'बागी 4' मध्ये टायगर श्रॉफसोबत मुख्य भूमिकेत सारा अली खान

'बागी 4' मध्ये टायगर श्रॉफसोबत मुख्य भूमिकेत सारा अली खान

सारा अली खानने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आणि तिला एका पाठोपाठ एक हिट चित्रपट मिळाले. ज्यामुळे खूप कमी वेळात सारा बॉलीवूडमध्ये प्रगतीच्या शिखरावर पोहचली. साराचा एक विशेष चाहता वर्ग आहे. ज्यामुळे चाहत्यांना साराचे आगामी चित्रपट आणि इतर गोष्टी नेहमीच जाणून घ्यायच्या असतात. सारा बॉलीवूडमध्ये आली तेव्हापासून ती टायगरसोबत बागीच्या सिक्वलमध्ये दिसणार असं म्हटलं जात होतं. ज्यामुळे दोन वर्षांपूर्वी सारा ‘बागी 3’ मध्येही टायगरसोबत  झळकणार अशी आशा चाहत्यांना वाटत होती. एकतर बागीचे तिनही सिक्वल भरपूर ड्रामा, अॅक्शन आणि रोमांसने भरलेले होते. मात्र बागी 3 मध्ये सारा ऐवजी श्रद्धा कपूरच झळकली आणि साराच्या चाहत्यांशी काहीशी निराशा झाली. बागीची लोकप्रियता पाहता आता बागीचा चौथा सिक्वल तयार केला जाणार आहे. ज्यामध्ये आता सारा अली खान टायगर सोबत मुख्य भूमिकेत असेल असं म्हटलं जात आहे. हे ऐकून आता साराच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असेल.

साजिदने पूर्ण केलं साराला दिलेला 'शब्द'

टायगर आणि सारा साजिदच्या ‘हीरोपंती 2’ मध्ये एकत्र काम करणार होते. मात्र काही कारणांमुळे सारा अलीचं नाव या चित्रपटातून मागे घेण्यात आलं होतं. हीरोपंती 2 मध्ये आता सारा ऐवजी तारा सुतारिया टायगरसोबत दिसणार आहे. मात्र साराला साजिदच्या चित्रपटात काम करण्याची मनापासून इच्छा होती. साजिदनेही साराला त्याच्या आगामी चित्रपटात तो तिला कास्ट करणार असं सांगितलं होतं. आता दिलेला शब्द पाळत साजिदने आता ‘बागी 4’ मध्ये साराला कास्ट करण्याचा विचार केला आहे. साजिदसाठी बागी 4 चित्रपट खूप मोठा आणि बिग बजेट असणार आहे. ज्यामुळे आता सारा साजिदच्या या बिग बजेट चित्रपटात टायगर श्रॉफसोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. शिवाय यामुळे बागीच्या या चौथ्या सिक्वलमध्ये एक फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. हीरोपंती 2 चं शूटिंग पूर्ण होताच सारा आणि टायगर बागी 4 च्या शूटिंगला सुरूवात करणार आहेत. साराने नुकतंच तिच्या ‘अतरंगी रे’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण  केलं आहे. लॉकडाऊनमुळे या चित्रपटाचं शूटिंग चांगलंच रखडलं होतं. या शिवाय ती सध्या विकी कौशलसोबत ‘दी अमर अश्वत्थामा’चं शूटिंग करण्यामध्ये व्यस्त आहे. 

'बागी 4' असणार ग्रॅंड सिनेमा

बागीच्या सर्वच सिक्वल्सनां आतापर्यंत प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. म्हणूनच निर्मात्यांनी पुन्हा एकदा या चित्रपटाचा आणखी एक सिक्वल तयार करण्याचा घाट घातला आहे. याआधी बागी आणि बागी  3 मध्ये टायगरसोबत श्रद्धा कपूरने काम केलं  होतं. त्यानंतर बागी 2 मध्ये टायगर त्याची गर्लफ्रेंड दिशा पटनीसोबत एकत्र दिसला होता. म्हणूनच आता नव्या सिक्वलमध्ये निर्मात्यांना टायगरसोबत एक फ्रेश आणि लोकप्रिय चेहरा हवा होता. सहाजिकच बागीचा चौथा सिक्वल हा पहिल्या तीन चित्रपटांपेक्षा मोठा आणि ग्रॅंड  असणार आहे. शिवाय यामध्ये प्रेक्षकांना टायगरच्या नव्या अॅक्शन मूव्हज आणि सारासोबतचा रोमॅन्स पडद्यावर पाहता येणार आहे. त्यामुळे चाहतेही ही नवी जोडी पाहण्यासाठी नक्कीच उत्सुक असतील.