एकतर स्वातंत्र्य, नाहीतर स्वर्ग... ‘शहीद भाई कोतवाल'चा ट्रेलर लाँच

एकतर स्वातंत्र्य, नाहीतर स्वर्ग... ‘शहीद भाई कोतवाल'चा ट्रेलर लाँच

'एकतर स्वातंत्र्य, नाहीतर स्वर्ग' असं म्हणत ब्रिटिशांविरोधात निधड्या छातीनं लढणाऱ्या ‘शहीद भाई कोतवाल’ यांच्यावर आधारित चित्रपट 24 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे. स्वरजाई आर्ट मीडिया प्रॉडक्शनच्या प्रवीण दत्तात्रेय पाटील यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सिद्धेश एकनाथ देसले, सागर श्याम हिंदुराव चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. एकनाथ देसले आणि पराग सावंत यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून कथा पटकथा संवाद आणि गीते एकनाथ देसले यांनी लिहिली आहेत. भाई कोतवाल यांच्यासह गोमाजी पाटील आणि हिराजी पाटील या बाप लेकांच्या शौर्याची कथा ही यात पाहायला मिळणार आहे. 

या चित्रपटात आशुतोष पत्की, ऋतुजा बागवे, निशिगंधा वाड, माधवी जुवेकर,अरुण नलावडे, गणेश यादव, पंकज विष्णू, कमलेश सावंत, मिलिंद दस्ताने, सिद्धेश्वर झाडबुके, श्रीरंग देशमुख, अभय राणे, परेश हिंदुराव, प्राजक्ता दिघे आदींच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. अशोक पत्की, रुपेश गोंधळी, भरत बडेकर यांनी संगीत दिलेल्या गाण्यांना सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकर, आदर्श शिंदे, ज्ञानेश्वर मेश्राम, ऐश्वर्या देसले यांच्या सुमधुर आवाजात ही गाणी रेकॉर्ड काण्यात आली आहेत. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे असून कला दिग्दर्शक म्हणून देवदास भंडारे यांनी काम पाहिले आहे.

(वाचा : भाईजान सलमानचा व्हिलनसोबत दोस्ताना, कोट्यवधींची कार केली गिफ्ट)

आजपर्यंत स्वातंत्र्य संग्रामातील अनेक व्यक्तिमत्त्वांवर आधारित चित्रपट आले. पण काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या भाई कोतवाल यांची शौर्यकथा पहिल्यांदाच चित्रपटातून समोर येत आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी आधीपासूनच उत्सुकता आहे, त्यात आता या गोळीबंद ट्रेलरमुळे हा चित्रपट लक्षवेधी ठरला आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून येत्या 24 जानेवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

(वाचा : बॉलिवूडची ‘शांती’ पत्रकारावर भडकली, प्रेग्नेंसीच्या प्रश्नावर दीपिकानं दिलं ‘हे’ उत्तर)

आशुतोष पत्की दिसणार मुख्य भूमिकेत

छोट्या पडद्यावर विशेष लोकप्रियता मिळवलेला अभिनेता आशुतोष पत्की या चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तर अभिनेत्री ऋतुजा बागवे ही शहीद भाई कोतवाल यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे आशुतोष पत्की हा ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आहे. वडिलांपेक्षा वेगळी वाट धरत त्याने अभिनेता म्हणून ओळख निर्माण केली आहे. आता ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटातून त्याला पहिल्यांदाच ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली आहे.

(वाचा : धुरळा ! छोट्या लता दीदीनं गायलं अरिजितचं सुपरहिट गाणं)

'अग्गंबाई सासूबाई'...टेलिव्हिजनवरी लोकप्रिय मालिका

आशुतोष पत्की लोकप्रिय मालिका 'अग्गंबाई सासूबाई'मध्ये सोहम कुलकर्णीची भूमिका पार पाडत आहे. यामध्ये त्याची नकारात्मक भूमिका आहे. पण'अग्गंबाई सासूबाई' ही मालिका सध्या फारच गाजत आहे. नेहमीच मालिकांमध्ये सासू आणि सुनेचं नातं हे टोकाचं दाखवलं जातं. पण खऱ्या आयुष्यात नक्कीच सासूला समजून घेणारी सुनही असते. या मालिकेत आपल्या सासूला जपणारी, तिचं मन समजून घेणारी सून दाखवली आहे. जी सध्या सर्व प्रेक्षकांना आवडत आहे. त्यामुळे ही मालिका सध्या गाजत आहे. यामध्ये निवेदिता सराफ सासूच्या भूमिकेत तर तेजश्री प्रधान त्यांच्या सूनेची भूमिका साकारत आहे.

हे देखील वाचा :

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.