सातारचा सलमान चित्रपटाचं जबराट 'टायटल सॉंग'

सातारचा सलमान चित्रपटाचं जबराट 'टायटल सॉंग'

सातारचा सलमान या आगामी चित्रपटातून सुयोग गोऱ्हे, शिवानी सुर्वे आणि सायली संजीव यांची भन्नाट केमिस्ट्री दिसणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं टायटल सॉंग प्रदर्शित करण्यात आलं आहे. 'सातारचा सलमान' असे बोल असलेल्या हे भन्नाट टायटल सॉंगला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या गाण्यामध्ये चित्रपटातील सर्वच कलाकार भन्नाट दंगामस्ती करताना दिसत आहेत. सातारचा सलमान टायटल सॉंग ऐकताना  प्रेक्षकांनाही या गाण्यावर ताल धरावासा वाटेल असा कल्ला या गाण्यात दाखविण्यात आला आहे. या गाण्याचा व्हिडिओ आतापर्यंत जवळजवळ 45,000 हजाराहून अधिक प्रेक्षकांनी पाहिला आहे. सातारचा सलमान हे गाणं आदर्श शिंदेने गायलेलं आहे. तर या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन सुजित कुमार यांनी केलं आहे. अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणात रंगलेलं हे गाणं प्रेक्षकांना नक्कीच आवडणार आहे. सातारचा सलमान या चित्रपटाचं दिग्दर्शन हेमंत ठोमे याने केलं आहे. सातारचा सलमान 11 ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. 

सातारचा सलमान सुयोग गोऱ्हे

सुयोगने यापूर्वी आम्ही बेफिकीर, कृतांत, शेंटीमेंटल, गर्लफ्रेंड या चित्रपटातून काम केलं आहे. आता सातारच्या सलमान या चित्रपटातून त्याला पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत. या चित्रपटात सुयोगचा नेहमीपेक्षा वेगळा अंदाज त्याच्या चाहत्यांना पाहता येईल. सातारचा सलमानमध्ये तो अमीत नावाची भूमिका साकारत आहे. मात्र गावातील माणसं त्याला साताराचा सलमान असं म्हणत असतात. शिवाय या चित्रपटातून एका छोट्या शहरात मुलाच्या स्वप्नांचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. खेडेगावात राहूनही मोठमोठी स्वप्न पाहणाऱ्या मुलाची ही कथा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

शिवानी सुर्वेची दिलखेचक अदा

सातारचा सलमानच्या टीझर आणि टायटल सॉंगमधून बिग बॉस मराठी 2 फेम शिवानीचा एक हटके अंदाज पाहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात बिग बॉसच्या घरात सर्वात चर्चेत ठरणार नाव होत शिवानी सुर्वे. आता शिवानी सातारचा सलमान या चित्रपटात प्रमुख भुमिकेत झळकणार  आहे. या चित्रपटात तिची थोडी वेगळी आणि हटके भूमिका असेल. ती या चित्रपटात दीपिका भोसले ही भूमिका साकारणार आहे. दीपिकाचा बोल्ड आणि बिनधास्त ठसका या चित्रपटात प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. 

साध्या सोज्वळ भूमिकेत सायली संजीव

काहे दिया परदेस या टेलिव्हिजन मालिकेतून घराघरात पोहचलेली सायली या चित्रपटात असणार आहे. या चित्रपटात सायलीची सायली माधुरी माने अशी साधीभोळी आणि सोज्वळ अशी भूमिका असेल. थोडक्यात या तिघांना पाहण्यासाठी प्रेक्षक सातारचा सलमानला नक्कीच गर्दी करतील. 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा

साजणाच्या रमाची ‘स्टाईलगिरी’

Good News: रवीना टंडनच्या घरी आला छोटा पाहुणा, रवीनाने दिली गोड बातमी

अग्गंबाई सासूबाई’मधील ‘आई’चा व्हायरल व्हिडिओ स्मृती ईराणींनीही केला शेअर