किंग खानला वाटतेय कोरोनाची भीती, कुटुंबाच्या सुरक्षेसाठी उचललं 'हे' पाऊल

किंग खानला वाटतेय कोरोनाची भीती, कुटुंबाच्या सुरक्षेसाठी उचललं 'हे' पाऊल

बॉलीवूडच्या किंग खान म्हणजेच शाहरूख खानचे चाहते जगभरात अनेक आहेत. शाहरूख खान त्याची पत्नी आणि मुलांसह मुंबईतील ब्रांदा इथे राहतो. बांद्र्यात किंगखानचा अलिशान 'मन्नत' नावाचा बंगला आहे. चाहत्यांना भेटण्यासाठी अनेकदा शाहरूख मन्नतच्या गच्चीत येत असतो. शाहरूखच्या बंगल्याबाहेर यासाठी चाहत्यांची नेहमीच तुफानी गर्दी असते. शाहरूखचा मन्नत बंगला बाहेरून तर सुंदर आहेच मात्र तितकाच तो आतूनही आलिशान आहे. मात्र सध्या शाहरूखने कोरोनाच्या भितीने मन्नत बंगल्यासाठी सुरक्षेचं एक मोठं पाऊल उचललं आहे. शाहरूखने त्याच्या संपूर्ण बंगल्याला प्लास्टिक शीटने कव्हर केलं आहे. जाणून घ्या याचं कारण 

Instagram

किंग खानला नेमकी कशाची वाटत आहे भीती

शाहरूखने त्याचा बंगला चारी बाजूने प्लास्टिकने झाकून टाकल्यामुळे आता सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मन्नत बंगल्याचे फोटोदेखील सोशल मीडिया माध्यमावर व्हायरल होत आहेत. वास्तविक असं करण्यामागचं खरं कारण शाहरूखने जाहीर केलं नसलं तरी त्याला कोरोनाची भीती वाटत आहे हेच यातून दिसत आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या घरात कोरोनाची लागण झाल्यापासून किंगखानला कोरोनाची अधिकच भिती वाटू लागली आहे. बॉलीवूडच्या अनेक कलाकारांची कोरोना टेस्ट सध्या पॉझिटिव्ह आलेली आहे. बांद्रा येथे मन्नत बंगल्यामध्ये शाहरूख, त्याची पत्नी गौरी, मुलगी सुहाना, मुलगा आर्यन आणि सर्वात छोटा मुलगा अबराम राहत आहेत. शाहरूखचे त्याच्या कुटुंबावर जीवापाड प्रेम आहे. मन्नत एक आलिशान बंगला असला तरी त्याच्याप्रमाणेच अनेक बॉलीवूड कलाकार बांद्रा येथे राहतात. त्यामुळे हवेतून कोरोनाची लागण त्याच्या कुटुंबालाही होईल अशी त्याला भीती वाटू लागली आहे. मग कोरोनापासून आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी शाहरूखने त्याचा हा आलिशान बंगला चक्क प्लास्टिक शीटने झाकून टाकला आहे. कोरोना व्हायरस हवेतून परसतो या भीतीमुळेच त्याने हे पाऊल उचललं आहे. मात्र काहींच्या मते त्याने फक्त पावसापासून रक्षण करण्यासाठी आपले घर प्लास्टिकने झाकलं आहे. यामागचं खरं कारण फक्त शाहरूखच सांगू शकतो. कारण यापूर्वी पावसात त्याने कधीच त्याचा बंगला असा प्लास्टिकने झाकलेला दिसून आलेलं नाही. 

Instagram

शाहरूखचा ‘मन्नत’ आहे खास

शाहरूखच्या मन्नत विषयी नेहमीच चर्चा होत असते. मन्नत हा बांद्रा मधील एक आलिशान बंगला आहे. शाहरूखने 2001 साली हा बंगला खरेदी केला होता. तेव्हा या बंगल्याची किंमत 13 कोटी होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता या बंगल्याची किंमत जवळजवळ 200 कोटी असण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनमध्ये शाहरूख याच बंगल्यात त्याच्या कुटुंबासोबत क्वॉलिटी टाईम स्पेंड करत आहे. खरंतर शाहरूख गेले दोन वर्ष घरातच आहे. याचं कारण असं की त्याने 2018 मध्ये ‘झिरो’ या चित्रपटात काम केलं होतं. झिरोमध्ये त्याच्यासोबत कैतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा होती. मात्र किंगखान असूनही या चित्रपटाला हवं तसं यश मिळू शकलं नाही. ज्यामुळे तो नंतर कोणत्याही चित्रपटात दिसला नाही. लवकरच तो एका चित्रपटातून पुन्हा झळकणार अशी चर्चा होती. मात्र आता लॉकडाऊनमुळे शाहरूखच्या चाहत्यांची चांगलीच निराशा झाली आहे

Instagram