सारा अली खान ‘या’ व्यक्तीपासून दूर राहूच शकत नाही, सांगितले लग्नाचे प्लॅन्स

सारा अली खान ‘या’ व्यक्तीपासून दूर राहूच शकत नाही, सांगितले लग्नाचे प्लॅन्स

सारा अली खानने ‘केदारनाथ’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमधून धमाकेदार पदार्पण केलं. साराच्या वागण्याबोलण्यामुळे ती अगदी मीडियाचीदेखील लाडकी झाली आहे. साराच्या अभिनयाची तर प्रशंसा झालीच पण तिच्या वागण्याची त्यापेक्षाही अधिक प्रशंसा होते. लवकरच तिचा क्रश असणाऱ्या कार्तिक आर्यनबरोबर ‘लव आज कल 2’ हा चित्रपट येत आहे. या दोघांचं अफेअर असल्याचीदेखील सध्या चर्चा आहे. कारण सारा आणि कार्तिक बऱ्याचदा हल्ली एकत्र दिसतात. त्यामुळे नक्की सारा कोणत्या व्यक्तीपासून दूर राहू शकत नाही याचा आता नक्कीच तुम्ही अंदाज लावायला सुरुवात केली असणार. पण जरा थांबा. तुम्हाला वाटतंय तसं काहीच नाही. अर्थात साराच्या आयुष्यात अशी एक महत्त्वाची व्यक्ती आहे ज्याशिवाय ती राहू शकत नाही.


लग्नाच्या प्रश्नावर दिलं साराने उत्तर


साराच्या चित्रपटांबरोबरच तिचं कार्तिकबरोबर असलेलं अफेअर आणि तिच्या लग्नाच्या चर्चांनाही ऊत आला आहे. पण या सगळ्यावर साराने आता उत्तर दिलं आहे. एका मुलाखतीमध्ये साराने या सगळ्या प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरं दिली आहेत. सारा अली खान गेल्या काही दिवसांपासून कार्तिक आर्यनबरोबर बऱ्याच ठिकाणी दिसत असून हे दोघं बऱ्याचदा लपूनछपून भेटतानाही फोटो व्हायरल झाला आहे. नुकताच रमजानच्या महिन्यातदेखील कार्तिक आणि सारा मुंबईतील प्रसिद्ध महंमद अली रोडवर खायला गेले होते. ज्याचा फोटोही व्हायरल झाला होता. तोंडावर मास्क लाऊन गेल्यामुळे दोघांना कोणीही ओळखलं नाही. साराने करण जोहरच्या शो वर कार्तिक आर्यनला डेट करायचं आहे असं सांगितल्यानंतर प्रत्येकाचे डोळे यांच्यावर खिळले आहेत. पण आता स्वतः साराने या सर्व चर्चांवर उत्तर दिलं आहे.


सारा कोणाशिवाय राहू शकत नाही


sara khan 1


साराच्या आयुष्यात अशी एकच व्यक्ती आहे जिच्याशिवाय ती राहू शकत नाही आणि ती म्हणजे तिची आई अमृता सिंग. सारा तिच्या आईबरोबरच राहाते. साराने सांगितलं, ‘मला पूर्ण आयुष्य माझ्या आईबरोबरच राहायचं आहे. मी जेव्हा तिला असं सांगते तेव्हा ती खूपच हैराण होते. कारण तिच्याजवळ माझ्या लग्नाचा पूर्ण प्लॅन आहे. ती माझ्यासोबतही येऊ शकते. मला तिच्याबरोबर फिरायला खूप आवडतं. ती एक दिवस जरी माझ्यापासून दूर असेल तरी मला तिची आठवण येते. मी तिच्याशिवाय राहू शकत नाही.’  सारा नेहमीच आपल्या आईबरोबर फोटो पोस्ट करत असते. नुकताच अमृताबरोबरचा ईदच्या शुभेच्छा देणारा साराचा फोटोही व्हायरल झाला होता.


सारा आणि कार्तिकची केमिस्ट्री


sara khan 2


सारा आणि कार्तिकची केमिस्ट्री बघायला प्रेक्षक खूपच आतुर आहेत. जेव्हापासून साराने कार्तिकला डेट करायचं आहे असं सांगितलं तेव्हापासून प्रत्येकाचं या जोडीकडे लक्ष आहे. सध्या हे दोघेही इम्तियाज अलीच्या ‘लव आज कल 2’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहेत. शिवाय अनेक ठिकाणी हे दोघं फिरताना दिसतात. कधी खुलेआम तर कधी तोंड लपवून या दोघांना फिरताना पाहिलं आहे. त्यामुळे नक्की या दोघांमध्ये काय शिजत आहे, हे जाणून घेण्यात सध्या लोकांना उत्सुकता आहे. पण काही ठिकाणी हे सगळं चित्रपटाच्या प्रमोशनचे फंडे असल्याचंही म्हटलं जात आहे. त्यामुळे आता जेव्हा चित्रपट प्रदर्शित होईल त्यानंतर ही जोडी काय करते हे पाहावं लागेल. सध्या तरी सारा आणि कार्तिक दोघांचंही करिअर चांगलं चालू असल्यामुळे दोघांनाही आपल्या करिअरकडे लक्ष द्यायचं निश्चित केलं आहे.


फोटो सौजन्य - Instagram, Viral Bhayani


हेदेखील वाचा - 


अर्पिता खानने जॉर्जियाला का दिला ओढणी सावरण्याचा सल्ला


सूर्यवंशीमध्ये ‘बॅडमॅन’ साकारणार व्हिलनची भूमिका


Good News: बबिता फोगट करणार लवकरच लग्न, याचवर्षी वाजणार सनई - चौघडे