सध्या सर्वत्र लग्नाचा सिझन सुरू आहे. 9 मार्चला आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा विवाहसोहळा अगदी थाटामाटात पार पडला. तर 10 मार्चला 'शिवाय' चित्रपटातील अभिनेत्री साएशा सेहगलदेखील विवाहबंधनात अडकली. सायशा सेहगल अभिनेता दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची नात आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक सुमित सेहगल यांची लेक आहे. सायशाचं लग्न अभिनेता आर्यासोबत झालं आहे. हा विवाहसोहळा हैदराबादमध्ये पार पडला. आठ मार्च आणि नऊ मार्चला सायशा आणि आर्याचं प्रि-वेडिंग सेलिब्रेशन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये फक्त नातेवाईक आणि जवळचे मित्रमंडळी सहभागी झाले होते. शिवाय संजय दत्त, खुशी कपूर, आदित्य पंचोली, साऊथचा अभिनेता अल्लू अर्जुन हे सेलिब्रेटी सहभागी झाले होते. प्रि-वेडिंग सेलिब्रेशनमधील संगीतच्या कार्यक्रमातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये ऑफ व्हाईट कलरच्या कॉम्बिनेशनमधील शेरवानीमध्ये आर्या आणि त्याच रंगसंगतीच्या लेंहग्यामध्ये आयशा अगदी शोभून दिसत होती. साएशा आणि आर्याने जब वी मेटमधील मौजा ही मौजा या गाण्यावर ताल धरला.
.@alluarjun at Sangeeth ceremony #AryawedsSayyeshaa pic.twitter.com/fbCPB3A2c7
— SKN (ఎస్ కె ఎన్) (@SKNonline) March 10, 2019
View this post on Instagram
साएशा आणि आर्याची जोडी
साएशाने शिवाय या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. शिवायमध्ये साएशाने अजय देवगनसोबत स्क्रिन शेअर केली होती. मात्र शिवाय नंतर साएशाने साऊथच्या चित्रपटात काम करण्यास सुरूवात केली. सायशा आणि आर्या या दोघांनी अनेक तमिळ चित्रपटात काम केलं आहे. गजनीकांत चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान हे दोघं एकमेकांच्या प्रेमात अडकले. अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. व्हॅलेंटाईन्स डेला त्यांनी लग्न करणार हे सर्वांसमोर जाहिर केलं होतं. सायशा आणि आर्या त्यांच्या आगामी चित्रपट कपानमध्ये एकत्र दिसणार आहेत. आयशा केवळ 21 वर्षांची आहे तर आर्या तिच्यापेक्षा सतरा वर्षांनी मोठा आहे.
View this post on Instagram
आकाश-श्लोकाचं जोरदार पोस्ट-वेडींग सेलिब्रेशन
नीता अंबानीच्या ब्लाऊजवर रेशमी धाग्यांनी जडवले आहे आकाश - श्लोकाचं नाव
आकाश आणि श्लोकाचं स्वप्नवत लग्न, समोर आला पहिला लुक
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम