जेव्हा सारा आणि तारा एकच गाऊन घालतात तेव्हा

जेव्हा सारा आणि तारा एकच गाऊन घालतात तेव्हा

बी टाऊनमध्ये अभिनेत्रींनी जरा जरी कपडे एकसारखे घातले तरी त्याची केवढी तरी चर्चा होते.असाच काहीसा प्रकार सध्या घडला आहे. तो सारा आणि ताराच्या बाबतीत. झालं असं की, तारा आणि साराने एकच गाऊन घातला आहे. त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. दोघींपैकी कोण चांगल दिसतंय याची चर्चा त्यांच्या फॅन्समध्ये रंगू लागली आहे. जर तुम्ही या दोघांचा हा फोटो पाहिला नसेल तर तो तुम्ही आधी पाहायला हवा.


आ देखे जरा किसमे कितना है दम


tara sara dress fi


कोण ठरणार सर्वश्रेष्ठ ?


आता सारखे कपडे घातल्यानंतर लोकांना ही उत्सुकता असणे स्वाभाविक आहे किंवा त्यांच्या फॅनमध्ये चुरस लागणे स्वाभाविक आहे. फॅशन डिझायनर स्वप्निल शिंदे याने डिझाईन केलेला हा गाऊन साराने फिल्मफेअरसाठी घातला होता. त्यावेळच्या फोटोशूटचा एक व्हिडिओ देखील शेअर केला होता. त्यावर तिने लाल जॅकेट, बेल्ट आणि गळ्यात काही दागिने परिधान केले होते. तर तारा सुतारीयाने या ड्रेसवर काहीच घातले नाही तर तिने या ड्रेसवर फक्त हाय हिल्स घातले आहेत. तसं पाहायला गेलं तर या दोघांना हा ड्रेस चांगला दिसत आहे. त्यामुळे सर्वश्रेष्ठ कोण याचा प्रश्नच येत नाही.


अर्नब गोस्वामी सनी दिओलला म्हणाले सनी लिओन, त्यावर काय म्हणाली सनी लिओन


काय आहे गाऊनची खासियत?


हा गाऊन फिक्कट हिरव्या रंगाचा असून त्यावर सिक्वेन्स वर्क केलेलं दिसत आहे. त्याने या गाऊनला अधिक हॉट करण्यासाठी या ड्रेसला समोरुन स्लिट देण्यात आली आहे. हॉल्टरनेक प्रकारातील हा गाऊन त्यामुळेच खास वाटत आहे.


कोण आहे स्वप्निल शिंदे?


स्वप्निल शिंदे हा सेलिब्रिटी फॅशन डिझायनर असून त्याने आातापर्यंत अनेक ड्रेस डिझाईन केले आहे. मराठी असो वा हिंदी सिनेसृष्टी सगळ्यांनीच त्याने ड्रेस केलेले डिझायनर वेअर घातले आहे. तारा आणि साराचा फोटो स्वत: स्वप्निलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.


सारा आणि कार्तिकमध्ये नेमंक चाललंय काय? पाहा फोटो


 दोघांनीही स्ट्रगल करुन मिळवले स्थान


tara sutariA


सारा अली खान ही सैफ अली खानची मुलगी असून तिने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून डेब्यु केलं होता. तिच्यासोबत या चित्रपटात सुशांतसिंह राजपुत होता. त्यानंतर तिने रणवीर सिंहसोबत सुपर डुपर हिट ‘सिंबा’ हा चित्रपट केला. तर तारा सुतारीयाने धर्मा प्रोडक्शनच्या  stundent of the year 2 या चित्रपटातून बॉलूीवूडमध्ये पदार्पण केले. तारा सुतारीयाने चित्रपट मिळवण्यासाठी बराच स्ट्रगल केला असून तारा ही उत्तम डान्सर आणि गायक आहे अनेक रिअॅलटी शोमधून ती तिच्या टिनएज वयात दिसली आहे.सारा स्टार किड असूनही तिने तिचा रोल मिळण्यासाठी स्ट्रगल केला आहे.


जुही चावलाच्या मुलाला व्हायचयं अॅक्टर म्हणाली जुही


सारा करतेय Love aaj kal 2 


love aaj kal 2


सैफ अली खानचा चित्रपट Love aaj kal 2 च्या सिक्वलमध्ये सारा अली खान दिसणार आहे. सारा यामध्ये कार्तिक आर्यनसोबत काम करणार आहे. या चित्रपटाचे शुटींग जोरदार सुरु असून या शुटींगमधील अनेक व्हिडिओ नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामुळे साराच्या फॅन्सना त्याची प्रतिक्षा आहे.


(सौजन्य- Instagram)