लव आज कल 2 मध्ये करणार सारा अली खान आणि कार्तिक आर्यन रोमान्स

लव आज कल 2 मध्ये करणार सारा अली खान आणि कार्तिक आर्यन रोमान्स

इम्तियाज अलीचा 2009 मध्ये आलेला लव आज कल हा चित्रपट खूप गाजला होता. यामध्ये सैफ अलीची भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटाचा सिक्वल येत आहे, लव आज कल 2. मिळालेल्या माहितीनुसार लव आज कल 2 मध्ये एनर्जेटिक आणि बॉलीवूडमध्ये सध्या सर्वात जास्त चर्चेत असणारी अभिनेत्री सारा अली खानला मुख्य भूमिका देण्यात आली असून साराला डेट करण्याची इच्छा असणाऱ्या कार्तिक आर्यनला तिच्या अपोझिट कास्ट करण्यात आलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कथा वडील आणि मुलीच्या नात्यावर भाष्य करणार असणार असून सैफ अली खानला तिच्या वडिलांच्या भूमिकेसाठी विचारणार येण्यात आल्याची सध्या चर्चा आहे. सैफ आणि साराला तशाच प्रकारच्या नात्यामध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल जसं लव आज कल मध्ये ऋषी कपूर आणि सैफ अली खानला प्रेक्षकांनी पाहिलं होतं.

लव आज कल 2 मध्ये साराबरोबर दिसणार कार्तिक
लव आज कल 2 मध्ये साराबरोबरच कार्तिक आर्यनलाही साईन करण्यात आलं आहे. करणने घेतलेल्या एका मुलाखतीमध्ये कार्तिक आर्यनला डेट करायला आवडेल असं साराने म्हटल्यापासून सर्वांनाच या जोडीला एकत्र पाहायची उत्सुकता होती आणि ते इतक्या लवकर हे घडेल अशी प्रेक्षकांनाही अपेक्षा नव्हती. या दोघांनाही एक पुरस्कार सोहळ्यामध्ये रणवीर सिंगने एकत्र आणले होते आणि त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. आता या दोघांना मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना पाहणं प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.


saif and sara
वडिलांच्या भूमिकेत दिसणार सैफ अली खान


सारा आणि सैफचं रिअल लाईफमध्येदेखील नातं अतिशय चांगलं आहे. या चित्रपटामध्ये वडील आणि मुलीच्या नात्याबद्दल कथा असेल. त्यामुळे पहिल्यांदाच सैफ आणि सारा ही पिता - पुत्रीची जोडी पडद्यावर प्रेक्षकांना दिसणार असल्याची शक्यता आहे. साराने याआधीदेखील आपल्याला आपल्या वडिलांबरोबर काम करण्याची इच्छा असल्याचं बोलून दाखवलं होतं. साराने आतापर्यंत केवळ दोन चित्रपट केले असून तिचा फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. सुशांत सिंह राजपूतबरोबर साराने बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आपण इथे टिकण्यासाठी आलो आहोत हे आपल्या अप्रतिम परफॉर्मन्सने दाखवून दिलं. त्यानंतर एकाच महिन्यात तिने दुसरा चित्रपट सिम्बा केला आणि हे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडले. त्याहीपेक्षा अधिक साराचं काम प्रेक्षकांना खूप आवडलं आणि समीक्षकांनीही तिची प्रशंसा केली आहे. इतकंच नाही तर साराच्या वागण्याबोलण्यामुळे ती मीडियाचीदेखील लाडकी बनली आहे. लव आज कल 2 मध्ये जर ही स्टारकास्ट नक्की असेल तर प्रेक्षकांना नक्कीच हा चित्रपट बघण्यात इंटरेस्ट असणार. साराने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आपण एक टिपीकल कमर्शियल अभिनेत्री असल्याचं म्हटलं होतं पण तिला त्याचबरोबर अनेक भूमिका करण्याची इच्छा असल्याचंही सांगितलं होतं. त्यामुळे आता साराचे नक्की कोणते नवे प्रोजेक्ट येणार आणि ती कोणत्या प्रकारच्या भूमिका साकारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.


फोटो सौजन्य - Instagram 


हेदेखील वाचा - 


एम-टाऊनच्या नव्या कपलचं सरप्राईज बर्थडे सेलिब्रेशन


‘डोक्याला शॉट’ लावण्याआधी एक मिनिटं,टीझर रिलीज


रोहित शेट्टी कँम्पमध्ये पहिल्यांदाच सलमानची एंट्री