अभिनेत्री रेखाच्या सौंदर्याचे हे आहे रहस्य, चिरतरूण दिसण्यासाठी करते हे उपाय

अभिनेत्री रेखाच्या सौंदर्याचे हे आहे रहस्य, चिरतरूण दिसण्यासाठी करते हे उपाय

एव्हरग्रीन अभिनेत्री रेखाच्या चिरतरूण दिसण्यामागचं रहस्य जाणून घ्यायला कोणाला आवडणार नाही. खरंतर लाखो दिलाची धडकन असलेल्या रेखाने आता वयाच्या पासष्टीच्या पुढचा टप्पा गाठला आहे.सत्तरीच्या दशकात रेखा जितकी मनमोहक दिसत होती तितकीच ग्लॅमरस ती आजही दिसते. तिने तिच्या सौंदर्याला अशा प्रकारे जपलं आहे की आजकालच्या तरूणीदेखी तिच्यापुढे नक्कीच फिक्या पडू शकतील. रेखाच्या काळयाभोर केसांवरून आणि चमकदार त्वचेवरून तिच्या सौंदर्य आणि फिटनेस जाणिव सतत होत राहते. यासाठी जाणून घेऊया रेखाच्या या चिरतरूण दिसण्यामागे नेमकं काय रहस्य आहे. 

स्किन केअर रूटिन-

सुंदर आणि चिरतरूण दिसण्यासाठी रेखा तिच्या आयुष्यात काही ब्युटी रूटिन पहिल्यापासून पाळत आली आहे. ज्यामुळे वृद्ध काळातही ती तितकीच सुंदर दिसते. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेखा तिची त्वचा नियमित क्लिंझिंग आणि मॉईस्चराईझिंग करणं कधीच टाळत नाही. रेखा कितीही थकलेली असली तरी हे स्किन केअर रुटिन न करता कधीच झोपत नाही. 

नैसर्गिक आणि घरगुती सौंदर्य उपचार -

आजकाल बाजारात अनेक ब्युटी प्रॉडक्टस उपलब्ध असतात. मात्र रेखा यातील कोणतेही ब्युटी प्रॉडक्ट तिच्या त्वचेसाठी वापरत नाही. ज्यामुळे तिच्या त्वचेवर केमिकल्सयुक्त सौंदर्यप्रसाधने कमी वापरली जातात. याउलट रेखा फार पूर्वीपासून घरगुती उपचार तिच्या त्वचेसाठी करत आलेली आहे. आजही ती तिच्या त्वचेवर बेसण,अंडी, दही, मध अशा नैसर्गिक गोष्टीच लावते.

भरपूर पाणी आणि संतुलित आहार -

रेखाच्या सौंदर्याचे आणखी एक रहस्य म्हणजे ती दिवसभरात भरपूर पाणी आणि योग्य आहार घेते. कारण या दोन्ही गोष्टींचा तुमच्या शरीर आणि त्वचेवर परिणाम होत असतो. पाणी पिण्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. संतुलित आहारामुळे तिची फिगर सुडौल आणि त्वचा चमकदार दिसते. 

नियमित योगा आणि व्यायाम -

फिगर मेंटेन ठेवण्यासाठी आजकाल अनेक अभिनेत्री हेव्ही वर्क आऊट करताना दिसतात. मात्र रेखा यापेक्षा दररोज पंधरा ते वीस मिनीटे नियमित योगा करते. योगा, व्यायाम आणि मेडिटेशनमुळे तिचे मन शांत आणि शरीर तंदरुस्त राहते. याशिवाय रेखा घरीच आयुर्वेदिक आणि अरोमा थेरपी अशा ट्रिटमेंट करते. ज्यामुळे ती वयाच्या उतार वयातही नवीन अभिनेत्रींनी लाजवेल इतकी सुंदर  आणि आकर्षक दिसते. 

केसांची योग्य निगा-

घाई गडबड आणि धकाधकीच्या जीवनात अनेकजण त्वचेची तर काळजी घेतात मात्र केसांची निगा राखणे नेहमी विसरतात. मग केसांच्या समस्या दूर करण्यासाठी त्यांना महागडी ब्युटी ट्रिटमेंट करून घ्याव्या लागतात. मात्र रेखाचे केस आजही या वयात काळेभोर आणि लांबसडक आहेत. याचं कारण रेखा केसांची नेहमी योग्य निगा राखत आलेलेी आहे. घरच्या घरी आवळा, शिकेकाई, रीठा सारखे उपचार करून ती तिच्या केसांची काळजी घेते.

आकर्षक आऊटफिट्स -

रेखाच्या सौंदर्याप्रमाणेच तिच्या  साड्या हा दर्शकांच्या चर्चेचा विषय असतो. ती बऱ्याच कार्यक्रमांमध्ये  साडीतच दिसते. प्युअर सिल्कच्या, आकर्षक रंगसंगतीच्या, मोठमोठ्या काठांच्या साड्या ही रेखाची खासियत आहे. रेखाच्या साड्या आणि दागिने तिच्या  सौंदर्यामध्ये अधिक भर घालतात. ज्यामुळे ती कायम चिरतरूण दिसते.

आय मेकअपवर जास्त फोकस -

सुंदर दिसण्यासोबतच तिचा मेकअपही तिला नेहमी साजेसाच असतो. मेकअपमध्ये ती तिच्या डोळ्यांवरील मेकअपवर जास्त भर देते. ज्यामुळे तिचा चेहरा नेहमीच आकर्षक वाटतो. काळ्याभोर भुवया, काजळ, आयलायनर, मस्कारा आणि आयशॅडो शेड यामुळे तिचे डोळे नेहमीच हायलाईट होतात. 

Make Up

POSE Highlighter Duo by MyGlamm

INR 699 AT MyGlamm