सारा का ओरडत होती कार्तिकच्या नावाने, व्हिडिओ झाला व्हायरल

सारा का ओरडत होती कार्तिकच्या नावाने, व्हिडिओ झाला व्हायरल

सारा आणि कार्तिक सध्या दिल्लीमध्ये इम्तियाज अलीच्या चित्रपटासाठी चित्रीकरणामध्ये व्यस्त होते. नुकतंच या चित्रपटाचं दिल्लीमधील शेड्युल संपलं आहे. यावेळी साराला मिळालेल्या फिल्मफेअर पुरस्कार आणि कार्तिकला मिळालेल्या झी पुरस्कारासाठी सेलिब्रेशन करण्यात आलं. त्यावेळी सारा आणि कार्तिकची धमाल असलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये या दोघांची अफलातून केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. कार्तिकने आपल्या अधिकृत अकाऊंटवरून सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.


साराची नौटंकी


साराला नेहमीच अनेक मुलाखतीमध्ये मस्ती करताना पाहिलं आहे. साराचा सेन्स ऑफ ह्यूमरदेखील खूपच चांगला आहे. शिवाय ती प्रत्येकाशीच खूप अदबीने आणि प्रेमाने वागते. सारा आणि कार्तिकला एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. दरम्यान सध्या हे दोघं इम्तियाज अलीच्या चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. याचं दिल्लीतील चित्रीकरण संपलं तेव्हा करण्यात आलेल्या पार्टीमध्ये सारा कार्तिकचं नाव घेऊन जोरजोरात ओरडत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. सगळे जण त्यावर हसत आहेत. साराने कार्तिकला अक्षरशः लाजवलं. ती ओरडत असताना कार्तिकने दोन वेळा तिच्या तोंडावर हात ठेऊन तिला गप्प करण्याचा प्रयत्न केला तरीही सारा त्याचं नाव घेऊन ओरडत होती. हा मजेशीर व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

This on screen couple ❤️❤️❤️ #kartikaaryan #saraalikhan


A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on
काही दिवसांपूर्वीच बाईकस्वारीचा व्हिडिओ झाला व्हायरल


सारा आणि कार्तिक दिल्लीच्या रस्त्यावर एका बाईकवरून जात होते. याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीच व्हायरल झाला होता. त्यावेळी साराने हेल्मेट न घातल्यामुळे तिला ट्रोल करण्यात आलं होतं. पण या दोघांची केमिस्ट्री अशा व्हिडिओंमधून बघायला सध्या त्यांच्या चाहत्यांना आवडत आहे. साराने अगदी आपल्या पहिल्या चित्रपटापासून प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. तर कार्तिक सध्या हार्टथ्रोब ऑफ द नेशन आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

कार्तिकला डेट करायला आवडेल - सारा


काही महिन्यांपूर्वीच करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’मध्ये साराने आपल्याला कार्तिक आर्यनला डेट करायला आवडेल असं सांगितलं. तेव्हापासूनच तिला आणि कार्तिकला भेटवण्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न सुरू केले ज्यामध्ये सर्वात पहिलं नाव घेतलं गेलं ते म्हणजे रणवीर सिंहचं. त्यानंतर या जोडीला आपल्या चित्रपटामध्ये दिग्दर्शक इम्तियाज अलीने कास्ट करून या दोघांचंही स्वप्न एक प्रकारे पूर्ण केलं असं म्हणावं लागेल. सध्या ही जोडी बऱ्याच ठिकाणी एकत्र दिसत असून खूपच आनंदात दिसत आहे. पण अजूनही हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत की नाही हे स्पष्ट झालेलं नाही.


sara
सारा सध्या इम्तियाज अलीच्या चित्रपटामध्ये व्यग्र असून कार्तिकबरोबरच काम करत आहे. तर कार्तिककडे याशिवाय ‘पती पत्नी और वो’ हा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकरसह कार्तिक प्रेक्षकांना दिसणार आहे.


फोटो सौजन्य - Instagram 


हेदेखील वाचा 


असे बॉलीवूड सेलिब्रिटी ज्यांनी आई-वडील होण्यासाठी घेतला सरोगसीचा आधार


रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी'मध्ये 9 वर्षानंतर अक्षय आणि कॅट ही जोडी दिसण्याची शक्यता


नीता अंबानी यांनी सूनमुख पाहून श्लोकाला दिलं 'हे' महागडं गिफ्ट