सारा अली खानने केला ब्रायडल लुक शेअर, लग्नासाठी आले प्रपोजल्स

सारा अली खानने केला ब्रायडल लुक शेअर, लग्नासाठी आले प्रपोजल्स

‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री आणि एकाच महिन्यात दोन्ही चित्रपट प्रदर्शित होऊन दोन्ही चित्रपटांमधून सारा अली खानने (Sara Ali Khan) प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं. सारा नेहमीच तिच्या नवाबी अंदाज आणि अदबीमुळे चर्चेत असते. इतकंच नाही तिने तिच्या अभिनयानेही प्रेक्षकांना आपलंसं करून घेतलं आहे. तिचा हा अंदाज आणि तिचा ड्रेसिंग सेन्सदेखील युवा मुलांना आवडत आहे. सारा सध्या बॉलीवूडचा प्रसिद्ध चेहरा झाली आहे यात काहीच शंका नाही. त्यामुळेच सध्या तिच्याकडे बऱ्याच जाहिरातीदेखील आहेत. तर तिचे बरेच फोटोशूटही ती शेअर करत असते. नुकताच तिने सोशल मीडियावर एका ज्वेलरी ब्रँडकरिता केलेलं फोटोशूट शेअर केलं आहे. तिचा हा फोटो इतका व्हायरल झाला की, तिला लग्नाची प्रपोजल्स सोशल मीडियावर यायला लागली आहेत.


ब्रायडल लुकमध्ये स्टनिंग सारा


sara ali khan wear red lehenga fans get crazy FI


साराने आपल्या अधिकृत सोशल अकाऊंटवरून लाल रंगाचा ब्रायडल लेहंगा घातलेला फोटो पोस्ट केला आहे. सारा या लाल रंगाच्या लेहंग्यामध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. तिच्या चाहत्यांना तिचा हा लुक खूपच आवडला असून सारा यामध्ये स्टनिंग दिसत आहे. तिच्या या लुकसाठी तिला खूपच पॉझिटिव्ह कमेंट्स मिळत आहेत. इतकंच नाही तिच्या या लुकमुळे तिला सोशल मीडियावरच लग्नाचे प्रपोजल्सही यायला लागले आहेत. तिच्या एका चाहत्याने तिला विचारलं, ‘सारा तू माझ्याबरोबर 7 फेरे घेशील का?’ तर काही जणांनी तिला इथे तिखी मिरची अशीही उपमा दिली आहे. तर एका चाहत्याने म्हटलं आहे की, ‘आता तर तू लग्नाचा ड्रेसही घातला आहेस, मी पण आता शेरवानी शिऊन घेतो’, असे आणि अनेक मजेशीर प्रपोजल्स साराला सोशल मीडियावर येत आहेत.


sara ali khan wear red lehenga


काही वर्षांपूर्वी साराचं वजन होतं 96 किलो


sara


आता सारा जशी दिसते अशा स्लिम ट्रीम साराचं वजन काही वर्षांपूर्वी 96 किलो होतं. त्यामुळे तिची आई अमृता सिंग आणि वडील सैफ अली खान या दोघांनाही तिची खूप काळजी होती. त्यावेळी सैफने तिला चित्रपटांमध्ये जायचं असेल तर वजन कमी करावंच लागेल हे सांगितलं होतं. वजन कमी करण्यासाठी साराने खूपच कष्ट घेतले. तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिला पीसीओडी (PCOD) ची समस्या होती आणि त्यामुळे तिचं वजन वाढतंच गेलं होतं. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिने तिची लाईफस्टाईल सुधारली आणि तिने आपल्या खाण्यावरही प्रचंड नियंत्रण आणलं. तसंच चार महिने प्रचंड मेहनत करून आणि वर्कआऊट करून तिने 30 किलो वजन कमी केलं. यानंतरच तिने बॉलीवूडमध्ये प्रवेश केला.


कार्तिक आर्यनबरोबर जोडलं गेलं आहे नाव

करण जोहरच्या चॅट शो मध्ये कार्तिक आर्यनला डेट करायला आवडेल असं सांगितल्यानंतर इम्तियाज अलीने सारा आणि कार्तिकला आपल्या ‘लव आज कल 2’ या चित्रपटासाठी साईन केलं आणि त्यानंतर कार्तिक आणि साराला विविध ठिकाणी एकमेकांबरोबर बघितलं गेलं आहे. त्यामुळे खरंच सारा आणि कार्तिक एकमेकांना डेट करत आहेत का असा प्रश्नही त्यांच्या चाहत्यांना सध्या सतावत आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण अजूनही चालू आहे.


फोटो सौजन्य - Instagram


हेदेखील वाचा - 


सारा अली खान ‘या’ व्यक्तीपासून दूर राहूच शकत नाही, सांगितले लग्नाचे प्लॅन्स


कार्तिक आर्यन आणि सारा अली खानची ताटातूट


सारा आणि कार्तिकमध्ये नक्कीच काहीतरी शिजतंय... फोटो आहेत पुरावा