सोशल मीडियावर सारा अली खानच्या बिकिनी फोटोवर होतेय चर्चा

सोशल मीडियावर सारा अली खानच्या बिकिनी फोटोवर होतेय चर्चा

2020 सुरुवात सारा अली खानने एकदम हॉट केली असे म्हणायला हवी. कारण सारा अली खानचा एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सारा सध्या वेकेशनवर असून तिने तिचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने बिकिनी घातली आहे. आता बिकिनी घातल्यानंतर तिचे फोटो चर्चेचा विषय ठरणारच ना. एरव्ही पंजाबी ड्रेसमध्ये दिसणारी सारा अशा अवतारात दिसल्यामुळेत तिच्या या फोटोची चर्चा होत आहे. पण यंदा सारा या फोटोमुळे ट्रोल झाली नाही हे मात्र नक्की!

Ghost stories ... गुंतवणाऱ्या पण तितक्याच फॅन्सी

वेकेशनची मजा

सध्या बरेच सेलिब्रिटी परदेशी फिरत आहेत. सारा अली खान मालदीवमध्ये असून तिने तिचे मालदीव्समधील काही फोटो शेअर केले आहे. पूलच्या किनारी बसलेली सारा मस्त निळ्या आकाशाखाली ब्रेकफास्टचा आनंद घेत आहे. पूलमध्ये तिने काळ्या रंगाची बिकिनी घातली असून तिच्यासोबत तिचा लहान भाऊ इब्राहिम दिसत आहे.  महत्वाची गोष्ट अशी की, हा फोटो शेअर करताना तिने खाण्याचा फोटो शेअर करताना असे दिवस कायम असावेत असे म्हटले आहे. डाएटवर असलेल्या साराने हातात कपकेक घेणेच खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळेच ती तिचं वेकेशन एकदम मस्त घालवत आहे.

 

सारा अली खान झाली होती ट्रोल

Instagram

सारा अली खान अभिनेत्री असून ती तिच्या कामानुसार वेगवेगळे कपडे परिधान करते. पण लोकांना तिला पायघोळ ड्रेसमध्ये पाहायची इतकी सवय लागली आहे की तिने जरा अंगप्रदर्शन केले तर तिला लोकांनी ट्रोल करायला सुरुवात केली. सुरुवातीला तिने vogue साठी केलेल्या एका फोटोशूट केले होते. त्या फोटोशूटसाठी तिने वेस्टर्न आऊटफिट परिधान केले होते. तिच्या त्या कपड्यांवर अनेक फॅन्सनी नाराजी व्यक्त केली होती. त्या फोटोवरुनच तिला ट्रोल करण्यात आले होते. तुला असे शोभत नाही म्हणत तिला लक्ष्य करण्यात आले. पण आता मालदीव्सचे फोटो पाहता तिचा हा अंदाज अनेकांना आवडला असावा.

हार्दिक पांड्याला 'या' अभिनेत्रीने केले क्लीन बोल्ड, फोटो व्हायरल

सारा सगळ्यांच्याच आवडीची

साराबद्दल बोलायचे झाले तर ती सोशल मीडियाची आवडती सेलिब्रिटी आहे. ती जिथे जाते तिथे फोटोसाठी कायमच पापाराझींसाठी थांबते. शिवाय सोबत कोणतेही स्टारडम बाळगत नाही. ती मस्त बिनधास्त फिरते त्यामुळेच ती अनेकांची आवडती सेलिब्रिटी आहे. शिवाय साराचा सेन्स ऑफ ह्युमर चांगला असल्यामुळे तिचे बोलणेही एकदम समजूतदारपणाचे आहे. त्यामुळे तिच्या या स्पष्ट बोलण्याचेही अनेक चाहते आहे. 

साराचा करिअरग्राफ

साराच्या करिअरग्राफचा विचार करता तिचे दोन चित्रपट या वर्षी रिलीज होणार आहेत. या चित्रपटाची घोषणा या आधीच करण्यात आली आहे. आज कल आणि कुली नं 1 या चित्रपटात ती दिसणार असून कार्तिक आर्यन आणि वरुण धवन यांच्यासोबत ती स्क्रिन शेअर करणार आहे. 


सध्या सारा ब्रेकवर असून ती मस्त मालदीव्समध्ये दिवस घालवतेय. पण खरं सांगायचं तर तिचा हा बिकिनी अवतार हॉटपेक्षा क्युट आहे. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा  POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा. https://www.popxo.com/shop/zodiac-collection/