शाहिदची बायको Mira Rajput पण करणार का बॉलीवूडमध्ये एंट्री?

शाहिदची बायको Mira Rajput पण करणार का बॉलीवूडमध्ये एंट्री?

शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि मीरा राजपूत (Mira Rajput) बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात हॉट कपल आहे. जे दोन्ही मुलांचे आईबाबा असूनही आपल्या मनाला जे पटेल ते करण्यात मागे हटत नाहीत. शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि मीरा राजपूत (Mira Rajput) हे एकमेंकासोबत जिमच्या बाहेर स्पॉट होण्यापासून ते अगदी त्यांच्या लहान मुलांना शॉपिंगला नेतानाही बाहेर दिसतात. जर असं म्हटलं की, ते त्यांच्या खाजगी आयुष्यात आईबाबांची भूमिका चांगल्या पद्धतीने निभावत आहेत. तर ते चूक ठरणार नाही. 

View this post on Instagram

Promises to keep 🌸

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor) on

जिथे शाहिद कपूर मीरासोबत घरच्या जबाबदाऱ्या वाटून घेताना दिसतो तिथे मीराही शाहिदला त्याच्या प्रोफेशनल लाईफमध्ये लीड करण्यासाठी मदत करताना दिसते. या दोघांनी अनेकदा एकत्र फोटोशूट केलं आहे. मीराने काही जाहिरातींमध्येही काम केलं आहे. असं म्हटलं जात आहे की, बॉलीवूडचा भाग नसूनही मीरा तिच्या नवऱ्याच्या सोबतीने पाऊल टाकत आहे.

Instagram

खरंतर अनेक वेळा शाहिद कपूरला हा प्रश्न विचारण्यात येतो की, मीरासुद्धा बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे का? नुकत्याच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतही त्याला हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने दिलं हे उत्तर. शाहिद म्हणाला की, मीराला तिच्या आयुष्यात जे करायचं आहे आणि केव्हा करायचं आहे हा पूर्णतः तिचा निर्णय आहे. आमच्या लग्नाच्या एका वर्षानंतरच ती आई झाली आणि दोन वर्षानंतर पुन्हा एकदा आई झाली. सध्या तर आमच्या मुलांच्या संगोपनात बिझी आहे. त्यामुळे ती कोणत्याही बॉलीवूड प्रोजेक्टमध्ये सहभाग घेईल, असं वाटत नाही. पण ती यामुळे तिच्या करिअरमध्ये मागे राहील असंही नाही. कारण ती आता फक्त 25 वर्षांची आहे. शाहिद आणि मीराची दोन्ही मुलं मीशा आणि झेन कपूर लहान असल्याने येणारी काही वर्षंही या दोघांसाठी महत्त्वाची आहेत. त्यामुळे मीराला कितपत बॉलीवूडमध्ये एंट्री करता येईल हा प्रश्नच आहे.

View this post on Instagram

Thank you for the overwhelming love. #kabirsingh

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

शाहिद कपूरला त्याच्या नुकत्याच येऊन गेलेल्या कबीर सिंग या चित्रपटाला चांगलंच यश मिळालं. या दक्षिणेतील चित्रपटाच्या रिमेकने बॉक्स ऑफिसवरही चांगलाच गल्ला जमवला. तसंच शाहिदलाही त्याच्या अभिनयासाठी खूप चांगले रिव्ह्यूज मिळाले. ही भूमिका स्वीकारण्याबाबत जेव्हा शाहिद विचार करत होता तेव्हा मीरानेच त्याला सपोर्ट केला आणि भूमिका स्वीकारण्यास सांगितलं. ही भूमिका खूपच चॅलेजिंग आणि इमोशनल पण होती. पण मीराने साथ दिल्यामुळे शाहिदने ही भूमिका केली आणि त्याला चांगल यशही मिळालं.

जेव्हा शाहिद आयुष्यात पार एकटा पडला होता तेव्हा मीरा त्याच्या आयुष्यात आली आणि बघताबघता शाहिदचं आयुष्य पार बदलून गेलं. शाहिदच्या लव्ह लाईफमध्ये अनेक चढउतार आले पण शेवटी तो एकटाच पडला. आधी करिना कपूर मग प्रियांका चोप्रा आणि विद्या बालननेही त्याची साथ सोडली. त्यानंतर मीराशी शाहिदचं अरेंज मॅरेज झालं. पण या लग्नानंतर मीरा आणि शाहिदचं आयुष्य छान चाललं आहे. 

तुम्हाला शाहिद आणि मीराची जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र किंवा मीराला बॉलीवूड चित्रपटात पाहायला आवडेल का? आम्हालाही सांगा.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.