सैफने केला खुलासा, साराने 'जवानी जानेमन'मधील भूमिकेसाठी का दिला नकार

सैफने केला खुलासा, साराने 'जवानी जानेमन'मधील भूमिकेसाठी का दिला नकार

सैफ अली खानने 'तान्हाजी' मध्ये साकारलेली उदयभानची भूमिका प्रेक्षकांना फारच आवडली आहे. तान्हाजीच्या भव्यदिव्य यशानंतर सैफ आता त्याच्या ‘जवानी जानेमन’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त झाला आहे. या चित्रपटात सैफ एका टीनएज मुलीच्या पित्याची भूमिका साकारणार आहे. ज्यामध्ये त्याच्या मुलीची भूमिका अलाया फर्निचरवाला साकारात आहे. अलाया जवानी जानेमनमधून बॉलीवूडमध्ये डेब्यू करत आहे. मात्र या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सैफने एका वेगळयाच गोष्टीचा खुलासा केला आहे. ज्यामधुन त्याला त्याची खरी मुलगी साराविषयी वाटणाऱ्या भावना व्यक्त होत आहेत.  

साराने का नाकारली सैफसोबत काम करण्याची ऑफर

जवानी जानेमनमध्ये सैफच्या मुलीची भूमिका अलाया फर्निचरवालाने साकारली आहे. मात्र सैफच्या मते ही भूमिका आधी सारा अली खान म्हणजेच सैफच्या खऱ्या मुलीला ऑफर करण्यात आली होती. सारा अली खान तेव्हा तिच्या केदारनाथ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार होती. सारा डेब्यू करत असलेला केदारनाथ चित्रपट काही कारणांमुळे लांबणीवर पडला होता. ज्यामुळे सैफला वाटत होतं की साराने त्याच्यासोबत जवानी जानेमनमध्ये काम करावं. साराच्या पहिल्याच चित्रपटात तिच्यासोबत एकत्र काम करण्यास तो नक्कीच उत्सुक होता. मात्र साराचा केदारनाथ चित्रपट मार्गी लागला आणि लगेचच तिला रोहीत शेट्टीच्या सिम्बाचीदेखील ऑफर मिळाली. ज्यामुळे साराने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. साराला तिच्या अभिनयकौशल्यावर काम मिळवायचं होतं. ज्यासाठी तिला तिच्या आईवडीलांच्या प्रसिद्धीची मदत नको होती. यासाठी साराने पहिल्याच चित्रपटात सैफबरोबर काम करण्यास नकार दिला. साराने या चित्रपटात काम करण्यास नकार दिल्यामुळे ही भूमिका अलाया फर्निचरवालाला मिळाली. अलाया फर्निचरवाला पूजा बेदीची मुलगी आहे. साराने नकार दिल्यामुळे अलायाला बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. 

जवानी जानेमनमधील सैफच्या ‘ओले ओले’ गाण्याने सोशल मीडियावर घातला धूमाकूळ

नितीन कक्कड दिग्दर्शित जवानी जानेमन चित्रपट 31 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. हा एक कॉमेडी सिनेमा आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत तब्बूदेखील महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे. तब्बल 20 वर्षानंतर तब्बू आणि सैफ एकत्र काम करत आहेत. या आधी दोघांनी सूरज बडजात्याच्या ‘हम साथ साथ है’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. मात्र या चित्रपटात त्यांच्या वेगळ्या भूमिका होत्या. जवानी जानेमनमध्ये सैफ कोणतीही जबाबदारी न स्वीकारणाऱ्या पुरूषाची भूमिका साकारत आहे. ज्यामध्ये त्याला लग्न, मुलं ही जबाबदारी नको असते. मात्र अचानक त्याच्यासमोर त्याची टीनएज मुलगी येते ज्यामुळे त्याच्या आयुष्यात होणारे बदल या चित्रपटातून पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना खूपच आवडला होता. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील ओले ओले हे गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं होतं. हे गाणं सैफच्या दिल्लगी या चित्रपटातील असून त्याचं न्यू व्हर्जन आता प्रदर्शित करण्यात आलं आहे. ज्यामध्ये सैफ अली खानचा नवा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मात्र या गाण्यामुळे सैफच्या जुन्या ओले ओले गाण्याला आठवणींना नक्कीच उजाळा मिळत आहे.

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा -

प्रियांका चोप्राची घोडदौड सुरूच, शिरपेचात नवा मानाचा तुरा

शाहरूखने चाहत्याला सांगितले आपल्या 'मन्नत' बंगल्याच्या एका रूमचे भाडे, जिंकले मन

अभिनेत्री हिना खानच्या व्हायरल व्हिडिओने फॅन्स हैराण