अभिनेत्री सारा अली खान करतेय ‘एक नवी सुरूवात’

अभिनेत्री सारा अली खान करतेय ‘एक नवी सुरूवात’

‘केदारनाथ’ आणि ‘सिम्बा’ या चित्रपटातून चाहत्यांच्या मनात घर केलेल्या सारा अली खानने एका नव्या गोष्टीला सुरूवात केली आहे. केदारनाथ चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला तर सिम्बामधील अभिनय कौशल्यामुळे ती लोकप्रिय झाली. कमी वयात आणि इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केल्यावर लगेच तिला चांगलं यश मिळालं. त्यामुळे ती आता स्वतंत्रपणे जगण्यास सक्षम झाली आहे.  साराने नुकतच तिची आई अमृता सिंगच्या घरी राहणं सोडलं असून ती तिच्या नव्या घरात शिफ्ट झाली आहे. व्हॅलेंटाईन डेला सारा तिच्या नव्या घरी शिफ्ट झाली आहे. त्यामुळे तिने या व्हॅलेंटाईन डेला स्वतःच स्वतःला ‘घर’ गिफ्ट दिलंय अशी चर्चा सुरू आहे. साराने तिच्या नव्या घरात शिफ्ट झाल्यानंतरचा फोटो इंन्स्टावर शेअर करत “Here’s to new beginnings!”  अर्थात “एक नवी सुरूवात” असं तिच्या चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. सारा चे घर शिफ्ट केल्याचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत  आहेत. ज्या फोटोंमध्ये ती गाडीमधून तिचं सामान शिफ्ट आहे असं दिसतंय. शिवाय साराने इन्स्टावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती घरातमध्ये तिच्या घरात सामानांच्या बॉक्सच्या मधोमध बसली आहे. शिवाय फोटोंमध्ये ती तिच्या नव्या घरात शिफ्ट झाल्यामुळे फार आनंदी झाल्याचंही दिसत आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Here’s to new beginnings! 💘💝💞💖💗


A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on
सारा नव्या घरात झाली 'शिफ्ट'


सारा अली खान सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिला अनेकजण फॉलो करतात. ती तिच्या चाहत्यांना चांगला प्रतिसादही देते. स्टार कीड असूनही सामान्य कलाकारांप्रमाणे वागते. कमी वयात आणि अभिनय क्षेत्रात प्रवेश केल्यावर लगेचच तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. सारा अली खान ही अमृतासिंग आणि सैफ अली खान यांची मुलगी आहे. मात्र आपल्या आईवडीलांच्या अभिनयक्षेत्रातील प्रसिद्धीचा तिने कधीच वापर केला नाही. शिवाय अभिनयक्षेत्रातील काम आणि यश हे तिने स्वतःच्या बळावर मिळवले आहे. आई अमृता सिंग हिच्यासोबत सारं काही सुरळीत सुरू असताना ती तिच्यापासून दूर राहण्यास का गेली ? याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. पण आजकाल भारतातही परदेशाप्रमाणे मुलं सेटल झाली की पालकांपासून वेगळी राहू लागतात. बॉलीवूडमध्ये आतापर्यंत वरूण धवन, आलिया भट, रणबीर कपूर हे स्टारकीड्सदेखील  यशस्वी झाल्यानंतर त्यांच्या पालकांपासून वेगळे राहू लागले होते. शिवाय अभिनय क्षेत्रात काम करताना कलाकारांना वेळेची बंधने पाळता येत नाहीत. त्यामुळे एकाच क्षेत्रात असूनही पालकांना या गोष्टीचा त्रास होऊ नये म्हणूनही या क्षेत्रातील मुलं आपल्या आई-वडीलांपासून स्वतंत्र राहत असावीत. शिवाय यामुळे त्यांना करीअरबाबत आणि आर्थिक नियोजनाबाबतचे निर्णय स्वतंत्रपणे घेता येतात. सारा अली खाननेही आता स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभं राहण्याचा विचार घेतला असावा. म्हणूनच तिने यापुढे आपल्या आईवर अवलंबून न राहता स्वतंत्रपणे राहण्याचा निर्णय घेतला आहे.


Sara Ali khan new


अभिनेत्री अदिती द्रविडचा ‘राधा’मय नृत्यविलास


रोहीत शेट्टी आणि अक्षयच्या ‘सूर्यवंशी’च्या चित्रीकरणाच्या आधीच टीझर झाला शूट


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम