ADVERTISEMENT
home / मनोरंजन
लिटिल चॅम्प्सचं स्वप्न साकारण्यासाठी सारेगमपचा मंच सज्ज

लिटिल चॅम्प्सचं स्वप्न साकारण्यासाठी सारेगमपचा मंच सज्ज

टेलिव्हिजनवरील ‘सा रे ग म प’ हा कार्यक्रम सर्वांचाच  आवडता आहे. कारण तो अनेकांच्या स्वप्नपूर्तीचा मंचच आहे असं म्हटल तर खोटं ठरणार नाही. या मंचाने आजवर अनेक उत्तमोत्तम गायक, गायिका, संगीतकार या मनोरंजन क्षेत्राला दिलेले आहेत. फक्त लोकप्रियताच नाही तर खऱ्या अर्थाने या मंचाने गायक, गायिका घडवले असून त्यांच्या संगीत क्षेत्रातील प्रवास यशस्वी बनवला आहे. सारेगमपचा हा प्रतिष्ठित मंच गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत असून या कार्यक्रमाने तमाम संगीतप्रेमींच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. आता नवीन पिढीतून काही उमद्या गायकांना घडवण्याचा वारसा जपत जवळपास बारा वर्षांनी सा रे ग म पचे आवडते लिटिल चॅम्प्स पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बारा वर्षांनी पुन्हा एकत्र येणार सारेगमपचं पंचरत्न

‘सा रे ग म प’च्या या प्रवासात अनेक पर्व गाजली आणि त्यात विशेष उल्लेख करावा लागेल तो १२ वर्षांपूर्वी झालेल्या ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’चा. अनेक टॅलेंटेड लिटिल चॅम्प्सच्या अफलातून परफॉर्मन्सेसमुळे हे पर्व तुफान गाजलं. या छोट्या मुलांच्या गाण्यांना साथ मिळाली होती ती म्हणजे ‘कमलेश भडकमकर’ आणि त्यांचा वादक मित्रांची. निलेश परब यांची ढोलकी, अमर ओक यांची बासरी, अर्चिस लेलेंचा तबला, सत्यजित प्रभू यांचा सिंथेसायजर, या मंडळींनी ही वाद्य वाजवायला घेतली की कानसेनांच्या कान तृप्त व्हायचे, जणू ही वाद्य आपल्याशी बोलत आहेत असे वाटे. या पर्वातील महाअंतिम फेरीत पोहोचलेली पंचरत्न म्हणजेच  रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वंशयपायन, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर यांनी प्रेक्षकांची मन तर जिंकलीच पण या कार्यक्रमाने या पंचरत्नांना संगीत क्षेत्रात उतरण्यासाठी तयार केलं आणि त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली. झी मराठीवर गाजलेल्या मालिकांची शीर्षक गीत गाण्याची संधी या पंचरत्नांना मिळाली. या पंचरत्नांनी मनोरंजन सृष्टीत नावलौकिकता मिळवली.

स्पर्धकांचे ताईदादा बनणार सारेगमपचे लिटिल चॅम्पस

नव्या पर्वाची झलक सध्या वाहिनीवर दाखवली जात  आहे. त्यामुळे घरोघरी सध्या लिटिल चॅम्प्सच्या नवीन पर्वाची चर्चा सुरू आहे. यावेळी स्पर्धेत जजेस नसून ज्युरी असणार आहेत, हे ज्युरी दुसरे कोणी नसून आपले ‘पंचरत्न’ असणार आहेत, हे ज्युरी आपल्या छोट्या स्पर्धकांचे मोठं स्वप्न साकारण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. यासोबतच या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ‘मृण्मयी देशपांडे’ करणार आहे. ह्या पर्वाचे नावीन्य म्हणजे ह्या पर्वात कोणतही एलिमिनेशन होणार नाही, छोट्या स्पर्धकांवर स्पर्धेतून बाहेर पडण्याचं कोणतंही दडपण नसेल. हो पण एलिमिनेशन नसलं तरी या गायक मित्र मैत्रिणींना आपलं गाणं रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मेहनत घ्यावीच लागणार आहे. म्हणजेच ह्या १४ छोट्या स्पर्धकांचा महाअंतिम सोहोळ्यापर्यंतचा प्रवास अनोखा असणार हे नक्की, सा रे ग म प लिटिल चॅम्प्स हा कदाचित मराठीतला एकमेव रिऍलिटी शो असेल ज्यात एकही स्पर्धक महाअंतिम सोहोळ्यापर्यंत स्पर्धेबाहेर जाणार नाही. महाराष्ट्रातील उत्तोमत्तम गायक शोध हा कार्यक्रम घेतो त्यामुंळे लहानग्या गायकांसाठी सा रे ग म प पुन्हा एकदा नवी उमेद घेऊन आलं आहे. ही बच्चेकंपनी पुढे संगीतक्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करतीलच, ही ओळख आणि लिटिल चॅम्प्सचं  मोठं स्वप्न साकारण्यासाठी झी मराठी आणि सारेगमपचा मंच सज्ज आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने झी मराठीवरील प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकारांनी देखील आपल्या लहानपणीचे फोटोज शेअर केले असून त्यांचं छोटेपणीचं मोठं स्वप्न त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमाच्या स्वागताची कलाकारांची हि अनोखी पद्धत प्रेक्षकांना खूपच भावली. त्यांच्या या पोस्टवर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत.२४ जूनपासून गुरुवार ते शनिवार रात्री ९.३० वा. हा शो प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

मोनालिसाचं घराचं स्वप्नं पूर्ण, आनंदाने झाली व्यक्त

परराज्यातून मराठी मालिकांनी गुंडाळला गाशा, मुंबईत करणार चित्रीकरण

प्रेक्षकांसाठी अभिनयाची ‘अजूनही बरसात आहे’ मुक्ता आणि उमेश एकत्र

ADVERTISEMENT
15 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT