_) March 5, 2019
सारा आणि कार्तिकच्या प्रेमाच्या चर्चांना इतकं उधाण आले आहे की, त्यांनी काहीही केले तरी त्यांच्याकडे लक्ष जाते. मध्यंतरी या दोघांचा एक व्हिडिओ शेअर झाला होता.यात कार्तिक आणि सारा एकमेकांना लिप लाॅक करताना दिसत होती. त्यांच्या या लिप लॉकचे कारण कळल्यानंतर सगळ्या चर्चा थांबल्या. कारण हा व्हिडिओ लव्ह आज कल 2 च्या शुटींगदरम्यानचा होता. पण तरीही त्यांच्याबाबत लोकांना अजूनही शंका आहेच.
कार्तिक-साराचा लिप लॉक व्हायरल
View this post on InstagramSpotted! 📸😎 #SaraAliKhan & #KartikAaryan snapped as they wrap up shooting for #LoveAajKal2
या दोघांमध्ये काहीतरी सुरु आहे असे समजून लोकांनी ही जोडी देखील लावून टाकली. पण या फोटो आधी या दोघांचे वागणे बदललेले होते. त्यांच्या नात्यात काही चांगल सुरु नाही असे वाटत होते. सेट व्यतिरिक्त काही दिवस ते एकत्र दिसत नव्हते. त्यामुळे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चादेखील होत होत्या.
कार्तिक आणि साराच्या नात्यात आलाय का दुरावा
सारा जेव्हा तिचा डेब्यु करणार होती. त्यावेळी तिने अनेक ठिकाणी इंटरव्ह्यू दिले. तिला मुलाखतीदरम्यान कोण आवडतो? हा प्रश्न विचारल्यानंतर तिने प्रत्येकवेळी कार्तिक आर्यनचेच नाव घेतले. कार्तिक मला आवडतो. त्याच्यासोबत डेटवर जाण्याची इच्छा तिने व्यक्त करुन दाखवली होती. सुदैवाने तिला दोन चित्रपटानंतर कार्तिकसोबत काम करण्याची संधी मिळाली. आता आवडत्या व्यक्तीसोबत काम मिळाल्यानंतर सारा तर खूश असणारच म्हणा. पण सारा आणि कार्तिकचे हेच भेटणे लोकांसाठी मात्र चर्चेचा विषय ठरत आहे.
सलमान करणार साऊथच्या saaho मध्ये कॅमिओ रोल
(सौजन्य- Instagram)