अभिनेत्री सयानी गुप्ताने का केला आहे बाल्ड लुक

अभिनेत्री सयानी गुप्ताने का केला आहे बाल्ड लुक

अभिनेत्री सयानी गुप्ता नुकतीच 'आर्टिकल 15' या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटातील सयानीच्या कामाचं फार कौतुक झालं होतं. आता सयानीचा हा बाल्ड लुक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. सयानीने तिच्या इन्स्टा अकाऊंटवरून तिचा हा लुक शेअर केला आहे. तिच्या या लुकवरून खरंच तिने तिचे संपूर्ण केस काढून टाकले आहेत असं वाटत आहे. कारण या लुकसोबत तिने शेअर केलं आहे की, “मी माझ्या हेअर स्टाईलिस्टला कामावरून काढून टाकलं.”  ज्यामुळे सयानीने हा लुक नेमका कोणत्या कारणासाठी केला आहे हे मुळीच समजू शकत नाही. 

सयानीच्या या बाल्ड लुकमागचं नेमकं कारण काय

सयानीचा हा लुक पाहून तिने एखाद्या कारणासाठी तिचे संपूर्ण केस काढले आहेत असं तुम्हाला नक्कीच वाटेल. मात्र असं मुळीच नाही कारण तिने या लुकसाठी प्रोथेटिक्सचा वापर केलेला आहे. सयानीने शेअर केलेला हा तिचा नवा लुक अनेकांना आवडला आहे. कारण तिच्या पोस्टवर तिला काही चाहत्यांनी आणि बॉलीवूडच्या कलाकारांनी चांगल्या कमेंट्स दिल्या आहेत. बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झा, मोनिका डोगरा, अलावा सयानी यांनी तिची या पोस्टवर प्रशंसादेखील केली आहे. यासोबतच सयानीने या लुकचा मेकअप करत असलेला तिचा एक व्हिडिओ तिच्या अकाऊंटवरून शेअर केला आहे. ज्या व्हिडिओला एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा लुक सयानीने तिच्या एखाद्या नव्या प्रोजेक्टसाठी केला आहे असं वाटत आहे. कारण या व्हिडिओमध्ये तिने एक साधी पांढरी आणि निळ्या बॉर्डरची कॉटन साडी नेसलेली आहे. शिवाय तिचे मेकअप आर्टिस्ट तिचा हा लुक करण्यासाठी प्रचंड मेहनत घेताना दिसत आहे. मात्र हा लुक तिने नेमक्या कोणत्या चित्रपटासाठी केला आहे हे मात्र तिने जाहीर केलेलं नाही.

सयानी गुप्ता एक हटके अभिनेत्री

सयानी गुप्ता ही बॉलीवूडमधील एक अशी अभिनेत्री आहे जी नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असते. वेगळ्या धाटणीच्या भूमिका आणि वेगवेगळे लुक ती नेहमीच ट्राय करते. शिवाय एखादी आगळीवेगळी भूमिका साकारण्यासाठी अभिनयासाठी फार मेहनत घेते. वेगळ्या धाटणीच्या भूमिकेत समरस होण्यासाठी संपूर्ण व्यक्तिमत्व आणि लुक बदलण्यासाठी मेहनत घ्यायला तिला फार आवडतं. आतापर्यंत सयानीला  फॅन, जग्गा जासूस, जॉनी एलएलबी 2, जब हॅरी मिट सेजल, आर्टिकल 15 अशा हिंदी चित्रपटांतून आणि अनेक शॉर्ट फिल्मसमधून पाहिलं आहे. सयानीच्या फोर मोअर शॉर्ट्स प्लीज या वेबसिरिजमधील कामाबाबतदेखील फार चर्चा झाली होती. थोडक्यात तिची प्रत्येक भूमिका ही नेहमीच वेगळीच असते. मग ती भूमिका छोटी असो वा मोठी तिला न्याय देण्यासाठी सयानी नेहमीच मेहनत घेताना दिसते. आता सयानीचा हा नवा लुक नेमक्या कोणत्या चित्रपटासाठी आहे याबाबत चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. ज्यामुळे सयानीला एका वेगळ्या भूमिकेत पाहण्याची संधी प्रेक्षकांनी मिळेल अशी आशा आहे.

अधिक वाचा

प्रियांका चोप्रा करत आहे सुट्टीचा योग्य उपयोग, निककडून काढून घेत आहे फोटो

सलमान खानचा ‘भारत’ ठरला सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट

बॉलीवूडचे ‘हे’ सेलिब्रेटी सध्या वेबसिरिजमध्ये आजमावत आहेत आपलं नशीब

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम