सााराच्या नव्या फोटोशूटमुळे फॅन झाले नाराज, पाहा फोटो

सााराच्या नव्या फोटोशूटमुळे फॅन झाले नाराज, पाहा फोटो

साराने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. या नव्या फोटोशूटमध्ये सारा is hot अशी प्रतिक्रिया आल्यावाचून राहणार नाही. पण साराचे हे फोटोशूट जरी तुम्हा आम्हाला आवडले असले तरी तिच्या काही चाहत्यांना मात्र चांगलाच धक्का बसला आहे. त्यांनी तिच्या या फोटोशूटवर नाराजी व्यक्त केली आहे. इतर अभिनेत्रींप्रमाणे तुला अंगप्रदर्शन करण्याची काहीच गरज नसल्याचे तिच्या फॅन्सनी म्हटले आहे.


'कलंक' चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का?


मासिकाचे शूट पडेल का महागात ?


साराचे नवाबी वागणे, चारचौघात अदबीने वागणे,अंगभर कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी बिनधास्त फिरणे हे अनेकांना आवडत होते. म्हणूनच अगदी कमी काळात तिने  लोकांना आपल्या प्रेमात पाडले. इन्स्टाग्रामवर तिचे ८० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. पण तिने तिच्या अकाऊंटवरुन एका मासिकासाठी केलेल्या फोटोशूटनंतर मात्र भूकंपच आला आहे. सारा तू असे का केले? दिशा पटानी सारखे तुला करण्याची काही गरज नाही. अशा आशयाच्या कमेंटस तिला तिच्या फॅन्सनी दिल्या आहेत.साराने हे फोटोशूट vogue या मासिकासाठी केले आहे.  पाहा साराचा हा हॉट अंदाज


sara 2sara 1sara 3sara 4


कॅन्सरवर मात करत इमरान खान परतला मुंबईत


 साराचा हॉट अंदाज


पण साराचे हे फोटो कमाल आहेत असेही म्हणायला हवे. अभिनेत्रींनी त्यांच्या लुकसोबत नेहमीच प्रयोग करायला हवा जी सारा ९० किलो वजनाची होती. त्यावेळी तिला कदाचित कोणीही पाहिले नसते. पण तिने स्वत:ला फिट करण्यासाठी वजन कमी केले. आता तिने अशा प्रकारचे फोटोशूट करण्यात काहीच गैर नाही. आता राहिला प्रश्न साराला अशा रुपात पहिल्यांदा पाहणाऱ्यांचा तर त्यांनी थोडे दमाने घ्यायला हवे. कारण अभिनेत्री म्हटल्यावर लुकवर प्रयोग तर होणारच त्यामुळे लगेचच नेटीझन्सनी प्रतिक्रिया देणेही चुकिचे आहे. पण काहींना मात्र साराचा हा नवा अंदाच चांगलाच आवडला आहे.  


comment sara


sara comment 2


श्वेता तिवारी पुन्हा करतेय कमबॅक


सध्या सारा काय करतेय ?


केदारनाथ चित्रपटातून साराने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ती रोहित शेट्टीच्या सिंबा या चित्रपटातून दिसली आणि आता सारा लव्ह आज कल २ मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट ती तिचा आवडता हिरो कार्तिक आर्यनसोबत ती हा चित्रपट करणार आाहे. या चित्रपटातील तिचा लीपलॉकचा एक सीन देखील व्हायरल झाला होता. त्यामुळे आता सारा या चित्रपटात व्यग्र आहे. जर तुम्हाला माहीत असेल तर या चित्रपटाचा पहिला भाग लव्ह आज कल २ हा २००९ साली आला होता. या चित्रपटात साराचे वडील अर्थात सैफ अली खान  आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत होते. आता तब्बल १० वर्षांनी सैफची मुलगी सारा या चित्रपटात काम करताना दिसणार आहे.इब्राहिमही येणार चित्रपटात? 


तर दुसरीकडे साराचा लहान भाऊ इब्राहिम अली खानही आता चित्रपटात येणार असल्याच्या चर्चा आहेत.सारा प्रमाणे इब्राहिमही चारचौघात नेहमीच शांत दिसतो. गेल्या शनिवारी त्याला जुहूच्या एका थिएटरमधून बाहेर येताना पापाराझींनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले. त्यावेळी त्याच्या फोटोनेही खळबळ माजवली. ज्युनिअर नवाब हँडसम असून तो देखील चित्रपटात चांगले करीअर करु शकेल असे म्हटले जात आहे. इब्राहिम  सैफ अली खानची हुबेहूब छबी आहे. त्यामुळेच या चर्चांना उधाण आले असे म्हणायला हवे. 


(फोटो सौजन्य- Instagram)